
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज शिर्डी दौरा आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि अन्य मंत्र्यांसमवेत हॉटेल सन ॲन्ड सँड येथे मुक्कामी आहेत. शिर्डी नगरी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. सकाळी ११ वाजता साई दर्शनाने त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळावा, तर कोपरगाव येथे कोल्हे कारखान्याच्या CNG प्रकल्पाचे उद्घाटन आणि शेतकरी मेळावा असे त्यांचे कार्यक्रम आहेत. दरम्यान, शाह आणि प्रमुख नेत्यांमध्ये रात्री झालेल्या बैठकीनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात पुणे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांनी दहशतवादी हल्ला परतवून लावण्याचे मॉक ड्रिल शनिवारी मध्यरात्री केले. याचाच भाग म्हणून पुणे पोलिसांनी फर्ग्युसन रस्ता आणि महात्मा गांधी रस्त्यावर डमी स्फोट घडवून परिस्थिती नियंत्रणात आणली. नागरिकांनी घाबरू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे केळी, पपई या फळबागांसह कापूस, सोयाबीन, मका, उडीद या सुमारे चौदाशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
सफाळे–विरार रो-रो सेवा बोट चा हॅड्रॉलिक पाईप फुटल्याने म्हारंबळपाडा जेटी जवळ समुद्रात अडकली होती. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि वाहन भरल्याने ही घटना घडल्याचे सागण्यात येत आहे. 200 पेक्षा जास्त प्रवासी आणि 75 पेक्षा जास्त वाहने यात भरल्याने ही घटना घडली आहे. दोन तासांपासून बोट अडकल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र नंतर सर्व प्रवाशी आणि वाहनांना सुखरूप बाहेर काढले आहे. बोटीचा रॅम उचलणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा पाईप तुटला होता.
-नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा उद्या भव्य मोर्चा आहे. इतर कोणत्याही जातीला ST प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. आदिवासींच्या घटनात्मक आरक्षणाचा संरक्षण करण्यासाठी उद्या मोर्चाचे आयोजन केलं आहे. भाजपाचे आमदार भीमराव केराम यांनी ही माहिती दिली.
डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाहन चालकाने आधी बालगंधर्व रंगमंदीरजवळ एका दुचाकीला धडक दिली, यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. या तरुणाने माझी काही नुकसान झाले नाही, म्हणून तक्रार देण्यास नकार दिला आहे. काही अंतरावर असलेल्या एका दुभाजकावर वाहन चढवल्याने वाहनाचा मोठे नुकसान झाले.
वसई–विरार परिसरातील बिकट रस्त्यांच्या स्थितीवरून बहुजन विकास आघाडीने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार संताप व्यक्त करत माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढला.
बंगालमधील दुर्घटनेत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. ममता बॅनर्जी उद्या सिलिगुडीला भेट देतील आणि समिक भट्टाचार्य उद्या उत्तर बंगालला भेट देतील. एनडीआरएफने 17 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
-नाशिक शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी 50 लाख रुपये देण्या घोषणा केली आहे. मंत्री दादा भुसे यांच्याकडून ही घोषणा केली आहे.
एका महत्त्वपूर्ण निर्णयात, महाराष्ट्र सरकारने आता राज्यातील सर्व गैर मद्यपी (non-alcoholic) दुकाने आठवड्याचे सातही दिवस (24×7) 24 तास उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम मुंबई शहरावरही होईल. निवडक दुकाने आता रात्रभर ग्राहकांसाठी खुली राहतील.
बिहार विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, 22 नोव्हेंबरपूर्वी निवडणुका पूर्ण होतील.
मनसे नेते अविनाश जाधव यांनी युतीबाबत भाष्य केले आहे. महायुतीत जायचं की युतीत याबाबत राज ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं जाधव यांनी म्हटलं आहे. ते जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले की, पावसामुळे आणि पुरामुळे शेतकरी खचलाय, मोडून पडलाय त्याला आधार देण्याची गरज आहे. सरकार धीर देण्याऐवजी जखमेवर मीठ चोळतंय. सोलापूर जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देतेय.
ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी रामदास कदम यांच्यावर खोचक टीका केली आहे. ‘रामदास कदम तुम्ही 8 दिवस मातोश्रीबाहेर मुक्कामी होता त्यावेळी झाडून काढत होता आणि झंडू बाम शोधत होता. रामदास कदम खाल्लेल्या मिठाला जागा, भाजपचे सालगडी म्हणून तुमचा वापर होतोय. झंडू बाम, झंडू बाम, रामदास कदम झालाय जाम असं कोळी यांनी म्हटलं आहे.
अमरावतीच्या नरसम्मा महाविद्यालयात विजयादशमी उत्सवाचा मुख्य सोहळा काही वेळातच सुरु होणार आहे. अमरावती शहरातून RSS स्वयंसेवकांच्या पथसंचलनाला सुरवात झाली आहे. दोन हजार RSS चे गणवेश धारी स्वयंसेवक पथ संचलनात सहभागी झाले आहेत. 7 वाजता मुख्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमाला भाजप खासदार अनिल बोंडे यासह अमरावती जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार उपस्थित राहणार आहेत.
अमरावतीत आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव सोहळा.
अमरावतीच्या नरसम्मा महाविद्यालयात विजयादशमी उत्सवाच्या मुख्य सोहळाला काही वेळातच होणार सुरुवात.
अमरावती शहरातून RSS स्वयंसेवकांचं पथसंचलन
दोन हजार संघ स्वयंसेवक पथसंचलनात सहभागी
7 वाजता मुख्य सोहळ्याला होणार सुरुवात
धाराशिवमध्ये पाण्यात बसून शेतकऱ्यांचं आंदोलन
धाराशिवच्या सातेफळ येथे पाण्यात बसून शेतकऱ्यांचं आंदोलन
सातबारा कोरा करण्याची सरकारकडे मागणी
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाने हाहाकार
पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान
कल्याण–शील रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या, नागरिकांना मनस्ताप
दोन मिनिटांच्या रस्त्यांसाठी होतो तीन तास वाहतुकीचा खोळंबा
वाहतूक कोंडीमुळे त्रस्त नागरिक उतरले रस्त्यावर
बाईक रॅली काढत संतप्त नागरिकांनी प्रशासनाचा केला निषेध
गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघातापूर्वीचा सीसीटिव्ही समोर
अपघातपूर्वी वाहनातून २ व्यक्ती खाली उतरल्याचे व्हिडिओमधून समोर
चालकाच्या शेजारील आणि पाठीमागे बसलेली व्यक्ती अपघातपूर्वीच खाली उतरल्याचे स्पष्ट
पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात गेल्या आठवड्या झाला होता अपघात
GST रिफॉर्ममध्ये शेतकऱ्यांशी संबंधित अनेक बाबी 5 टक्क्यांवर आणल्या आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी अहिल्यानगर येथे एका कार्यक्रमात सांगितले.
25 साखर कारखान्यांना NCDC च्या माध्यमातून अशा CNG आणि पोटॅश उत्पादन प्रकल्पांना केंद्र सरकार मदत करणार असल्याची भाजपा नेते अमित शहा यांची घोषणा.
भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांची स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने आज सायंकाळी सत्कार होणार आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी थेट शेतावर जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. राज ठाकरे यांच्या आदेशाने ही मदत केली गेली. शेतकऱ्यांना 25 हजाराचा धनादेश आणि बी-बियाणे वाटप करण्यात आले. कोणतेही आश्वासन न देता, थेट कृती करून मनसेने शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीचे समर्थक यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवर आंदेकर समर्थनार्थ स्टोरी अपलोड केल्या होत्या. “बदला तो फिक्स” म्हणत आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रिल्स अपलोड करणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली आहे.
सांगली जिल्हा बँक नोकर भरती प्रकरणी सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट सहकार मंत्र्यांच्या बंगल्यासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेबाबत सोमवारी सर्वाना घेऊन मुख्यमंत्री याना भेटणार असल्याची भाजप आमदार गोपीचंद पडळकर याची माहिती
बदलापुरात शैलेश वडनेरे यांचा भाजपात प्रवेश झाला आहे. आमदार किसन कथोरे यांनी केलं पक्षात स्वागत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर दाखल झाले आहेत. राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमात दोघेही ठाकरे बंधू एकत्र होते. कार्यक्रमानंतर राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. परब यांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतल्याचा आरोपही कदमांनी केला आहे. तसेच परबांमुळे 8 हजार मराठी माणूस मुंबईबाहेर गेल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे. तसेच परब यांच्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचंही रामदास कदम म्हणाले.
‘शेवटचे दोन दिवस बाळासाहेबांची बॉडी का ठेवली होती?’ रामदास कदमांचा सवाल करत याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावे अशी मागणी केली आहे. तसेच यात इतर कोणाला बोलण्याचा अधिकार नाही. अनिल परब यांनी याबद्दल बोलू नये. उद्धव ठाकरेंकडे जाऊन चुगल्या करू नये. असंही कदम म्हणाले.
रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनिल परब यांनी खालच्या भाषेत टीका केल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे. ” अनिल परब चमचा, उद्धव ठाकरेंकडे चुगल्या करतो. नीच म्हणत माझ्यावर टीका केली” असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
अतिवृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे…महाराष्ट्रात 60 लाख हेक्टरहून अधिक नुकसान झालं… केंद्राने 3 हजार 132 कोटी महाराष्ट्राला दिले… नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे… असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं आहे.
औरंगाबाद आणि अहमदनगरचं नाव बदललं… हे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनुयायीच करु शकतात.
शाहांनी नव्याने सहकार रुजवण्याचं काम केलं… बाळासाहेब विखे पाटलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं म्हणून ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही राधाकृष्ण पाटलांना दिलं… आता जबाबदारी तुमची असं देखील त्यांनी सांगितलं आहे – देवेंद्रे फडणवीस
अमित शाहांच्या नेतृत्त्वात सहकार क्षेत्रात बदल… ग्रामीण भागात बँकांना नवसंजीवनी मिळाली… साखर उद्योगात अमित शाहांनी पारदर्शकता आणली – एकनाथ शिंदे
केंद्रात पहिल्यांदा सहकार खातं, हा इतिहास आहे… शाहांनी सहकारात भाकरी फिरवण्यां काम केलं… राधाकृष्ण विखे – पाटलांनी सहकाराचा वारसा जपला… असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे…
महाराष्ट्राच्या या भूमीत सहकाराती मूळं खोलवर… याच भूमीतून देशाला सहकाराचा वारला मिळाल… असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं…
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. 156 पदाच्या नोकर भरतीसंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नोकर भरतीत संचालकाकडून हेराफेरी होत असल्याच्या तक्रारी आल्याने सहकार विभागाने निर्णय घेतला आहे.
रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवर विधान केल्यानंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे आक्रमक झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवर राजकारण करत असेल तर तो शिवसैनिक असू शकत नाही. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवर जे राजकारण होत आहे हे अत्यंत निंदनीय आहे. ज्याला आपण आपलं दैवत मानतो त्याच्या मृत्यूवर होत असलेल्या राजकारण जर कोण करत असेल तर तो शिवसैनिक असू शकत नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली.
देशात सहकार चळवळींना दिशा देण्याचं काम सुरू आहे. मोदींच्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच सहकार मंत्रालय मिळालं. लोणीमधील शेतकरी मेळाव्याला अमित शाहा उपस्थित आहेत. त्याचसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा उपस्थित आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत. सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण समारंभाला ते उपस्थित आहेत.
माजी मंत्री तथा प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते शेतकऱ्यांसोबत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी इथल्या घरी जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यावरून बच्चू कडू यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरी शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन जाण्याचा इशारा दिला होता.
बच्चू कडू यांच्या या आव्हानावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत पाळधी गावात येऊन तर दाखवा असं प्रतिआव्हान दिलं होतं. यावर पुन्हा बच्चू कडू यांनी 5 तारखेला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून मंत्री गुलाबराव पाटलांच्या घरी येणार असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. आज बच्चू कडू यांच्या जळगावातील कासोदा, अमळनेर आणि चाळीसगाव इथं सभा होणार आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांनी दिलेल्या आव्हानानुसार ते आज शेतकऱ्यांना सोबत घेऊन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरी जाण्याची शक्यता आहे.
सांगलीच्या आष्टा इथं दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी आहे. ओम शेडबाळे आणि संदीप पाटील अशी मृत तरुणांची नावं आहेत. आष्टा -बागणी रोडवर रात्रीच्या सुमारास भरधाव दुचाकींचा समोरा-समोर जोरदार धडक होऊन अपघात झाला आहे.
