Tukaram Mundhe Video : तुकाराम मुंढेंनी सगळा थाटमाट सोडला, मित्रांसाठी प्रेमाने बनवला चहा, व्हिडीओ पाहून देशभरात होतंय कौतुक!

तुकाराम मुंढे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत तुकाराम मुंढे हे आपल्या मित्रांसाठी, जवळच्या लोकांसाठी चक्क चहा तयार करताना दिसत आहेत.

Tukaram Mundhe Video : तुकाराम मुंढेंनी सगळा थाटमाट सोडला, मित्रांसाठी प्रेमाने बनवला चहा, व्हिडीओ पाहून देशभरात होतंय कौतुक!
tukaram mundhe making tea for friends
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 10, 2026 | 4:41 PM

Tukaram Mundeh Video : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. नियमांचे काटेकोर पालन आणि कठोर शिस्त यामुळे ते फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. अन्न व औषध विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात कठोर कारवाई केली. खाद्यपदार्थांत भेसळ करणारे अनेक रेस्टॉरंट्स तसेच हॉटेल्सचे परवानेच त्यांनी रद्द केले आहेत. त्यांच्या येण्याने अन्न व औषध प्रशासन विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांना एक जरब बसली आहे. आता लवकरच मी चायनीज फुडमधील भेसळ रोखण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे, असे संकेत नुकतेच तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या भीतीने अनेक व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन सुरू केले आहे. दरम्यान, नियमांच्या बाबतीत कठोर पवित्रा घेणारे तुकाराम मुंढे मात्र आपल्या घरी, मित्रांसोबत किती दिलखुलास असतात, याची प्रचिती समोर आली आहे. तुकाराम मुंढे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत तुकाराम मुंढे हे आपल्या मित्रांसाठी, जवळच्या लोकांसाठी चक्क चहा तयार करताना दिसत आहेत.

तुकाराम मुंढे आपल्या परिजनांसोबत…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुकाराम मुंढे घरातल्या किचनमध्ये दिसत आहेत. ते चक्क किचनमध्ये उभे राहून आपल्या मित्रांसाठी चहा बनवत आहेत. या व्हिडीओमध्ये तुकाराम मुंढे यांचे बंधू अशोक मुंढे हेदेखील दिसत आहेत. कोणत्याही दबावाला न जुमानता काम करणारे तुकाराम मुंढे आपल्या परिजनांसोबत, कुटुंबासोबत तसेच मित्रांसोबत असल्यावर किती हळवे होतात, याची प्रचिती या व्हिडीओतून येत आहे.

तुकाराम मुंढे बनवत असलेला चहा…

दरम्यान, तुकाराम मुंढे यांचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काही नेटकऱ्यांनी तुकाराम मुंढे बनवत असलेला चहा हा ‘एफडीएने अप्रुव्ह केलेला चहा आहे,’ अशी कमेंट केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us