अतिधोकादायक इमारती, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स तातडीने हटवा; ठाणे पालिका आयुक्तांचे आदेश

राज्यात पावसाने दस्तक दिली आहे. त्यामुळे पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. (tmc commissioner vipin sharma holds monsoon preparedness review meeting)

अतिधोकादायक इमारती, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स तातडीने हटवा; ठाणे पालिका आयुक्तांचे आदेश
vipin sharma
| Edited By: | Updated on: Jun 04, 2021 | 7:02 PM

ठाणे: राज्यात पावसाने दस्तक दिली आहे. त्यामुळे पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील अतिधोकादायक इमारती, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स तातडीने निष्कासित करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांना हे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अतिवृष्टीच्या दृष्टीने भुस्खलन होणाऱ्या ठिकाणांच्या नागरिकांसाठी तात्पुरती निवारा केंद्रे उभी करून त्यांना त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. (tmc commissioner vipin sharma holds monsoon preparedness review meeting)

शहरात पावसाळ्यामध्ये कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रभाग समितीनिहाय धोकादायक, अतिधोकादायक इमारतीं, नालेसफाई, भुस्खलन होणारी ठिकाणांचा तसेच पावसाळ्यासंबंधित इतर बाबींचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी आदी उपस्थित होते.

त्या इमारती जमीनदोस्त करा

यावेळी शर्मा यांनी अतिधोकादायक इमारती तात्काळ खाली करा किंवा तात्काळ जमीनदोस्त करा, असे आदेशच प्रशासनाला दिले. तसेच पावसाळ्यात देखील या सर्व इमारतीची पाहणी करून कोणतीही जीवित आणि वित्तहानी होणार नाही, याकडे लक्ष देण्याचा सूचनाही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.

तात्पुरती निवारा केंद्रे सुरू करा

ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, कळवा, माजिवडा, मानपाडा या ठिकाणी पावसाळयात भुस्खलन झाल्यास तेथील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करा. तसेच त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी तात्पुरती निवारा केंद्रे उभी करण्याचे आदेशही शर्मा यांनी दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज ठेवून स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक तसेच नागरिकांना याची माहिती देण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. यावेळी अतिवृष्टीच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेवून संपूर्ण यंत्रणा तयार ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्याचप्रमाणे सध्या कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी पावसाळयात साथीच्या रोगांचा प्रादूर्भाव होवू नये यासाठी वेळोवेळी औषध फवारणी, इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. (tmc commissioner vipin sharma holds monsoon preparedness review meeting)

 

संबंधित बातम्या:

15 जूनपर्यंत मालमत्ता कर भरा, 10 टक्के सूट मिळवा; ठाणे पालिकेचं नागरिकांना आवाहन

शिवसेनेचे युवा नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव, खासदार श्रीकांत शिंदे जेव्हा बसने प्रवास करतात

‘निवडणुकीच्या कामाला जुंपलेल्या पोलिसांना अवघे 300 रुपये तर इतरांना 1100 रुपयांचा भत्ता’

(tmc commissioner vipin sharma holds monsoon preparedness review meeting)