3 महिन्यानंतर गोंदिया जिल्ह्याचा वनवैभव समजल्या जाणाऱ्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची दारं पर्यटकांसाठी खुली करण्यात आलेली आहेत. मात्र, पर्यटकांकडून जंगल सफारीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे बघायला मिळत आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या सोबतच बिबट्यांची संख्या देखील आहे. काल बिबट्याचे दर्शन काही पर्यटकांना झाले होते. आज वीकेंड असल्यामुळे गर्दी होण्याची शक्यता होती. मात्र सुरुवातीच्या दिवसातच जंगल सफारी कडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
सीना नदीला आलेल्या पुरामुळे गावात दुर्गंधी पसरल्यानंतर ग्रामस्थांनी स्वतःच स्वच्छता मोहीम राबविली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी ग्रामस्थांनी हा उपक्रम राबवला आहे. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे संपूर्ण गावात महापुराचे पाणी शिरल्यामुळे गावात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी शासनाची वाट न पाहता स्वतःच स्वच्छता मोहिमेला सुरुवात केलीय.गावातील शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर आदी परिसरातील स्वच्छतेला सुरुवात केलीय
धाराशिवच्या कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला. विजयकुमार सत्यनारायण जोशी असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. गावातील ओढ्याला आलेल्या पुरात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
जालना जिल्ह्यातल्या अंबड घनसावंगी आणि परतुर या तीन तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये मागील काही दिवसापूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. जाफराबाद तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेतर्फे घनसावंगी तालुक्यातल्या बाणेगाव,भोगगाव या गावातल्या पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात म्हणून धान्याचे वाटप करण्यात आले.पैठण येथील जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात जवळपास 3 लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे अनेक गावात पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झालं होतं.शासनाबरोबरच काही संघटना दानशूर व्यक्तींनी या पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात पुढे केल्यानंतर त्यांना गहू तांदूळ आणि इतर धान्याचे वाटप केलं होतं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे साई मंदिरात दाखल झाले आहेत.साईदर्शनाने अहिल्यानगर जिल्हा दौऱ्याची सुरूवात होत आहे. साईदर्शनानंतर विविध विकास कामांचे लोकार्पण करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंत्री अमित शाह यांच्यासोबत साईदर्शनासाठी आले आहेत
नाशिकमध्ये आज शिवसेनेच्या बूथप्रमुखांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. एकदिवशीय कार्यशाळेच्या समारोपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून बूथप्रमुखांच्या शिबिर सभागृहाची पाहणी करण्यात येईल.
मातोश्री निवासस्थानी आज दुपारी १२ महत्वाची बैठक होत आहे. उद्वव ठाकरे यांच्या उपस्थित बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत अनेक नेते उपस्थित राहतील.
बाळासाहेबांचे नाव घेण्याची लायकी रामदास कदम यांची नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. यासोबतच काही गंभीर आरोपही त्यांनी केली.
कार्यकर्त्यांना पोलिस अटक करतात आणि कुठे नेतात हे देखील सांगत नाहीत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी नुकताच म्हटले की, परबांनी रामदास कदम यांच्या कुटुंबियांचा गंभीर मुद्दा मांडला आहे आणि याची चाैकशी झाली पाहिजे.
विरारमध्ये खड्यांमुळे अपघात होऊन तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. विरार पूर्व नालासोपारा विरार लिंक रोडवर भर रस्त्याचं खड्डा पडला आहे त्याच खड्या अपघात होऊन तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
धाराशिवच्या कळंब तालुक्यातील संजीतपुर येथे तेरणा नदीचे पाणी शेतात घुसले. रात्रभर पडलेल्या असलेल्या पावसाने तेरणा नदीला पूर. शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी पाण्यामध्ये, उघडलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शेतकऱ्याच्या अडचणी वाढल्या
चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गादेवी विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान अचानक जनरेटरचा स्पोट झाल्याने दोन महिलांसह सात जण जखमी झाले आहेत. वरोरा तालुक्यातील विसलोन गावातील ही घटना असून दोन गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जालना जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार आणि परतीच्या पावसामुळे खरीप पिके—विशेषतः सोयाबीन, कपाशी, तूर—तसेच मोसंबी आणि डाळिंब यांसारख्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीची तात्काळ दखल घेत पंचनाम्याला सुरुवात केली आहे. जालना तालुक्यातील एकूण ११४ गावांपैकी ६२ नुकसानग्रस्त गावांचे पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. उर्वरित गावांमध्येही पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या १३५% म्हणजे ८६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड टोळ्यांना मर्यादित कारवाईऐवजी आर्थिक दृष्ट्या कमकुवत करण्यासाठी पुणे पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून, टोळ्यांची मालमत्ता, उत्पन्नाचे स्रोत आणि काळ्या पैशाचा बारकाईने तपास केला जाणार आहे. शहरातील गुंड टिपू पठाण, गजा मारणे आणि घायवळ यांच्यासह अन्य टोळ्यांच्या मालमत्तेची चौकशी केली जाणार आहे. या अंतर्गत, सरकारने मान्यता दिलेल्या व्हॅल्यूअरची नेमणूक करून गुंडांच्या स्थावर मालमत्ता आणि बँक खात्यांचे मूल्यांकन केले जाईल, ज्यामुळे गुंडांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा पुणे पोलिसांचा आराखडा आहे.
पुणेकरांना कोजागरी पौर्णिमेचा आनंद चांदण्यांच्या साक्षीने घेता यावा यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व उद्याने आणि बागा उद्या रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पौर्णिमेच्या निमित्ताने हजारो नागरिक पारंपरिक दुधपानाचा कार्यक्रम करण्यासाठी उद्यानांमध्ये एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून उद्यानांमध्ये पुरेशी सुरक्षितता, प्रकाश योजना आणि स्वच्छतेची विशेष व्यवस्था केली जाणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज शिर्डी दौऱ्यावर असून, त्यांच्या स्वागतासाठी शिर्डीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांसह शाह हॉटेल सन ॲन्ड सँड येथे मुक्कामी आहेत. सकाळी ११ वाजता साई दर्शनाने त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होईल. त्यानंतर लोणी (प्रवरानगर) येथे कारखान्याच्या नूतनीकरणासह पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्यांचे अनावरण आणि शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. तसेच, कोपरगाव येथील कोल्हे कारखान्याच्या सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन करून ते शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत. विशेष म्हणजे, शाह आणि मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी मदतीची घोषणा होते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
णे जिल्ह्यासाठी यंदाचा मान्सून समाधानकारक ठरला असून, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही प्रमुख धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणे पूर्णपणे भरली आहेत. परिणामी, पुणे शहर आणि जिल्ह्याच्या पाण्याची पुढील वर्षाची चिंता सध्या तरी मिटली आहे.
राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाच्या प्रति टन १५ रुपये कपातीच्या घेतलेल्या निर्णयाला जालना जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. हा निर्णय तुघलकी आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे संघटनेचे मत आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी निधी गोळा करण्यासाठी फक्त शेतकरीच राहिले आहेत का? असा संतप्त सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. नेते, उद्योगपती आणि नोकरदार यांच्याकडून खरी वसुली होणे गरजेचे आहे, असे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी म्हटले आहे. सरकारने हा निर्णय तात्काळ रद्द करावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे.
महायुतीच्या विरोधात ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नाद निवासस्थानी नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. याचा व्हिडीओ आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्याच्या तयारीतील हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार राजन विचारे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, आणि मनसे नेते अविनाश जाधव उपस्थित होते. ठाण्यातील प्रमुख समस्या जसे की वाहतूक कोंडी, डम्पिंग, पाणी समस्या, अनधिकृत बांधकामे, सेवा रस्ते, मेट्रोचे प्रश्न आणि ठाणे महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात येत्या काळात एकत्रित मोर्चा काढण्याची तयारी या सर्व विरोधी पक्षांनी दर्शवली आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना शनिवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये १२ प्रभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. १६५ नगरसेवकांसाठीच्या ४१ प्रभागांच्या प्रारूप रचनेवर आलेल्या ५,९२२ हरकतींपैकी १,३२९ हरकती पूर्णतः आणि ६९ हरकती अंशतः मान्य करत हे बदल झाले आहेत. हरकती विचारात घेऊन आठ प्रभागांच्या नावांमध्येही बदल करण्यात आले आहेत.