15 जूनपर्यंत मालमत्ता कर भरा, 10 टक्के सूट मिळवा; ठाणे पालिकेचं नागरिकांना आवाहन

जास्तीत जास्त नागरिकांनी मालमत्ता कर भरावा म्हणून ठाणे महापालिकेने मोठी घोषणा केली आहे. (TMC offers 10% discount for property tax payers)

15 जूनपर्यंत मालमत्ता कर भरा, 10 टक्के सूट मिळवा; ठाणे पालिकेचं नागरिकांना आवाहन
Thane Municipal Corporation

ठाणे: जास्तीत जास्त नागरिकांनी मालमत्ता कर भरावा म्हणून ठाणे महापालिकेने मोठी घोषणा केली आहे. येत्या 15 जूनपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांना मालमत्ता करात 10 टक्के सूट देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने जाहीर केला आहे. तसेच नागरिकांनी या संधीचा अधिकाधिक लाभ घेण्याचं आवाहनही पालिकेने केलं आहे. (TMC offers 10% discount for property tax payers)

ठाणे महापालिकेने 2021-22 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके नागरिकांना उपलब्ध करून दिली आहेत. जे करदाते 2021-22 या आर्थ‍िक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर, अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी महापालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

अॅप आणि संकेतस्थळावरून कर भरता येणार

ठाणे महानगरपालिकेच्या कोणत्याही प्रभागसमिती कार्यक्षेत्रातील करदात्यांसाठी ही सवलत आहे. हे करदाते त्यांचा मालमत्ता कर महापालिकेच्या कोणत्याही कर संकलन केंद्रावर रोख, धनादेश, धनाकर्ष तसेच डेबीट कम एटीएम कार्ड, क्रेडीट कार्डद्वारे भरू शकतील. दररोज सकाळी 10.30 ते 4.30 या वेळेत हा कर जमा करता येईल. तसेच महापालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर त्याचप्रमाणे Digithane या ॲपद्वारे देखील करदाते त्यांचा मालमत्ता कर ऑनलाईन पध्दतीने जमा करू शकतात, असं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

मालमत्ता कर भरून सहकार्य करा

ठाणेकरांनी या सवलतीचा जास्तीत जास्त फायदा घेवून आपला मालमत्ता कर प्राधान्याने भरावा. मागीलवर्षी कोरोनाकाळात देखील नागरिकांनी कर भरणा करून सहकार्य केले आहे, तसेच यावर्षी देखील सहकार्य करण्याचे आवाहन देखील महापालिकेने केले आहे. (TMC offers 10% discount for property tax payers)

 

संबंधित बातम्या:

शिवसेनेचे युवा नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव, खासदार श्रीकांत शिंदे जेव्हा बसने प्रवास करतात

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद, ठाण्यात दिवसभरात 195 जणांनी लस टोचली

ठाण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड, पोलिसांनी दोन अभिनेत्रींची सुटका कशी केली? कारवाईची A टू Z माहिती

(TMC offers 10% discount for property tax payers)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI