
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन सोमवारी जम्मूमध्ये होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध प्रस्ताव विधानसभेत मांडला जाईल.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. एकूण 18 जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. नाशिक येथील दर्गा प्रकरणी दंगलीतील संशयितांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. समीर पठाण, गुफरन तांबोळी या दोघांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. राज्यातील अनेक भागांत पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. यासह राज्यातील, देशभरातील सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
पावसाचा पिकांना मोठा फटका, शेतकरी संकटात
हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा
डोंबिवलीत रिक्षावाल्यांची दादागिरी
प्रवाशाला अरेरावीची भाषा
प्रवाशाला जबरदस्ती रिक्षातून खाली उतरवले
प्रवाशाने घटनेचा व्हिडिओ काढताच रिक्षाचालकाने ठोकली धूम
*
सोलापूर बाजार समितीवर भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलचा दणदणीत विजय
18 पैकी 15 जागा जिंकल्या, बाजार समितीमध्ये भाजपची सत्ता
18 पैकी 15 जागा जिंकल्या 3 जागांवर पराभव झाला, तिथे पराभव का झाला याचं चिंतन करणार
निवडणूक निकालानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रतिक्रिया
डोंबिवलीतील रात्रीच्या सुमारास भररस्त्यात चाकूचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत नागरिकांची लुट केल्याचा प्रकार घडला आहे. डोंबिवली रामनगर पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आणखी 3 जागांचे निकाल हाती आले आहेत. हमाल तोलार गटातून सचिन कल्याण शेट्टी पॅनलचे उमेदवार गफार चांदा विजयी झाले आहेत. तसेच विद्यमान संचालक तथा अपक्ष उमेदवार भीमा सीताफळे यांना पराभव सहन करावा लागला आहे. तर व्यापारी गटातून मुस्ताक चौधरी आणि वैभव बरबडे विजयी झाले आहेत. विविध कार्यकारी सोसायटीत कोण बाजी मारतंय यावर बाजार समितीची सत्ता कोणाकडे जाते हे ठरणार. आत्तापर्यंत एकूण 18 पैकी 7 जागांचे निकाल हाती आलेत. यामध्ये 3 जागा सुभाष देशमुख गटाकडे, 1 जागा सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलला मिळाली आहे.
सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्या म्हणाल्या “पहलगाम मध्ये दुखत घटना घडली. मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. त्या ठिकाणी 1 मे ला नागरिक शौर्य म्हणून पुरस्कार द्यावा अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी. ही वेळ टीका करण्याची वेळ नाही आम्ही भारत सरकार बरोबर आहोत. भारत सरकार योग्य पाऊल टाकेल असा विश्वास आहे.” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी पत्रद्वारे मुख्यमंत्र्यांना काय विनंती केली आहे त्याबद्दल खुलासा केला आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांची काय चूक होती? 26 वर्षानंतर पहिल्यांदाच काश्मीरमध्ये तीव्र संताप पाहिला. दहशतवाद्यांच्या विरोधात पहिल्यांदाच पूर्ण काश्मीर रस्त्यावर उतरलं आहे. मुख्यमंत्री म्हणून माझीही जबाबदारी होती. काश्मीरच्या प्रत्येक गावात हल्ल्याचा निषेध झाला आहे.” असं म्हणत त्यांनी या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला आहे.
“जो गरजते है ओ बरसते नही. पाकिस्तान फक्त गरजत आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती एवढी कमजोर आहे. अनेक लोकांना तिथे जेवण मिळत नाही. तो देश काय दुष्मनी करणार आहे? काय युद्ध करणार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान विरोधात कारवाईसाठी कडक पावलं उचलली आहेत” असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
जळगावात मन्यार बिरादरीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात नवरदेव मंडळींनी प्रतीकात्मक पाकिस्तानचे कागदी झेंडे फाडून केला निषेध व्यक्त. मुस्लिम समाजाच्या वतीने अनोख्या पद्धतीने पहलगाम येथील घटनेचा निषेध व्यक्त करत मयत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ग्रामपंचायत गटातील 4 जागांची मतमोजणी पूर्ण. भाजप आमदार सुभाष देशमुख गटाची 4 पैकी 3 जागांवर विजयी. प्रतिस्पर्धी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाट्याला केवळ 1 जागा मिळाली. पहिल्याच प्रयत्नात आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र मनिष देशमुख विजयी. आमदार सुभाष देशमुख गटाचे उमेदवार मनिष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी आणि अतुल गायकवाड विजयी.
नाशिकच्या गडकरी चौकात टेम्पोवर पडले मोठे वाळलेले झाड. टेम्पो चालक गंभीर जखमी. नागरिकांनी टेम्पोचां दरवाजा तोडून चालकाला काढले बाहेर. क्रेनच्या सहाय्याने झाडाला केले बाजूला. गडकरी चौकाकडून जाणारी वाहतूक विस्कळीत. शहरातील जुन्या वाळलेल्या मोठ्या वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर.
ऐन उन्हाळ्यात प्रसिद्ध अंब्रेला फॉल धो – धो कोसळत असल्याने भंडारदरा परिसरात पर्यटकांची गर्दी झाली आहे. निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले भंडारदरा धरण परिसर यावर्षी मात्र ऐन उन्हाळ्यातही पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. भंडारदरा धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने अंब्रेला फॉल प्रवाहित झालाय. भंडारदरा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली .
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू झालं आहे. विशेष अधिवेशनात पहलगाम हल्ल्यावर चर्चा सुरू. विधानसभा कामकाजापूर्वी दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे.
या चॅनेल्सवर भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षादलांविरोधात खोटी, दिशाभूल करणारी माहिती आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी सामग्री पसरवल्याचा आरोप आहे. बंदी घालण्यात आलेल्या यूट्यूब चॅनेल्समध्ये शोएब अख्तर, आर्जू काझमी आणि सय्यद मुजम्मिल शाह यांच्या चॅनेल्सचा समावेश आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या बैठकीत एलओसीवर सुरू असलेल्या कारवाई आणि आगामी प्लॅनिंग वर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या 4 महिन्यांत देशात 62 वाघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 20 वाघ दगावल्याची माहिती तर मध्य प्रदेशमध्ये 4 महिन्यात 17 वाघ मृत्यूमुखी.
मुंबईकरांना आता बेस्ट बस प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. बेस्ट बसचे तिकीट अखेर दुप्पट झाले असून महापालिकेने मंजुरी दिली आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी होणार आहे. तोट्यात चाललेल्या बेस्ट उपक्रमाला आता बस तिकीट दरवाढीला अखेर मान्यता मिळाली आहे. यामध्ये बसचे तिकीट आता दुपटीने वाढवण्याच्या बेस्टच्या प्रस्तावाला महापालिकेने मंजुरी दिली आहे.
त्यामुळे साध्या बसेसाठी किमान आकारले जाणारे बस भाडे आता पाच रुपयांऐवजी दहा रुपये आकारले जाणार आहे. तर वातानुकूलित बसेसचे किमान भाडे सहा रुपयांवरून बारा रुपये एवढे आकारले जाणार आहे. महापालिकेने या तिकीट दरवाढीला मंजुरी दिल्याने याची अंमलबजावणी तात्काळ केली जाणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. लोकमान्य टिळक टर्मिनसवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची तोबा गर्दी झालीये, त्या अनुषंगाने सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि विषेश व्यवस्था करण्यात आली.
मुंबईतील दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या आणि देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस सतर्क आहेत. मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्थानकांमध्ये आणि परिसरात सुमारे १० हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रभावी देखरेख ठेवली जात आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. टोलनाका आणि सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पहायला मिळतंय. दोन ते तीन किलोमीटरपर्यंत संथ गतीने वाहने चालत आहेत.
नाशिक – दर्गा प्रकरणी दंगलीतील संशयतांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. समीर पठाण, गुफरन तांबोळी या दोघांची पोलीस कोठडी संपणार असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवताना पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीच्या घटनेत 21 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
जम्मू-काश्मीर- दोडा जिल्ह्यात जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 13 घरांवर पोलिसांनी छापे टाकले आहेत. पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या 13 जणांच्या घरांवर जम्मू काश्मीर पोलिसांनी छापे टाकले आहेत. काही साहित्य ताब्यात घेऊन कुटुंबीयांकडे पोलीस चौकशी करत आहेत.
पश्चिम विदर्भात 385 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाले आहे. त्यामुळे 67 टँकर आणि 883 विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पश्चिम विदर्भातील 29,679 हातपंपापैकी 1026 हातपंप बंद आहे.
ठाणे महापालिका हद्दीमध्ये 96 इमारती अतिधोकादायक असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यातील 53 इमारती रिकाम्या करण्यात पालिकेला यश आले आहे. 17 इमारती भुईसपाट करण्यात आल्या आहेत. 24 इमारती अतिधोकादायक असून या इमारतीमध्ये 889 कुटुंब वास्तव आहेत. वारंवार नोटिसा बजावून रहिवासी घर सोडण्यास तयार नसल्याने पेच निर्माण होत आहे.
जालना जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात जवळपास 5 लाख 75 हजार हेक्टरवर पेरण्या होणार आहे. जिल्ह्यासाठी सव्वादोन लाख मेट्रिक टन खताचा पुरवठा देखील मंजूर करण्यात असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. भाजप आमदार सुभाष देशमुख आणि भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यापैकी कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. एकूण 18 जागांसाठी रविवारी मतदान झाले होते.