Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे तुम्ही आदेश काढला, पण या आजीचं काय? तिने काय करायचं? तिची व्यथा पण ऐका
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी अन्न भेसळ विरोधात कारवाईचा धडाका लावला असून सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घतली आहे. यामुळे गरिबांच्या घरातील चूल पेटण्यात मोठ्या अडचणी येत आहे. हे वास्तव एका व्हिडीओतून समोर आलं आहे.

Tukaram Mundhe : आज सर्वत्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी अन्न भेसळ विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. त्याच्या या कारवाईने मध्यमवर्गीय आणि सुखवस्तू कुटुंबात समाधानाचं वातावरण आहे. पण ज्यांचं पोट हातावर आहे, त्यांनी करायचं तरी काय असा प्रश्न उपस्थित राहत आहे. मुंढे यांनी सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घतली आहे. यामुळे गरिबांच्या घरातील चूल पेटण्यात मोठ्या अडचणी येत आहे. हेच वास्तव दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक आजीबाई दिसत आहेत. त्यांनी गोडं तेलं हवं आहे… जाणून घ्या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला दुकानदार विचारतो, आजी काय लागतंय तुम्हाला 15 रुपयांचं…? त्यावर आजी म्हणतात, ‘गोडं तेल…’, पण दुकानदार म्हणतो, ‘जास्त घ्या ना आजी…’, पण पुरेसे पैसे नसल्यामुळे 15 रुपयांच्यावर तेल खरेदी करणं आजीबाईंना परवडणारं नव्हतं. आजी म्हणतात, ’15 रुपयांचं काय द्यायंच ते द्या आता, जास्त घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीत.’, पुढे दुकानदार म्हणतो, ‘पाव शेर घ्या ना…’, यावर आजीबाई म्हणतात, ‘घेतलं असतं पण पैसे नाही…’, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल आहेत. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मदत कर भाऊ त्या आजीला देव तुझं भलं करेल..’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मुंढे साहेब हा व्हिडीओ बघत आहात का, तुम्ही यावर काही उपाय काढा…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मुंढे साहेबांना एक विनंती आहे, की कंपनीला एक विनंती करून अर्धा किलो आणि पावशेरचं पॅकेट बनवायला सांगा’, अनेकांना सरकारवर निशाणा साधला आहे. हे सरकारच बदललं पाहिजे… अशी देखील अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.
सांगायचं झालं तर, तेलातील भेसळ रोखण्याच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी सुटे तेल विक्री बंदी जाहीर केली आहे. जे योग्य आहे, पण गरिबांना याचा मोठा फटका बसत आहे. कारण तेलाच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहेत.