LIVE : पाच दिवसांनंतर शिवसेना आमदारांना मतदारसंघात परतण्याचे आदेश

LIVE : पाच दिवसांनंतर शिवसेना आमदारांना मतदारसंघात परतण्याचे आदेश
Picture

पाच दिवसांनंतर शिवसेना आमदारांना मतदारसंघात परतण्याचे आदेश

मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून मुंबईच्या हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात जाण्याचे आदेश, मतदारसंघात जाऊन मतदारांच्या संपर्कात राहण्याचे एकनाथ शिंदे यांचे आदेश

13/11/2019,10:20PM
Picture

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये होणारी बैठक रद्द, अजित पवार यांची माहिती

13/11/2019,7:20PM
Picture

सुधीर मुनगंटीवार आणि मोहन भागवत यांच्यात 20 मिनिटे चर्चा

नागपूर : सुधीर मुनगंटीवार आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपुरात भेट, तब्बल 20 मिनिटे चर्चा, भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची मुनगंटीवारांचा माहिती

13/11/2019,6:09PM
Picture

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार : हेमंत गोडसे

मुख्यमंत्री हा सेनेचाच होणार, चर्चा सकारात्मक झाली असून लवकर निर्णय जाहीर होणार, अंतिम निर्णय हा उद्धव ठाकरे घेतील आणि तेच जाहीर करतील- शिवसेना खासदार हेमंत गोडसे

13/11/2019,5:35PM
Picture

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार! 'लीलावती'तून डिस्चार्जनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

13/11/2019,12:50PM
Picture

समान कार्यक्रम ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची 5-5 नावं

समान कार्यक्रम ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची 5-5 जणांची समिती राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांची नावं, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टावार, माणिकराव ठाकरे समितीत असण्याची शक्यता

13/11/2019,12:17PM
Picture

संजय राऊतांची भूमिका जनतेला आवडली : बाळासाहेब थोरात

13/11/2019,12:12PM
Picture

मध्यावधी निवडणुका लागणार नाही : शरद पवार

मध्यावधी निवडणुका लागणार नाही, भीती बाळगू नका, असं राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत सांगितले. मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळण्यात आली आहे. तसेच मतदारसंघात जाऊन लोकांना भेटा, त्यांचे आभार माना, असं पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सांगितले.

13/11/2019,11:47AM
Picture

आदित्य ठाकरेंचा रात्रीपासून रीट्रीट हॉटेलमध्ये मुक्काम

आदित्य ठाकरे काल रात्रीपासून रीट्रीट हॉटेलमध्ये ठाण मांडून आहेत. हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या शिवसेना आमदारांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे लक्ष, सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत सर्व आमदार हॉटेलमध्ये थांबणार.

13/11/2019,11:40AM
Picture

शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात तातडीची सुनावणी नाही

शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात तातडीची सुनावणी नाही, सत्तास्थापनेसाठी संख्याबळ सादर करण्यास मुदतवाढ न देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधातील याचिका

13/11/2019,10:37AM
Picture

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आज बैठक

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आज पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सुप्रिया सुळे वाय. बी. चव्हाण सेंटरला रवाना झाल्या आहेत.

13/11/2019,9:29AM
Picture

उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात भेट : सूत्र

13/11/2019,9:20AM
Picture

शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

13/11/2019,9:18AM
Picture

भाजपकडून मध्यावधी निवडणुकीची तयारी?

13/11/2019,9:17AM
Picture

भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक

भाजपच्या नव्या आमदारांची उद्या (14 नोव्हेंबर) बैठक घेण्यात येत आहे. ही बैठक संघध्याकाळी 7 वाजता होणार आहे. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात ही बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस या बैठकीत सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.

13/11/2019,9:15AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *