रस्त्यावरील कचरा, झाडांच्या फांद्या तात्काळ हटवा, ठाणे पालिका आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज सलग तिसऱ्या दिवशी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्यावरील कचरा आणि झाडांच्या फांद्या तात्काळ उचलण्याचे आदेश दिले.

रस्त्यावरील कचरा, झाडांच्या फांद्या तात्काळ हटवा, ठाणे पालिका आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये
tmc commissioner vipin sharma
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 6:27 PM

ठाणे: ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज सलग तिसऱ्या दिवशी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्यावरील कचरा आणि झाडांच्या फांद्या तात्काळ उचलण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. (tmc commissioner vipin sharma inspects pre-monsoon cleaning work)

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापौर नरेश गणपत म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी नालेसफाई, पाणी साचणाऱ्या सखल भागांची आणि पडझड झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी अतिवृष्टीमुळे शहरातील पाणी साचण्याऱ्या ठिकाणी पंप लावण्याचे, रस्त्यावर वाहून आलेला कचरा तसेच पडलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ उचलण्याचे निर्देश शर्मा यांनी संबंधित विभागास दिले. हवामान खात्याने अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविल्यानंतर कालपासून शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानुषंगाने महापौर नरेश गणपत म्हस्के आणि आयुक्त शर्मा यांनी आज शहरातील चिखलवाडी येथून नालेसफाई तसेच पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यास सुरुवात केली. या पाहणी दौऱ्यामध्ये शिवसेना पक्ष गटनेते दिलीप बारटक्के, प्रभाग समिती अध्यक्षा आशा डोंगरे, नगसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, मीनल संख्ये, कांचन चिंदरकर, नगरसेवक भरत चव्हाण, विकास रेपाळे, संतोष वडवले, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, कार्यकारी अभियंता भरत भिवापूरकर, वैद्यकीय अधिकारी बालाजी हळदेकर तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांशी संवाद साधला

चिखलवाडीनंतर शर्मा यांनी महर्षी वाल्मिकी मार्ग, मायानगर कोपरी, पनामा सुपरमॅक्स कंपनी, आईमाता मंदिर चौक, महात्मा फुले नगर तसेच ज्ञानेश्वर नगर येथील नाल्याची पाहणी केली. पनामा येथील नाल्याच्या ठिकाणी महापौर नरेश म्हस्के यांनी नाला रूंदीकरण करण्याची सूचना केली. चिखलवाडी येथे मुसळधार पावसात नेहमीच पाणी साचते. त्यामुळे या ठिकाणी पंप लावण्यात आले असून इतर अत्यावश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान महापौर व आयुक्तांनी तेथील नागरिकांशी संवाद साधून येथील समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

तातडीने उपाययोजना करा

अतिवृष्टीमुळे शहरात रस्त्यावर वाहून आलेल्या कचरा आणि पडलेल्या झाडांच्या फांद्या उचलणे, पाणी साठलेल्या ठिकाणी सबमर्सिबल पंप लावा. तसेच पाण्याच्या निचरा होण्यासाठी आवश्यक त्या इतर उपाययोजनाही करा, असे आदेशही आयुक्तांनी दिले. (tmc commissioner vipin sharma inspects pre-monsoon cleaning work)

संबंधित बातम्या:

डोक्यावर पाऊस, हातात झेंडे, लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाच्या घोषणा, पुढचं आंदोलन आक्रमक करण्याचा इशारा

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी ठाणे महापालिका पुन्हा कामाला, आयुक्त-महापौर थेट कोविड वॉर रुममध्ये दाखल

पहिल्याच पावसाने मुंबई पाठोपाठ ठाण्यालाही छळलं, लोकल सेवा ठप्प, इमारतीच्या संरक्षण भिंत कोसळल्या, जनजीवन विस्कळीत

(tmc commissioner vipin sharma inspects pre-monsoon cleaning work)

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.