प्रवाशांनो लक्ष द्या, रेल्वेचे 20 डबे रुळावरून घसरले, कोणत्या ट्रेन रद्द?

या अपघातामुळे नागपूर-मुंबईची वाहतूक नरखेडमार्गे वळवण्यात आली आहे. रेल्वेचे डबे रुळावरून बाजूला काढण्याचे काम सुरु आहे.

प्रवाशांनो लक्ष द्या, रेल्वेचे 20 डबे रुळावरून घसरले, कोणत्या ट्रेन रद्द?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 9:12 AM

स्वप्निल उमप,अमरावतीः नागपूर ते पुणे, नागपूर- मुंबई रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.  अमरावती नजीकच्या मालखेड रेल्वे गावाजवळ कोळशाने भरलेल्या मालवाहू रेल्वे गाडीचे 20 डबे रात्री 11 वाजताच्या सुमारास रेल्वे रूळावरून घसरले. यामुळे अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे नागपूर पुणे मुंबई मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्याने व दुसऱ्या मार्गाने वळवल्याने दिवाळसाठी गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशाना याचा फटका बसला आहे.दरम्यान रेल्वे वाहतूक सुरळीत करून पूर्व पदावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने जेसीबीच्या माध्यमातून रूळावरील घसरलेले डबे हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे

ऐन दिवाळीत या अपघातामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे विभागाकडून अपघात स्थळी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

रात्री 11 वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. एकापाठोपाठ एक 15-20 डबे रुळावरून घसरू लागल्याने खूप मोठा आवाज आला. मालगाडीचे इंजिन रुळाच्या एका बाजूला घसरले तर काही डबे रुळावरच आडवे झाले. त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

दरम्यान, या अपघातामुळे नागपूर-मुंबईची वाहतूक नरखेडमार्गे वळवण्यात आली आहे. रेल्वेचे डबे रुळावरून बाजूला काढण्याचे काम सुरु आहे.

200 पेक्षा अधिक कर्मचारी

ऐन दिवाळीत हा अपघात झाल्यामुळे रेल्वे विभागाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहेत. काल रात्रीपासूनच रेल्वे विभागातर्फे या मार्गावर दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. सकाळी सुर्योदयानंतर या कामाने वेग घेतला आहे.

अपघात स्थळावर रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि तंत्रज्ञ तातडीने दाखल झाले. सध्या 200 कर्मचारी येथील दुरुस्तीचे काम करत आहेत. लवकरच हा मार्ग सुरळीत होईल, असे आश्वासन येथील अधिकाऱ्यांनी दिले आहे.

पाहा व्हिडिओ-

पुढील गाड्या रद्द झाल्या आहेत-

11122 वर्धा-भुसावळ JCO 24.10.2022 12140 नागपूर-CSMT JCO 23.10.2022 (धामणगाव ते नागपूर परत आणि रद्द) 12119 अमरावती-नागपूर JCO 24.10.2022 11040 गोंदिया-कोल्हापूर JCO 24.10.2022 01372 वर्धा-अमरावती JCO 24.10.2022 17642 नरखेर-काचेगुडा जेसीओ २४.१०.२०२२ 11121 भुसावळ-वर्धा JCO 24.10.2022 12106 गोंदिया-CSMT JCO 24.10.2022 12136 नागपूर-पुणे JCO 24.10.2022 12120 अजनी-अमरावती JCO 24.10.2022 12140 नागपूर-CSMT JCO 24.10.2022 01374 नागपूर-वर्धा JCO 24.10.2022

Non Stop LIVE Update
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब.
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय.
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.