
जालना जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसापूर्वी विविध भागात मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावून शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान केलं. बदनापूर आणि अंबड तालुक्यातील सहा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची कपाशी, सोयाबीन, मका यासह इतर पिके पाण्याखाली गेल्याने नुकसान झालं. झालेल्या या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील छोट्या मोठ्या नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले. भरवज, निरपण ते मांजरगाव या रस्त्यावर सतत पडत असलेल्या पावसाने रस्त्यालगत असलेल्या टेकडीवरून दरड आणि मातीचा ढिगारा पडला आहे. 7 गावांना जोडणारा हा रस्ता असून या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. रस्त्याचे काम चालू असताना मातीचा भराव टाकण्यासाठी ही टेकडी खोदण्यात आली होती.
सोलापूर ब्रेकिंग :- काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपकडून जोरदार निदर्शने
– आंदोलनात गाढव आणून भाजपकडून प्रणिती शिंदेंविरोधात निदर्शने.
– खासदार प्रणिती शिंदे या स्टंटलेडी झालीय, राहुल गांधी यांच्यासमोर चमकोगिरी करण्यासाठी त्या बेताल वक्तव्य करतात
– भाजप आमदार देवेंद्र कोठे यांची प्रणिती शिंदेंवर टीका
– जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला मात्र नुकसानीने चिंता वाढली.
तुम्ही फक्त 30 मिनिटांत पाकिस्तानला शरण गेलात. यावरून असे दिसून आले की तुमच्यात लढण्याची इच्छाशक्ती नाही. सरकारने वैमानिकांचे हातपाय बांधले.
सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य द्यावे लागते. राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असते. सैन्याच्या वापरासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असते. 1971 मध्ये तत्कालीन पंतप्रधानांना अमेरिकेची पर्वा नव्हती. एक लाख पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले.
पहलगाममधील हल्ल्यानंतर या हाऊसमधील प्रत्येक व्यक्तीने पाकिस्तानचा निषेध नोंदवला. या घटनेनंतर आम्ही सरकार आणि सैन्याच्या पाठी खंबीरपणे उभे राहिलो. काही सीनियर नेत्यांनी आतातायी विधाने केल्याचं ऐकलं. आपण सर्व एकसंघपणे उभे राहिलो, याचा आम्हाला विरोधक म्हणून अभिमान आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत बोलताना भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की तुम्ही कधीही स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही. तुम्ही देशद्रोही आहात.
पंतप्रधान मोदी संसद भवनात पोहोचले आहेत. राहुल गांधींनंतर, पंतप्रधान मोदी ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत भाषण देतील.
भुसावळ शहरातील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीत ९.९० कोटींच्या बोगस कर्ज वाटप प्रकरणात तत्कालीन ८ संचालकांसह १६ जणांना अटक करण्यात आल्याने पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी नुतन सभापती प्रदिप सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी संस्थेत यापूर्वी बोगस पद्धतीने मंजूर करण्यात आलेल्या बोगस कर्ज प्रकरणांची माहिती घेऊन त्याबाबत संचालक मंडळाची बैठक घेऊन १ कोटी ९३ लाखांच्या वर बोगस पद्धतीने RTGS रक्कम वर्ग झाल्याप्रकरणी पत्रकार परिषदेत मागील संचालक मंडळावर आरोप करून पोलिसात तक्रार दिलेली आहे.मात्र याप्रकरणी अजून तपास सुरू असून गुन्हे दाखल करण्यात आलेले
कळंब तालुक्यातील संजीतपुर येथील समाधान बाराते याचं आमरण उपोषण सुरु आहे. शेतात जाण्यासाठी त्यांना रस्ता नसल्याने तीन एकर जमीन पडुन राहिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाकडुन दिरंगाई केली जात असल्याचा शेतकऱ्याचा आरोप, जो पर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा
कल्याण मिलिंद नगर परिसरात अनेक खड्डे पाहायला मिळत आहेत. रस्त्यावर जवळपास खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. ते पाहून शिवसेना आक्रमक झाली आहे. खड्ड्याभोवती रांगोळी काढत ,खड्डयात साचलेल्या पाण्यात होड्या सोडून निषेध नोंदविण्यात आला आहे.
जळगावच्या अंमळनेर तालुक्यात ज्या जंगलात दोन महिलांच्या हत्या झाल्या, त्याच संपूर्ण जंगलामध्ये भर पावसामध्ये अमळनेर पोलिस सर्च ऑपरेशन राबवत असल्याचे पाहायला मिळत आहे. 25 ते 30 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाच्या माध्यमातून जंगलातला कोपरान कोपरा हा हुडकून काढला जात आहे. आणखी काही महिलांचे मृतदेह किंवा मृतदेहाचे अवशेष सापडतात का ? या अनुषंगाने पोलीस कर्मचाऱ्यांचे माध्यमातून जंगलातील झाडे झुडपे संपूर्ण परिसर हुडकून काढला जात आहे
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लेखी आश्वासनाची होळी करत सरकारच्या कांदा विरोधी धोरणांचा निषेध केला आहे.
माणिकराव कोकाटेचा राजीनामा आज झाला नाही यावरून काय कळतंय की लोकशाही नाही.यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला काही किंमत नाही, उपमुख्यमंत्री त्यांच्यात पक्षातल्या लोकांवर कारवाई करू शकत नाहीत असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
पुण्यातील ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेले एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर आणि सहा आरोपींना आज कोर्टात हजर केले जाणार आहे. न्यायालयाने 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती ती आज संपल्याने थोड्याच वेळात सातही आरोपींना कोर्टात हजर केले जाणार आहे.
आरोपी गोकुळ झा यांचा भाऊ रणजीत झा याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. पीडित तरुणी देखील न्यायालयात हजर असून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत जामीन रद्द करण्याची तरुणी मागणी केली आहे. कल्याण येथे डॉक्टरांच्या क्लीनिकमध्ये रिसेप्टनिष्ठ तरुणी गोकूळ झा याने मारहाण केली होती.
वैद्यनाथ बँकेच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून खेळीमेळीच्या वातावरणात होत असलेल्या निवडणुकीतून यशश्री मुंडे यांनी माघार घेतली. तत्कालीन संचालक मंडळाने माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडेच नेतृत्व देण्याचा निर्णय घेतलाय. दोन महिलांमध्ये प्रीतम मुंडे आणि सुरेखा मेनकुदळे बिनविरोध निवडून आल्या आहेत. उद्या अंतिम यादी जाहीर होणार असून 10 ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
वैद्यनाथ बँकेच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून खेळीमेळीच्या वातावरणात होत असलेल्या निवडणुकीतून यशश्री मुंडे यांनी माघार घेतली. तत्कालीन संचालक मंडळाने माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडेच नेतृत्व देण्याचा निर्णय घेतलाय. दोन महिलांमध्ये प्रीतम मुंडे आणि सुरेखा मेनकुदळे बिनविरोध निवडून आल्या आहेत. उद्या अंतिम यादी जाहीर होणार असून 10 ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
गणपतीच्या काळात मागच्या 10 वर्ष्यात दारूची कारवाई झालीय.. त्या आरोपीना बोलवा आतापासून परेड करा, एकदोन महिने त्यांना आत टाका… ते दारू कोठून आणतात ते आयडेंटिफाय करा मालकाला बोलवून तंबी द्या….. जर दारू दिसली तर सात पिढ्या दारू विकू शकणार नाही अशी कारवाई करू…
लोकसभेच्या पावसाळी अधिवशेनात चर्चा सुरु आहे. ऑपरेशन सिंदूरवर प्रियांका गांधी यांनी संसदेत मुद्दा उचलला. ” हल्ला होवू शकतो हे सुरक्षा यंत्रणांना कसं समजलं नाही. हे आपल्या मंत्र्यांचं अपयश नाही का?” असं म्हणत त्यांनी सरकारला पहलगाम हल्ल्यावरून प्रियांका गांधींनी सरकारला सवाल विचारला आहे.
गोंदिया जिल्ह्यात रात्री दमदार पाऊस बरसला असल्याने आणि अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस येत असल्याने गोंदिया जिल्ह्यातील नदी-नाल्यासह धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. देवरी तालुक्याच्या मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या शिरपूर हा धरण सिंचनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा धरण असुन तुडुंब भरला आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्याकरिता धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून 2231 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाद्वारे देण्यात आलेला आहे…
‘वादग्रस्त विधान खपवून घेणार नाही’ असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मत्र्यांना दिली तंबी दिली आहे. वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. असे प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
तब्बल दोन तास वाहतूक कोंडी, संघर्ष आणि अखेर तोडगा! मालिकेने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन घेण्यात आले मागे… तर पुन्हा पाण्याचा त्रास झाला तर तीव्र आंदोलन करणार भाजप आमदार सुलभा गायकवाड यांचा प्रशासनाला इशारा… आंदोलनातील प्रमुख मागण्या आणि घोषणाबाजी… आंदोलनात बंगाली घोषणाबाजीने वेधले लक्ष या आंदोलनात “जॉल चाय जॉल चाय… जल हमारी जीवन” अशा प्रकारची बंगालीमध्ये घोषणाबाजी करण्यात आली… आमदार सुभाष गायकवाड देखील या आंदोलनात सहभागी झाले होते…
आश्रमशाळेतील प्रश्नांवरून आमदार नितीन पवार आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दमही दिला. “तुम्हाला माज आला आहे का?” असं म्हणत त्यांनी थेट अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.
“अतिरेक्यांकडे असलेल्या रायफलची चंदीगडमध्ये तपासणी केली. त्याच रायफल्समधून पहलगाममध्ये गोळीबार करण्यात आला होता. अतिरेक्यांच्या आकांना यमसदनी धाडलं. अतिरेकी मारले याचा विरोधकांना आनंद नाही,” असं अमित शाह म्हणाले.
“१९४८ मध्ये सरदार पटेलांचा नकार असताना जवाहरलाल नेहरूंनी एकतर्फी युद्धविराम केला. मी इतिहासाचा विद्यार्थ्यी आहे, जबाबदारीने सांगतो. पाकिस्तान व्याप्त काश्मीरचं अस्तित्व आहे तर ते फक्त नेहरूंमुळेच आहे. नेहरूच त्याला जबाबदार आहे,” अशी टीका अमित शाहांनी केली.
“ज्यांनी पहलगाममध्ये हत्याकांड घडवलं, त्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. अतिरेक्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. मारले गेल्यानंतर अतिरेक्यांचं शव श्रीनगरमध्ये आणण्यात आलं,” असं अमित शाह म्हणाले.
“22 जुलैला सेन्सरद्वारे अतिरेक्यांच्या ठिकाणाची पुष्टी झाली. त्यानंतर सुरक्षा दलांनी पहलगामच्या अतिरेक्यांना घेरलं. त्यानंतर काल पहलगामच्या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं,” अशी माहिती अमित शाहांनी दिली.
“पाकिस्ताननं नागरी वस्त्यांवर गोळीबार केला. पाकच्या गोळीबारात मंदिर आणि गुरुद्वाराचं नुकसान झालं. पहलगामचे अतिरेकी भारत सोडून पाकमध्ये जाऊ नयेत ही काळजी घेतली. दुपारी 1 वाजता हल्ला झाला आणि मी साडेपाच वाजता श्रीनगरमध्ये होते,” असं अमित शाह म्हणाले.
“पाकिस्तानने आमच्यावर हल्ला केला. पण त्यांच्या एकाही मिसाईलने काहीही झालं नाही. फक्त जवळून केलेल्या हल्ल्यानंतर एक मंदिर आणि गुरुद्वाराला थोडं नुकसान झालं. एका नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर मोदींनी मिटिंग घेतली आणि लगेचच पाकिस्तानच्या ११ एअर बेसवर हल्ला केला,” अशी माहिती अमित शाहांनी दिली.
“ज्यांनी बैसरन घाटीत हल्ला केला, ते तिन्ही अतिरेकी मारले गेले. ऑपरेशन महादेवमध्ये भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मारला गेलेला सुलेमान हा पहलगाम हल्ल्यातील आरोपी आहे,” अशी माहिती अमित शाह यांनी लोकसभेत दिली.
नंदूरबार- रस्त्यांअभावी गर्भवती मातेची घरीच प्रसूती करण्यात आली. गर्भवती महिलेची लाकडी पुलावरून ४ किमीची जीवघेणी पायपीट करण्यात आली. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अक्कलकुवा तालुक्यातील मोठे तोलवापाडा येथे ही घटना घडली आहे. प्रस्तुतीच्या कळा सुरू असतानाही गर्भवती मातेला दमणीबाई ओल्या वसावे रुग्णालयात पोहोचता न आल्याने तिची घरीच प्रसूती करण्यात आली.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला नाही. कोकाटे हे मंत्रिमंडळ बैठकीला दाखल झाले आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाचे 5 दरवाजे उघडले असून 5 दरवाज्यातून 3678 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कल्याण पूर्वे, भाजप पदाधिकाऱ्यांचा रस्ता रोको. पूर्वेतील पाणी समस्या विरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी घरचा आहेर देत सकाळपासून आंदोलन सुरू केले . प्रशासन लक्ष देत नसल्याने रस्ता रोको करत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
लोकशाहीमध्ये लोकांना जे पाहिजे ते झालं पाहिजे. अजित पवार यांना जे वाटतं ते होणं गरजेचं नाही – कोकोटे यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावरून अंजली दमानियांनी उपस्थित केले सवाल.
अजित पवार यांनी अँटी चेंबरमध्ये कृषीमंत्री आमिकराव कोकाटे यांची भेट घेतली. बोलताना भान ठेवायला हवं, असं म्हणत अजितादादांनी कोकाटेंचे कान टोचले.
नाशिकमध्ये गोदा घाटावर पाण्याची पातळी वाढली आहे. भाविकांकडून प्रवाह वाढलेला असताना धोकादायक प्रवास सुरू आहे. सुरक्षा रक्षकांच्या सूचनांकडे कानाडोळा करून वाहत्या पाण्यातून प्रवास करत आहेत. धार्मिक विधींसाठी देशभरातून हजारो भाविक रामकुंडावर येतात. मात्र पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना भाविकांचा जीव धोक्यात आहे. दरम्यान गंगापूर धरणातून 603 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
बीड आणि माजलगाव शहराची तहान भागवणाऱ्या माजलगाव धरणात 16.5% पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात 84% पाणीसाठा उपलब्ध होता. बीड जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पाणीसाठा अत्यल्प असल्याने लवकरच बीड जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. माजलगाव धरण हे बीड आणि माजलगाव शहरासह परिसराची तहान भागवणारे मुख्य धरण आहे.
खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात एक अपडेट समोर आली आहे. प्रांजल खेवलकरांनी कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे सेवन केलेलं नाही. पोलीस जाणीवपूर्वक फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट न्यायालयाला सादर करण्यास विलंब करीत आहेत. फॉरेन्सिकलॅबचे रिपोर्ट न्यायालयात सादर केल्यास प्रांजल केवळकरांची न्यायालय त्वरित सुटका करू शकते. यामुळे पोलीस जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा प्रांजल केवलकरांचे वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांचा आरोप आहे.
लाडकी बहीण योजनेच्या गैरव्यवहार प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. डिजिटल इंडिया अंतर्गत डायरेक्ट बेनेफिशीर ट्रान्सफर असताना हा घोटाळा झाला कसा असा सवाल त्यांनी केला.
वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह ११ ठिकाणी ईडीने छापे टाकले. आज सकाळी सहा वाजल्यापासून ईडीचे सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे. नालासोपारा ४१ अनधिकृत इमारत प्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. महापालिकेचे नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या इडी च्या छाप्यात करोडो रुपयांची मालमत्ता मिळाल्या नंतर पालिका आयुक्त ही इडी च्या रडार वर होते..
अंमली पदार्थ मुलींच्या पर्समध्ये सापडतात. नाचगाण्याचा कार्यक्रम नाही. लेझर नाही. मग ही रेव्ही पार्टी कशी म्हणता असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला. हा सर्व एकनाथ खडसे यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न आहे. खडसेंविरोधी षडयंत्र असल्याचे ते म्हणाले.
पोलिसांनी माझ्या जावयावर पाळत ठेवली. प्रफुल्ल लोढाबाबत पोलिस माहिती का देत नाही, माझ्या जावयावरील कारवाईबाबत पोलीस पत्रकार परिषद घेण्याची तत्परता का दाखवतात असा सवाल एकनाथ खडसेंनी केला.
सांगलीच्या 32 शिराळ्याची नागपंचमी यंदा अधिक उत्साहात साजरी होत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी साजरी करताना,केंद्र सरकारकडून नागपंचमीच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या एका परवानगीमुळे शिराळाकरांना जिवंत नागाचे दर्शन होणार आहे.त्यामुळे शिराळकरांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. शैक्षणिक अभ्यास आणि सर्प संवर्धन पारंपारिक प्रचार करण्याच्या उद्देशाने 21 शिराळकरांना नाग पकडण्याची परवानगी मिळाली आहे त्यामुळे आता शिराळकरांना नागपंचमी साजरी करताना यंदा जिवंत नागांचे दर्शन देखील होणार आहे,त्यामुळे शिराळाकरांकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील वडवणी-चिंचवण रोडवरील मयूर बिअरबार अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी बिअरबारमधून विविध कंपन्यांचे दारूचे २० बॉक्स आणि काही रोकड असा एकूण एक लाख पन्नास हजार रुपयांहून अधिक किमतीचा माल लंपास केला. विशेष म्हणजे, चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर (DVR) देखील सोबत नेला. या प्रकरणी बिअरबारचे मॅनेजर केशव शेवते यांच्या तक्रारीवरून वडवणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून ६०३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नाशिकमधील गोदाघाटावर पाण्याची पातळी लक्षणीय वाढली आहे. देशभरातून हजारो भाविक धार्मिक विधींसाठी रामकुंडावर येत असतात, मात्र सध्या वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरक्षा रक्षक वारंवार सूचना देऊनही, काही भाविक त्याकडे दुर्लक्ष करत वाहत्या पाण्यातून धोकादायक प्रवास करत आहेत, ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येत आहे. प्रशासनाने पाणी वाढलेले असताना भाविकांनी पाण्याच्या जवळ न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत, तरीही या सूचनांकडे कानाडोळा करत असल्याचं चित्र दिसत आहे.
वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह एकूण ११ ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. आज (मंगळवार, २९ जुलै २०२५) सकाळी सहा वाजल्यापासून हे शोध अभियान सुरू आहे. नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी ही छापेमारी करण्यात येत आहे. यापूर्वी, महानगरपालिकेचे नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या ईडी छाप्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सापडल्यानंतर आयुक्त अनिलकुमार पवार हे देखील ईडीच्या रडारवर होते.
शहरातील एकमेव नाग मंदिरात बघायला मिळतोय नागपंचमीचा उत्साह. पंचवटीच्या नागचौक येथील नाग मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी. प्राचीन आणि स्वयंभू नाग मंदिर म्हणून या मंदिराची ओळख. मंदिरात ब्रिटिशपूर्व काळापासून साजरा होतो नागपंचमीचा उत्सव. नागदेवतेचे एकमेव भव्य मंदिर नाशिकच्या पंचवटीत. पूर्वी वडाच्या झाडाखाली होती नागाची मूर्ती.
मेळघाटात नर-मादी बछडे मिळून एकूण 105 वाघांचे वास्तव्य. संरक्षणासह योग्य संवर्धनामुळे वर्षभरात फक्त एका वाघाचा मृत्यू. मेळघाटात सध्या 25 नर 47 मादी वाघ. सुमारे दोन वर्षापर्यंत वय असलेले असे एकूण 105 वाघ आहेत. मेळघाटातील व्याघ्र प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प मानला जातो.
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग होणार कमी. सध्या सुरु असलेला 28662 क्यूसेक्स विसर्ग कमी करून 9 वाजल्यापासून 24772 करण्यात येणार. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.
उजनी धरणातून 71000 तर वीर धरणातून 31000 क्यूसेक इतके पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात आले असल्याने भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. भीमा नदी पात्रातील पुंडलिक मंदिरासहं इतर छोटी मोठी मंदिरे गेली पाण्याखाली. भीमा नदीपात्रात उजनी आणि वीर धरणातून मिळून जवळपास एक लाख क्यूसेक पेक्षा जास्त विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आला असल्याने ते पाणी दुपार पर्यंत पंढरपुरात येण्याची शक्यता असून पंढरपूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे.
“अतिरेक्यांकडे असलेल्या रायफलची चंदीगडमध्ये तपासणी केली. त्याच रायफल्समधून पहलगाममध्ये गोळीबार करण्यात आला होता. अतिरेक्यांच्या आकांना यमसदनी धाडलं. अतिरेकी मारले याचा विरोधकांना आनंद नाही,” असं अमित शाह म्हणाले.