AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा झटका, बड्या नेत्यानं सोडला पक्ष, शिंदेंच्या शिलेदारानं गेम फिरवला

शिवसेना ठाकरे गटातील अनेक दिग्गज नेत्यांनी आतापर्यंत महायुतीमध्ये प्रवेश केला आहे, दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर आली असून, पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा झटका, बड्या नेत्यानं सोडला पक्ष, शिंदेंच्या शिलेदारानं गेम फिरवला
uddhav thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 23, 2026 | 9:18 AM
Share

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्याचं पहायला मिळालं. परंतु त्यानंतर लगेच काही दिवसांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र हे यश महाविकास आघाडीला टिकवता आलं नाही, आणि राज्यात लोकसभा निवडणुकीत बॅकफूटवर गेलेल्या महायुतीचं जोरदार कमबॅक झालं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. या पराभवाच्या धक्क्यानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पहायला मिळालं, अनेक दिग्गज नेत्यांनी महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये प्रवेश केला, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान आता पुन्हा एकदा एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटला आणखी एक मोठा झटका बसला आहे.  शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख तसेच माजी युवा सेना जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते डॉ. चेतन बोराडेंसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.

एकीकडे धाराशिव जिल्हा हा ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असताना, ठाकरे गटातील पदाधिकारी एकापाठोपाठ पक्षांतर करत आहेत, यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढताना दिसत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच राज्यात ऑपरेशन टायगर पार पडलं, हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का होता. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी वेगळा गट निर्माण करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे राज्यात आता शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खासदारांचा आकडा वाढला आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडे फक्त तीनच खासदार उरले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आता  ठाकरे यांना धाराशिवमध्ये हा मोठा धक्का बसला आहे.

Follow Us
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’