AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात तीन विविध विचित्र अपघातात तीन ठार, फवारणी यंत्रात साडी अडकली, ग्राईंडरने गळा कापला गेला…

कुठे फवारणी यंत्रात साडी अडकल्याने महिलेचा मृत्यू झाला तर कुठे ग्राईंडरने गळा कापल्याने सुताराचा मृत्यू झाला तर कुठे कुलरचा शॉक लागून सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अपघाताचे सत्र सुरुच आहे.

राज्यात तीन विविध विचित्र अपघातात तीन ठार, फवारणी यंत्रात साडी अडकली, ग्राईंडरने गळा कापला गेला...
The spate of accidents in the state continues.
| Updated on: Jul 03, 2026 | 4:43 PM
Share

राज्यातील अपघातांची मालिका संपण्याचे नावच घेत नाहीए.. औषध फवारणी यंत्रात एका महिलेचा साडीचा पदर अडकून तिचा मृत्यू झाल्याची घटना दौंड तालुक्यात घडली आहे. तर जळगावच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे ग्राईंडरमशीनने गळा कापला गेल्याने सुताराचा मृत्यू झाला आहे. तर परभणीत कुलरचा शॉक लागून एका सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.

दौंड तालुक्यातील खडकी येथील तुकाईनगर परिसरात ट्रॅक्टरला जोडलेल्या औषध फवारणी यंत्रात साडी अडकून 40 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मीनाबाई हरी काळे असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेच्या वेळी ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्राच्या टाकीमध्ये किती औषध शिल्लक आहे, हे पाहण्यास मीनाबाई काळे गेल्या होत्या. त्या यंत्राजवळ उभे राहून टाकीतील औषधाची पातळी पाहत असताना त्यांच्या साडीचा पदर ट्रॅक्टर आणि फवारणी यंत्राला जोडलेल्या फिरत्या शॉफ्टमध्ये अडकला यावेळी ही दुर्घटना घडली आहे.

ग्राईंडरमशीनने गळा कापला गेल्याने मृत्यू

ग्राईंडरमशीनने गळा कापला गेल्याने एका सुताराचा मृत्यू झाल्याची घटना जळगावच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे घडली आहे. मशीन लावायला गेले असता त्यांच्या हातातून सटकून गळा कापला गेल्याने सुताराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.देविदास लटकन सुतार असे ७४ वर्षीय मयत सुताराचे नाव आहे. एका हातात ग्राईंडर मशीन पकडून ते बटन चालू करायला गेले तेव्हा त्यांच्या हातातून मशीन सटकून ते मशिनवर पडल्याने त्यांचा गळ्याच्यावर कपाळापर्यंत कापले गेले. या घटनेत खोल जखम झाली आणि रक्तप्रवाह होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कुलरचा शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू

एका सहा वर्षीय चिमुकल्याला कुलरचा शॉक लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना परभणी तालुक्यातील पोरवड गावात घडली आहे. शिवराज नवनाथ गिराम असे या चिमुकल्याचे नाव आहे. कुलर चालू असताना तो कुलरच्या संपर्कात गेला आणि त्याला जोराचा शॉक लागून तो बेशुद्ध अवस्थेत गेला होता. घटनेनंतर त्याच्या पालकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Follow Us
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर