असुरक्षित वाटत असेल तर फडणवीसांनी राज्य सोडणे हाच उपाय : शिवसेना

अमृता फडणवीस यांनी नाव न घेता मुंबई पोलिसांवर केलेल्या टीकेला राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे

असुरक्षित वाटत असेल तर फडणवीसांनी राज्य सोडणे हाच उपाय : शिवसेना

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नाव न घेता मुंबई पोलिसांवर केलेल्या टीकेला राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे (Anil Parab Answer To Amruta Fadnavis). “पाच वर्षात फडणवीस सरकारने पोलिसांची स्तुती केली, सतत पोलिसांना शाबासकी दिली, पोलिसांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहिले. पण, केवळ खुर्ची गेली म्हणून त्यांना असुरक्षित वाटत असेल तर त्यांच्यासाठी हे राज्य सोडून जाणं हाच एक उपाय असू शकतो. मुंबईतील असा कुठला नागरिक म्हणला आहे की, आम्ही असुरक्षित आहोत? अमृता फडणवीस यांना असुरक्षित वाटण्यासारखं काय घडलंय? त्याच पोलिसांची सुरक्षा घेऊन आज त्या फिरत आहेत”, अशी टीका अनिल परब यांनी अमृता फडणवीसांवर केली (Anil Parab Answer To Amruta Fadnavis).

अमृता फडणवीसांचा मुंबई पोलिसांवर निशाणा

“बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले जात आहे – मला वाटते मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी जगणे यापुढे सुरक्षित वाटत नाही” अशा आशयाचे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. याच ट्विटला शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. याआधी युवासेनेचे सरचिटणीस वरुन सरदेसाई, त्यानंतर शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि आता अनिल परब यांच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

हेही वाचा : अमृता फडणवीसांचा नाव न घेता मुंबई पोलिसांवर निशाणा, देवेंद्र फडणवीस म्हणतात….

अनिल परब नेमकं काय म्हणाले?

गेले पाच वर्ष फडणवीस सरकार होतं. यादरम्यान पोलीसदेखील तेच होते. सरकार बदललं म्हणजे पोलीस बदलत नाही. ज्या पोलिसांच्या सुरक्षेत गेले पाच वर्ष त्या होत्या त्या पोलिसांवरच त्यांचा अविश्वास असेल तर त्यांनी खुशाल हे राज्य सोडून जावं, असं अनिल परब म्हणाले (Anil Parab Answer To Amruta Fadnavis).

ज्या पोलिसांची सुरक्षा घेऊन त्या पाच वर्ष फिरल्या त्याच पोलिसांपासून त्यांना असुरक्षितता वाटतंय? सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात शंभर टक्के राजकारण केलं जात आहे. खुर्ची गेल्याची जी तडफड आहे ती याच्यातूनच दिसते, असं म्हणत अनिल परबांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

“अशी कुठली गोष्ट घडली की, अमृता फडणवीसांना असुरक्षित वाटू लागलं? सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची केस मुंबई पोलीस हाताळत आहेत. मुंबई पोलीस सक्षम आहेत. ते केस व्यवस्थित हाताळतील. कुणीही सीबीआयची मागणी केली म्हणून सीबीआयकडे प्रकरण दिलं जात नाही. सीबीआयला ते प्रकरण देताना कारणं द्यावी लागतात की, ते प्रकरण का देत आहोत? या सगळ्या गोष्टींचा मुंबई पोलिसांनी खुलासा केला आहे. हे राजकारण आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर हे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत”, असा सवाल अनिल परबांनी उपस्थित केला.

“गेल्या पाच वर्षात किती आत्महत्या झाल्या? त्या आत्महत्यापैकी किती प्रकरणं तुम्ही सीबीआयकडे दिले? मागच्या पाच वर्षात किती हत्याकांड झाले? त्यापैकी किती प्रकरणं तुम्ही सीबीआयकडे दिले? याचा एकदा लेखाजोखा होऊन जाऊदे. मग याच प्रकरणाबाबत सीबीआय का? केवळ राजकारण करायचं म्हणून हे होत आहे. पण मुंबई पोलीस सक्षम आहेत. राज्य सरकार मुंबई पोलिसांच्या पाठीमागे ठामपणे उभं आहे. मुंबई पोलीस याचा समर्थपणे तपास करतील. या प्रकरणात खरंच कुणी आरोपी असेल तर तो सूटणार नाही”, असंही अनिल परब यांनी सांगितलं.

Anil Parab Answer To Amruta Fadnavis

संबंधित बातम्या :

‘नशीब, मुख्यमंत्री स्वतःचं गुणगान ‘गात’ नाहीत’, अमृता फडणवीसांना शिवसेनेचं उत्तर

आधी आदित्य ठाकरेंचा ‘रेशीम कीडा’ उल्लेख, आता रश्मी ठाकरेंबद्दल अमृता फडणवीस म्हणतात….

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *