आधी आदित्य ठाकरेंचा ‘रेशीम कीडा’ उल्लेख, आता रश्मी ठाकरेंबद्दल अमृता फडणवीस म्हणतात….

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह (Amruta Fadnavis exclusive on TV9 Marathi) संवाद साधला.

आधी आदित्य ठाकरेंचा 'रेशीम कीडा' उल्लेख, आता रश्मी ठाकरेंबद्दल अमृता फडणवीस म्हणतात....

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह (Amruta Fadnavis exclusive on TV9 Marathi) संवाद साधला. यावेळी अमृता फडणवीस यांना सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत विचारण्यात आलं. अमृता फडणवीस यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा रेशीम कीडा असा उल्लेख केला होता. त्या वादावरही अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं. शिवाय त्यांनी मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांच्यावरही प्रतिक्रिया दिली. (Amruta Fadnavis exclusive on TV9 Marathi)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या खूप लोकांच्या आदर्श आहेत. त्या इन्स्पायरिंग वुमन आणि फर्स्ट लेडी ऑफ महाराष्ट्र आहेत. रश्मी ठाकरे आणि माझं बॉडिंग चांगलं आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. मी ‘मातोश्री’वर गेले होते तेव्हा त्यांनी माझा पाहुणचार केला होता. शिवाय रश्मी ठाकरे जेव्हा वर्षा बंगल्यावर आल्या होत्या, तेव्हा मी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले होते, अशी आठवण अमृता फडणवीस यांनी सांगितली.

रश्मी ठाकरे यांची जेव्हा सामना दैनिकाच्या संपादकपदी निवड झाली, त्यावेळी अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन त्यांचं अभिनंदन केलं होतं. “रश्मी ठाकरे यांचं सामनाच्या संपादकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. देशातील महिला आणि समाजातील असंख्य समस्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देशातीला महिलांना उच्चपदावर जाण्याची गरज आहे,” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

‘आपलं कोण, परकं कोण समजलं’

दरम्यान, मागच्या काही महिन्यात माणसांची खरी ओळख पटली. कोण आपलं हे कळलं, लोक कसे वागू शकतात हे समजलं. राजकारणात कुणीही कुणाला कधीही धोका देऊ शकतं हे कळलं, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी टीव्ही 9 च्या मुलाखतीत शिवसेना-भाजपच्या फाटाफुटीवर भाष्य केलं.

नुकतंच झालेल्या आदित्य ठाकरेंबाबतच्या वादावर अमृता फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या “आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेवर मी आजही ठाम आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या माणसाने ज्यांनी महिला सक्षमीकरणासाठी कायम आवाज उठवला, अशा माणसाला महिलांची माफी मागायला सांगितली हे पटलं नाही”

नेमका वाद काय होता?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उद्देशून बांगड्यांवरुन केलेल्या वक्तव्याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनादरम्यान आझाद मैदानातील भाषणावेळी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, ‘शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही असं म्हटलं होतं’. त्याला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन माफी मागण्याची विनंती केली होती.

त्यावर मग अमृता फडणवीस यांनीही ट्विट करुन आदित्य ठाकरेंना उत्तर दिलं होतं.  ‘रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो’, अशा आशयाचं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या ट्वीटला कोट करत दिलं होतं.

संबंधित बातम्या 

बांगड्या वाद : आधी आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर, आता अमृता फडणवीसांचा पलटवार

Published On - 4:07 pm, Sat, 7 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI