AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील रायते पुलावर सिमेंट मिक्सर आणि इको कारच्या भीषण अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू
kalyan accident
| Updated on: Apr 13, 2026 | 1:07 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अपघातांचे सत्र सुरु आहे. त्यातच आता कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे. रायते पुलावर सिमेंट मिक्सर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात इको कारमधील ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर उर्वरित प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही इको कार कल्याण ते मुरबाड या मार्गावर प्रवासी वाहतूक करत होती. पाच आसनांच्या या गाडीत १२ प्रवासी कोंबून भरले होते. ही गाडी सुसाट वेगाने मुरबाडच्या दिशेने जात होती. याचवेळी रायते पुलावर समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकची आणि इको कारची समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की संपूर्ण कारचा चक्काचूर झाला. यामुळे प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.

या अपघातावेळी मोठा आवाज झाला. तो ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर स्थानिकांनी मदतीसाठी हातभार लावला. या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस आणि महामार्ग प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करत गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. यानंतर या सर्वांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता यातील ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर उर्वरित प्रवाशी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू

या भीषण अपघातात मृतांमध्ये ५ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अद्याप यातील कोणाचीही ओळख पटलेली नसून, टिटवाळा पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या घटनेमुळे नियम धाब्यावर बसवून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता यावर काय ठोस उपाययोजना केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!