देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कंटेनर-क्रुझरच्या धडकेत तीन ठार – सहा जखमी

पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर शरद नगर जवळ हा भीषण अपघात घडला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या कंटेनर-क्रुझरच्या समोरासमोर झालेल्या या भीषण धडकेत तीन ठार तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.

देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कंटेनर-क्रुझरच्या धडकेत तीन ठार - सहा जखमी
Road accident
| Updated on: Jan 26, 2026 | 9:55 PM

पंढरपूर- मंगळवेढा मार्गावर मोठा भीषण अपघात घडला आहे.तुळजापूर आणि अक्कलकोट देवदर्शन करून येणाऱ्या क्रुझरमधील भाविकांवर काळाचा घाला पडला आहे. कंटेनर-क्रुझरच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत तीन जण ठार आणि सहाजण जखमी झाले आहेत. या अपघातातील सर्व भाविक हे डोंबिवली येथील रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे.

पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर अपघात मोठा अपघात घडला आहे. येथे एका क्रुझर आणि कंटेनर वाहनाची समोरासमोर भीषण टक्कर झाली आहे. त्यामुळे क्रुझरमधील तीन जण जागीच ठार तर सहाजण गंभीर जखमी झाले आहे. हे भाविक तुळजापूर आणि अक्कलकोट येथून देवदर्शन घेऊन पंढरपूरवरुन मुंबईला रेल्वेने परतणार होते. त्यावेळी वाहनचालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर आणि क्रुझरची समोरासमोर टक्कर झाली. त्यामुळे तीन जण ठार झाले तर जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

रेल्वेने परतणार होते

हे सर्व भाविक डोंबिवलीचे रहिवासी होते.अक्कलकोट आणि तुळजापूर दर्शन करून रात्री साडेनऊ वाजता पंढरपूरहून मुंबईला रेल्वेने जाणार होते. मात्र, रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावरील शरद नगर जवळ हा भीषण अपघात झाला आहे.

 

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.