Nashik accident: नाशिक जिल्ह्यात कळवणमध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

Nashik News- या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.तर काही जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nashik accident: नाशिक जिल्ह्यात कळवणमध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 7:00 PM

नाशिकनाशिक जिल्ह्यात (Nashik Accident) कळवण तालुक्यात मुळाने बारीजवळ भीषण अपघात (Car and Tractor Accident) झाला आहे.  ट्रॅक्टर एका कारवर कलंडून झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू (Accident Death) झाल्याची अधिकृत माहिती असून, एकूण अपघातात सात जण मृत झाल्याचे सांगण्यात  येते आहे. यात काही जण जखमीही झाले असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील वणीच्या डोंगराजवळ मार्कंडेय डोंगराच्या जवळ असलेल्या मुळाणे बारी येथील ही घटना आहे. या अपघातात ट्रॅक्टर कारवर कलंडली. त्यामुळे कारचा चक्काचूर झाल्याची माहिती आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचे काही भयानक फोटोही समोर आले आहेत. जे पाहून कुणाचेही काळीज करपेल.

जखमींना तातडीने रुग्णालयात नेलं

जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा या अपघातात आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा अपघात मोठा भीषण होता, ट्रॅक्टर कारवर कलंडल्याने, कार पूर्णपणे ट्रॅक्टरखाली अडकल्याचे अपघाताच्या फोटोंमध्ये दिसते आहे.

अपघाताचे भीषण फोटो

हे सुद्धा वाचा

वाहनांचाही चेंदामेंदा

या अपघाताचे फोटो पाहिल्यास या वाहनांची अवस्था पाहून या अपघाताची दाहकता लक्षात येते. या अपघातात या दोन्ही वाहनांचा अगदी चेंदामेंदा झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पाढऱ्या रंगाची ही पूर्ण ट्रॉलीच्या खाली दबली आहे. या गाडीचा नंबरही या फोटोतून सहज दिसत आहे. MH 41 AZ 1005 असा या पांढऱ्या कारचा नंबर आहे. मात्र या ट्रॅक्टरचा नंबर या फोटोतून दिसून येत नाही.

गेल्या काही दिवसांपासून अपघातात वाढ

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मळते आहे. मे महिन्याची सुट्टी असल्यानेही अनेक जण प्रवास करीत आहेत. अशा स्थितीत गेल्या काही दिवसांत अपघातांची संख्या वाढल्याचे दिसते आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.