AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये 781 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.70 टक्के

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 387 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 781 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नाशिकमध्ये 781 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.70 टक्के
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 5:42 PM
Share

नाशिकः जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 387 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 781 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 654 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी रविवारी दिली.

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 54, बागलाण 8, चांदवड 18, देवळा 7, दिंडोरी 22, इगतपुरी 4, कळवण 16, मालेगाव 7, नांदगाव 12, निफाड 108, पेठ 1, सिन्नर 156, त्र्यंबकेश्वर 10, येवला 66 अशा एकूण 489 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 260, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 10 तर जिल्ह्याबाहेरील 22 रुग्ण असून असे एकूण 781 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 9 हजार 822 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांत नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 12, बागलाण 1, चांदवड 2, देवळा 2, दिंडोरी 6, कळवण 5, मालेगाव 3, नांदगाव 2, निफाड 17, सिन्नर 50, त्र्यंबकेश्वर 7, येवला 19 असे एकूण 126 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे 97.02 टक्के, नाशिक शहरात 98.16 टक्के, मालेगाव मध्ये 97.05 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.49 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.70 टक्के इतके आहे.

डेंग्यू, चिकुन गुन्याही वाढला

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या साथीचे थैमान काही केला कमी व्हायला तयार नाही. जानेवारी ते ऑक्टोबरच्या दरम्यान डेंग्यूचे एकूण 2295 नमुने घेण्यात आले. त्यात 888 रुग्ण सापडले आहेत. तर याच काळात चिकुन गुन्याचे 2295 नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यात 633 रुग्ण आढळले आहेत. आता परतीच्या पावसाने थैमान घातल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यात या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. सध्याच्या आठवड्यात महापालिकेने 258 रुग्णांचे नमुने तपासले. त्यातही 55 डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे समोर येत आहे. महापालिकेने चिकुन गुन्याचे 94 नमुने तपासले आहेत. त्यात 23 रुग्ण सापडले आहेत. रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीचेही रुग्ण वाढले आहेत. अनेक खासगी रुग्णालये हे डेंग्यू तसेच चिकुन गुन्याच्या रुग्णांनी भरली आहेत. बऱ्याच रुग्णालयात रुग्णांसाठी खाटा मिळत नसल्याचे चित्र आहे. सिन्नर, येवला, निफाडमध्ये वाढते कोरोना रुग्ण पाहता जिल्ह्यात अजूनही तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे.

इतर बातम्याः

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीबाबत 2869 उमेदवारांच्या तक्रारी; नाशिकमध्ये संचालकांनी केले शंका निरसन

Gold Special: खणखणीत परतावा देणारा हुकमी नाणं म्हणजे बावनकशी सोनं, कसं ते जाणून घेऊयात!

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.