Breaking : तुर्भे एमआयडीसीत रबर कंपनीला भीषण आग; 3 कंपन्या जळून खाक, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

| Updated on: May 06, 2022 | 11:44 PM

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी परिसरातील नागरिकांना बाहेर काढत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

Breaking : तुर्भे एमआयडीसीत रबर कंपनीला भीषण आग; 3 कंपन्या जळून खाक, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न
तुर्भे MIDC मध्ये भीषण आग, 3 कंपन्या जळून खाक
Image Credit source: TV9
Follow us on

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी (Turbhe MIDC) परिसरात एका रबर कंपनीला भीषण आग लागली आहे. रबराच्या कंपनीमध्ये आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या (Fire Bridge) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न (Attempts to extinguish the fire) सुरु आहेत. धुराचे उठलेले लोट पाहता ही आग खूप मोठी असल्याचा अंदाज आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी परिसरातील नागरिकांना बाहेर काढत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

तुर्भे एमआयडीसी परिसरातील औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना आहे. ठाणे, नवी मुंबई महापालिकेच्या 5 च्या वर अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या तरी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागलेली कंपनी ही डांबरची कंपनी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सध्या कंपनी परिसरात आगीचे लोळ उठलेले पाहायला मिळत आहेत. तसंच आजुबाजूच्या परिसरात मोठ्याप्रमाणात आगीच्या झळा जाणवत आहेत. सध्या आग कशामुळे लागली आहे ? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

आगीत 3 कंपन्या जळून खाक

संध्याकाळी हाती आलेल्या माहितीनुसार या आगीत 3 कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. तर ही आग 7 कंपन्यांमध्ये पसरली आहे. आगीचे लोट इतके प्रचंड आहेत की अग्निशमन दलाला आग विझवणं कठीण जात आहे. तरीही अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

डिसेंबरमध्येही भीषण आग, 40 – 45 बीएमडब्ल्यू कारची राख

8 डिसेंबर 2021 रोजीही तुर्भे एमआयडीसीत भूखंड क्रमांक डी – 207 येथील बीएमडब्ल्यू वर्कशॉपमध्ये आग लागली होती. या आगीत जवळपास 40 – 45 बीएमडब्ल्यू कार जळून खाक झाल्या होत्या. आग मोठी होती त्यामुळे एमआयडीसीसह कोपरखैरणे, नेरुळ आणि शिरवणे येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत ती आग आटोक्यात आणली होती. या आगीत बीएमडब्ल्यू वर्कशॉपमधील कार्यालयासह सर्व फर्निचन आणि कागदपत्रे जळून खाक झाली होती.