रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एकदा तो भयंकर मासा दिसला, नागरिकांमध्ये दहशत, समुद्रात न जाण्याचं आवाहन
रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या संख्येनं जेली फिश आढळून आले आहेत. वादळी परिस्थिती, खोल समुद्रात सुटलेले वारे, समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदलामुळे या जेली फिश किनारी भागाकडे फेकल्या गेल्या आहेत.

रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या संख्येनं जेली फिश आढळून आले आहेत. वादळी परिस्थिती, खोल समुद्रात सुटलेले वारे, समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदलामुळे या जेली फिश किनारी भागाकडे फेकल्या गेल्या आहेत. या जेली फिश जांभळ्या रंगाच्या सिंहाच्या आयाळाप्रमाणे असल्याने त्यांना लायन्स मेन असं देखील म्हटलं जातं. दरम्यान किनाऱ्याच्या वाळूत रूतल्याने हजारो जेलीफिशचा मृत्यू झाला आहे. जली फिश प्रचंड विषारी असतात, त्यांचा अंगाला स्पर्श होताच तीव्र वेदना होते, त्यामुळे या माशांपासून दूर राहण्याचं आवाहान करण्यात आलं आहे. साधारणपणे समृद्रात 20 ते 25 वाव खोल हे जेली फिश आढळून येतात, ते कधीकधी समुद्राच्या पुष्ठ भागावर देखील तरंगतात.
मोठ्या संख्येनं जेली फिश समुद्राच्या किनाऱ्यावर आल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आरे वारे, गणपतीपुळे, माडबन,सागरीनाटे, आंबोळगड, गावखडी, भाट्ये, आरेवारे, मालगुंड या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात जेली फिश आढळून आले आहेत, त्यामुळे नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान दुसरीकडे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे आज देखील कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सलग सातव्या दिवशी आज जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली आहे, पावसानं रत्नागिरीला झोडपून काढलं आहे, पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्यामुळे पुढचे दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किनारपट्टी भागांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. समुद्रामध्ये उचं लाटा उसळत असल्यामुळे सध्या मासेमारी ठप्प आहे, आज कोकणातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातही पावसाचा इशारा
दरम्यान दुसरीकडे आज विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, मोंथा चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर ठळक दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. ही प्रणाली गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांपर्यंत असल्याने या भागात पाऊस पडत आहे. आज गोंदिया, गडचिरोली सह विदर्भातील इतर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
