मोठी बातमी! आज ओमराजे निंबाळकरांची खरी परीक्षा, मातोश्रीवर घडामोडींना वेग, ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये
काही दिवसांपूर्वी शिवेसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली होती. 9 पैकी सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची सात सोडली, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, त्यानंतर आता उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पहायला मिळत आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. राज्यात झालेल्या ऑपरेशन टायगरमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. पक्षात फूट पडण्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडे 9 खासदार होते, त्यातील 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे सध्या स्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे केवळ तीनच खासदार उरले असून, शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या 13 वर पोहोचली आहे. दरम्यान शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा दुसरा सर्वात मोठा झटका होता. एकाचवेळी सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडली.
ज्या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, त्यामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश होता. सुरुवातीला ओमराजे निंबाळकर यांची भूमिका तळ्यात-मळ्यात होती, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं देखील टेन्शन वाढलं होतं, परतु शेवटी आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याची घोषणा ओमराजे निंबाळकर यांनी केली. ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशानंतर धाराशिव मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा देखील पार पडली होती, या सभेत उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.
दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पहायला मिळत आहेत. आज मुंबईतील ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत धाराशिवमधील नगरसेवकांची बैठक होत आहे. या बैठकीला किती नगरसेवक उपस्थित राहणार यावरून, ओमराजे यांच्यासोबत किती नगरसेवक आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत किती नगरसेवक हे स्पष्ट होणार आहे. ओमराजे यांनी शिवसेना शिंदे गटात केलेल्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला आता विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या बैठकीनंतर आता किती नगरसेवक हे ओमराजे यांच्यासोबत आहेत, आणि किती नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, हे स्पष्ट होणार आहे.