Konkan Ganeshotsav | कोकणात 12 ऑगस्टपर्यंत पोहोचणं आवश्यक, परिवहन मंत्र्यांनी सर्व नियम सांगितले

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करण्याबद्दल अनेक निर्बंध घालण्यात आले (Anil Parab On Konkan Ganeshotsav ST bus booking) आहेत.

Konkan Ganeshotsav | कोकणात 12 ऑगस्टपर्यंत पोहोचणं आवश्यक, परिवहन मंत्र्यांनी सर्व नियम सांगितले

मुंबई : कोकणातील गणेशोत्सव आणि चाकरमानी हे एक वेगळे समीकरणं आहे. दरवर्षी हजारो चाकरमानी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात दाखल होतं असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करण्याबद्दल अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांकडून क्वारंटाईन, ई-पास, कोरोना चाचणी याबाबत अनेक प्रश्न उपस्थिती केले जात होते. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वपूर्ण नियम सांगितले. (Anil Parab On Konkan Ganeshotsav ST bus booking)

“गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक चाकरमानी कोकणात निघाले आहेत. त्यांनी 12 ऑगस्टपर्यंत कोकणात पोहोचणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर त्यांना केवळ दहा दिवसच होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तसेच जे चाकरमानी एसटीने प्रवास करतील त्यांना ई-पासची आवश्यकता नाही,” असे अनिल परब म्हणाले.

“कोकणवासियांसाठी एसटीची सेवा सुरु केली जाणार आहे. जर 22 जण एकत्रित असतील आणि त्यांनी ग्रुप बुकिंग केले तर थेट गावापर्यंत विशेष एसटी दिली जाईल. या प्रवासात एसटी कुठेही थांबणार नाही. आज (4 ऑगस्ट) संध्याकाळी 6 पासून ऑनलाईन बुकिंगला सुरुवात होणार आहे. हव्या तितक्या बस सोडल्या जातील. मात्र गर्दी करु नका,” असेही आवाहन अनिल परब यांनी केले. (Anil Parab On Konkan Ganeshotsav ST bus booking)

“जे प्रवाशी एसटीने जातील, त्यांना ई-पासची गरज असणार नाही. मात्र इतर वाहनांनी जाणाऱ्यांसाठी ई-पास गरजेचा असणार आहे. खासगी बस वाल्यांनी एसटी भाड्यापेक्षा दीडपटचं भाडे घ्यावे. जर याबाबतच्या तक्रारी आल्या तर कारवाई केली जाईल.”

“जे चाकरमानी कोकणात जातील, त्यांनी 12 ऑगस्टपर्यंत गणेशोत्सवासाठी पोहचावे. त्यांना दहा दिवस क्वारंटाईन कालावधी असेल. जे 12 ऑगस्टनंतर कोकणात जातील त्यांना गेल्या 48 तासात कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे.”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत एसटीला 550 कोटी मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे, असेही अनिल परब यांनी सांगितले.

अनिल परब यांच्या महत्त्वपूर्ण घोषणा 

  • गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणवासियांनी 12 ऑगस्टपर्यंत पोहचावे
  • मुंबईकरांना दहा दिवस क्वारंटाईन
  • एसटी हाच ई-पास, एसटी नसेल तर ई-पास बंधनकारक
  • हव्या तितक्या बस
  • 22 जण एकत्र आले तर गावापर्यंत एसटी
  • एसटी कुठेही थांबणार नाही, जेवायला थांबणार नाही
  • खासगी बसला दीडपट पेक्षा जास्त तिकीट नको (Anil Parab On Konkan Ganeshotsav ST bus booking)

संबंधित बातम्या :

Konkan Ganeshotsav | मुंबईतून हजारो चाकरमानी कोकणात, सरकारने सोय न केल्याने ई-पासमध्ये भ्रष्टाचार, विरोधकांचा आरोप

मोदींवर गोध्रा, अमित शाहांवर सोहारुबुद्दीन-लोहिया खटल्याचे आरोप, आदित्य ठाकरेंची इमेज खराब करण्याचा प्रयत्न : अनिल परब

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *