
खडकवासला आणि पवना धरणांच्या जलाशयांच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे झाल्याची कबुली राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली. अतिक्रमण करणाऱ्यांना वेळोवेळी नोटिसा बजाविण्यात आल्या असून, पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून अतिक्रमणे काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचेही विखे-पाटील यांनी सांगितले. वसई तालुक्यातील आडणे गावात एका भाताच्या खळ्यात आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत भात तणाचे, दोन हजार भाताची भारे व झोडणी करून खळ्यात ठेवलेले भात आगीत जळून खाक झाले आहेत. आडणे गावाच्या हद्दीतीळ राहुल पाटील, राजेंद्र पाटील पाटील, भाई पाटील, संतोष पाटील व वासुदेव पाटील यांच्या एकत्रित खळ्यावर ही काल मंगळवारी घटना घडली आहे. खळ्याजवळून वीज वाहिनी जात असल्याने वाऱ्याच्या झोकाने वीज वाहिनी एकमेकावर आदळल्याने शॉट सर्किटची आगीचे थिलंगे खळ्यातील भाताच्या भाऱ्यावर पडल्याने आग लागली असल्याचे सांगण्यात आले आहे. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वीज कंपनी कडून नुकनास भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग पर्यटन स्थळी आज बुधवारी हिमस्खलन झाले. या हिमस्खलनात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काश्मीर खोऱ्यातील शेवटचे गाव सरबल येथे हिमस्खलन झाले. हिमस्खलनामुळे परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या लखनौमधील औरंगजेब विधानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या टिप्पणीवर, अपना दल (कामेरवाडी) च्या आमदार डॉ. पल्लवी पटेल म्हणाल्या, “अबू आझमी यांना काढून टाकण्याचा निर्णय ते ज्या पक्षाचे सदस्य आहेत त्या पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्व घेईल. उत्तर प्रदेशच्या जनतेने त्यांना (योगी आदित्यनाथ) नेतृत्व दिले आहे. आता, राज्यात येणाऱ्या लोकांचे ते काय करणार हा पूर्णपणे त्याचा निर्णय आहे.”
आरोपी हा मंत्र्याच्या जवळचा असल्याने नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा गरजेचा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरील प्रश्नावर फडणवीसांनी उत्तर दिलं. फडणवीसांनी टीव्ही 9 मराठीच्या कॉनक्लेव्हमध्ये हे उत्तर दिलं.
महायुतीत कोणतीही धुसफूस नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री शिंदे हसत नाही म्हणून नाराज असल्याची चर्चा रंगते, असं देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किलपणे सांगितलं.
औरंगजेब मुस्लीम समजाचाही हिरो होऊ शकत नाही. औरंगजेबवर अबू आझमी जाणूनबुजून बोलले. औरंगजेबचं जाणूनबुजून उदात्तीकरण केलं जातंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आमचं 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं लक्ष्य आहे. आम्ही अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मविआ सरकारनं प्रकल्पांना रोख लावला होता. कोव्हिड काळात राज्यात विकासाची गती मंदावली, असं राज्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस टीव्ही9 कॉन्क्लेव्हमध्ये म्हणाले.
बुलडाण्यातील खामगाव तालुक्यातील शेलोडी या गावात जुन्या वादातून पिता-पुत्रावर 4 मार्चला रात्री धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पित्याचा जागीच मृत्यू झाला. तर मुलाची स्थिती गंभीर आहे. जखमी मुलावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात हल्ले करणारे सर्व आरोपी अटक केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी भूमिका घेतली आहे. मृतदेह खामगाव ग्रामीण पोलीस स्थानकात आणला आहे. यावेळी पोलीस आणि नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली आज तणाव निर्माण झालेला आहे. तर ग्रामस्थ आणि नातेवाईक आरोपी अटक होईपर्यंत अडून बसलेले आहे.
केज तालुक्यातील जाणेगाव येथील तरुणाची आत्महत्या केली आहे. संतोष देशमुख यांना मारहाण झाल्याचे फोटो पाहून अस्वस्थ झाल्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. अशोक हरिभाऊ शिंदे असे त्या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
अबू आझमी आपल्या विधानावर ठाम आहे. ते म्हणाले, मी वादग्रस्त काहीही बोललो नाही. जे इतिहासात आहे तेच बोललो. मात्र माझा बोलण्यामुळे अधिवेशन बंद करणार असाल तर मी माझे शब्द मागे घेतलेले आहेत.
छत्रपती संभाजीनगर-महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने आज चिकलठाणा येथील कार्यशाळेमध्ये निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. सन 2016 ते 2028 या कालावधीसाठी एकतर्फी जाहीर केलेली वेतन वाढ यातील वार्षिक वेतन वाढीचा दर एकतर्फी 1 टक्क्याने कमी केलेला होता तो पुर्वलक्षीप्रमाणे 3% करुन त्याची थकबाकी त्वरित द्या, अशी मागणी करण्यात आली.
राज्यभर एस.टी. कामगार आक्रमक झाले आहे. मुंबई सेंट्रल बस स्थानकात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. वेतन थकबाकी, महागाई भत्ता वाढ आणि भाडेवाढ ₹5 च्या पटीत करावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज जालन्यातील जाफराबाद आणि राजूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या बंदला व्यापाऱ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळतोय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आता सर्वत्र जोर धरू लागली आहे.
नाशिकच्या देवळा शहरातील ज्ञानेश्वरनगर, गुंजाळनगर, तालुक्यात खुंटेवाडीसह परिसरातील बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केलं असून मध्य रात्रीच्या सुमारास या चोरट्यांनी बंद असलेल्या या घरांची लूट करत सोन्याचे दागिने, वस्तू व रोकड मिळून 70 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. एवढंच नाही तर एका घराचे सेफ्टी डोअर तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला मात्र घरात फारसं काही सामान नसल्यानं त्यांना रिकाम्या हातीच परतावं लागलं. त्यानंतर तालुक्यातील खुंटेवाडी येथील निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच हजारांची रोकड लंपास केली. सध्या पोलीस या चोरट्यांचा शोध घेत असून सर्वत्र बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
अधिवेशन संपेपर्यंत सपा आमदार अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. याबद्दल आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “अबू आझमींनी शिवराय आणि शंभुराजांचा अवमान केला आहे. अबू आझमींच्या निलंबनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे ” असं म्हणतं भास्कर जाधव यांनी आझमींच्या निलंबनाच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. औरंगजेबाबद्दल अबू आझमी यांनी एक वक्तव्य केलं होतं ते म्हणाले होते. त्यांनी औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हटलं होतं. औरंगजेबाबाबत केलेलं वक्तव्य आझमींना चांगलंच भोवल आहे.
अधिवेशन संपेपर्यंत सपा आमदार अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यांच सदस्यत्व रद्द करा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. औरंगजेबाबद्दल अबू आझमी यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हटलं होतं. त्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतं आझमी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. औरंगजेबाबाबत केलेलं वक्तव्य आझमींना चांगलंच भोवलं आहे.
प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉयस कार जप्त केली जाणार. सीआयडीचे अधिकारी ही कार जप्त करणार आहेत.
प्रशांत कोरटकर सध्या मध्य प्रदेशातील इंदौर भागात फरार असल्याची माहिती सीआयडीकडे आहे. प्रशांत कोरटकरकडे असलेली ही आलीशान रोल्स रॉईस कार हजारो रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या कंपनीच्या नावावर आहे.
सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरणात आमदार धनंजय मुंडेची सखोल चौकशी करुन खुनाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी सोलापूरच्या माढ्यातील अंबाड मध्ये ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. धनंजय मुंडे व वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून – पुतळे जाळून आक्रमक आंदोलन करण्यात आलं.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज धाराशिव जिल्हा बंद ठेवण्यात आला आहे. धाराशिव शहरांमध्ये विविध संघटनेच्या वतीने आज या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.
कराडने एकट्याने मरु नये त्याने मुंडे यांचे नाव घ्यावे, असे मी त्याच्या कुटुंबाला सांगतो, एक नंबर आरोपी बोलला नाही तर त्याला फाशी होणार, हे कुटुंबाने जाणून घेतले पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
लोणी काळभोर किरकोळ कारणावरून महिलांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इराणी वस्तीत या हाणामारीत एक महिला व पुरुष असे दोघेजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
२०२४ मध्ये ११ हजार प्रवाशांचे २७ कोटींहून अधिक किंमतीचे मोबाइल चोरीला गेले आहेत. मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या अहवालाने धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान या उपक्रमाची दखल घेण्यात आली आहे. नुकताच भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ दिल्ली च्या वतीने फिक्की स्मार्ट पोलिसींग पुरस्कार 2024 ने गडचिरोली पोलीस दलाला सन्मानित करण्यात आले आहे. मागील तीन वर्षामध्ये दुसऱ्यांदा गडचिरोली पोलीस दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्वारगेटसारखा प्रकार जयकुमार गोरेंबाबत यांनी केल्याचे पुढे येत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. महिला आयोग कुठे आहे, असा खडा सवाल त्यांनी केला.
उत्तर महाराष्ट्रातील एका मंत्र्यांने पहिल्या महिला राष्ट्रपतींची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तर पश्चिम महाराष्ट्रातील एक पैलवान मंत्री महिलेच्या मागे लागल्याचा सणसणाटी आरोप त्यांनी केला.
मी काँग्रेसचा शिपाई आहे. मी माझ्या पक्षात राहणार असे विजय वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले. कोणी तरी खोट्या बातम्या पसरवत असल्याचे ते म्हणाले.
जळगावच्या सराफ बाजारात एकाच दिवसात सोने १२०० रुपयांनी महागले असून चांदीचे दरात सुद्धा एक हजार रूपयांची वाढ झाली आहे…. जळगावात सोने १२०० रुपयांनी महागून जीएसटीसह ८९ हजार ५०७ रुपयांवर गेले… चांदीही एक हजार रुपये महागली असून ९७,००० रुपये किलो झाली आहे… सोन्याचे दर पुन्हा 90 हजारांच्या तर चांदी 1 लाखांचे उंबरठ्यावर पोहोचले आहेत….
धाराशिव – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतपाची लाट पहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी बीड जिल्हा बंद नंतर आज धाराशिव बंदची हाक देण्यात आलेली आहे. जरांगे समर्थक आणि विविध संघटनाकडून हा बंद पुकारण्यात आला आहे.
पुण्यात मद्यधुंद बस चालकाने तरुणाला उडवले… रात्रीच्या सुमारास घडला प्रकार… वाघोलीकडे जाणारा बस चालक होता दारूच्या नशेत… मद्यधुंद पीएमपीएल बसचालकाने दुचाकीस्वाराला चिरडले… वाघोलीकडे जाणाऱ्या बसची धडक… तरुणाच्या डोक्याला गंभीर मार… उपचारासाठी तरुणाला दाखल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
२०२४ मध्ये ११ हजार प्रवाशांचे २७ कोटींहून अधिक किमतीचे मोबाइल चोरीला… मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या अहवालाने धक्कादायक माहिती उघड… मोबाईल चोरीचे सर्वाधिक गुन्हे कल्याण स्थानक परिसरात; प्रवाशांच्या हलगर्जीपणाचा चोरटे घेतात फायदा… IMEI ट्रॅकिंग आणि CCTVच्या मदतीने ४०% चोरीचे गुन्हे उघड; परराज्यात मोठ्या प्रमाणावर चोरीच्या मोबाईलची विक्री…. लोकलमध्ये गर्दीच्या वेळी अधिक सावध राहण्याचे पोलिसांचे नागरिकांना आवाहन…
मुलीच्या आईने भेटण्यास विरोध केल्याच्या रागातून 30 वर्षीय तरूणाने 17 वर्षीय मुलीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचा प्रकार अंधेरी पूर्व येथे घडला. मुलगी 60 टक्के भाजली असून ती कूपर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. आरोपीही या घटनेत भाजल्यामुळे त्याच्यावरही सध्या उपचार सुरू आहेत.
‘काय झाडी, काय डोंगार’ फेम सांगोल्याचे माजी आमदार शाहाजी बापू पाटील यांची पक्षश्रेष्ठींकडून विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता. दरम्यान, माजी आमदार शहाजी बाजू पाटील हे एकनाथ शिंदे यांची आज मुंबईत घेणार भेट. विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांसाठी आयोगाकडून 3 मार्चला निवडणूक जाहीर झाली आहे.
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतपाची लाट पहायला मिळाली. काल बीडच्या बंद नंतर आज धाराशिव बंदची हाक देण्यात आलेली आहे. जरांगे समर्थक आणि विविध संघटनाकडून बंद पुकारण्यात आला असून तशा प्रकारच निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल आहे.
पुण्यातील नाना पेठेत 11 लाख 40 हजार रुपयांचे मेफेड्रोन जप्त. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. मेफेड्रोन विक्री करणाच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 11 लाख 40 हजार रुपयांचे ड्रग्स जप्त. अदीब बशीर शेख, यासीर हशीर सय्यद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे.