Maharashtra Breaking News LIVE : घाटकोपरमध्ये दरोड्याचा थरार, चोरी सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : घाटकोपरमध्ये दरोड्याचा थरार, चोरी सीसीटीव्हीत कैद
Breaking News
| Edited By: | Updated on: Oct 15, 2025 | 10:21 PM

बोगस मतदान आणि अचानक वाढलेला मतदारांचा टक्का यासोबतच अजून काही गंभीर आरोप करत विविध राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांचा समावेश या शिष्टमंडळात होता. शिष्टमंडळाने मांडलेल्या प्रश्नांवर आम्ही चर्चा करून उत्तर देऊ असे निवडणूक आयुक्तांनी म्हटले. आज निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीनंतर शिष्टमंडळ पत्रकार परिषद घेईल. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दाैऱ्यावर आहेत. निवडणूक आयोग आणि शिष्टमंडळाच्या बैठकीत नेमके काय होते याकडे सर्वांच्या नजरा आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकात आज मध्यरात्री विशेष ब्लॉक असणार आहे. मध्यरात्री 12.20 ते 3.20 वाजेपर्यंत डोंबिवली रेल्वे स्थानकात नवीन 12 मीटर रुंदीच्या पादचारी पुलाचे (FOB) तुळई उभारणीच्या कामासाठी घेण्यात येणार विशेष वाहतूक ब्लॉक. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Oct 2025 08:23 PM (IST)

    शरद पवार गटाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचा राजीनामा

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचा राजीनामा

    पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे पाठवला राजीनामा

    फाळके गेल्या सात वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष

    कौटुंबिक कारणास्तव राजीनामा दिल्याचा पत्रात उल्लेख

    फाळके यांच्याकडून नवीन चेहऱ्याला संधी देण्याची मागणी

    फाळके शरद पवारांचे कट्टर समर्थक

  • 15 Oct 2025 08:11 PM (IST)

    रायगडला पुन्हा पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांना मोठा फटका

    रायगड जिल्ह्यात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हाता तोंडाशी आलेलं भाताचं पीक आता पावसामुळे धोक्यात आलं असून, कापणी केलेल्या भात पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

  • 15 Oct 2025 07:52 PM (IST)

    पुण्याच्या ग्रामीण भागात पुन्हा पावसाची हजेरी

    शिरुर तालुक्यातील रांजणगाव परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, त्यामुळे  पुणे -अहिल्यानगर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे, तसेच अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे देखील चांगलेच हाल झाले.

  • 15 Oct 2025 07:40 PM (IST)

    तीन वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

    अकोले तालुक्यातील देवठाण गावातील शेळके वस्ती परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून, तीन वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. कविता लहानु गांगड असं या चिमुकलीचं नाव आहे. या घटनेनंतर वनविभागानं पिंजरा लावून या बिबट्यांना जेरबंद केलं आहे.

     

     

  • 15 Oct 2025 07:01 PM (IST)

    घाटकोपरमध्ये दरोड्याचा थरार, चोरी सीसीटीव्हीत कैद

    घाटकोपरमध्ये दरोड्याचा थरार समोर आला आहे. दागिन्यांच्या दुकानातील चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घाटकोपर येथील ‘दर्शन ज्वेलर्स’ या दागिन्यांच्या दुकानात झालेल्या धाडसी चोरीचा सीसीटीव्ही फुटेज tv 9 मराठीच्या हाती आला आहे. या फुटेजमध्ये चोरटे अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने दुकानात शिरताना आणि दागिने लांबवताना स्पष्टपणे दिसत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकही तयार करण्यात आलं आहे.

  • 15 Oct 2025 06:47 PM (IST)

    हिंदुत्ववादी संघटनांकडून नगरमध्ये दुकानांवर भगवा ध्वज लावण्याची तयारी सुरू

    अहिल्यानगर-  येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून नगर शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांवर भगवा ध्वज लावण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.शहरातील कापड बाजार घास गल्ली या परिसरात हे ध्वज लावण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीची खरेदी हिंदू व्यक्तींकडूनच  करावी असे आव्हान केले होते.  त्याचाच धागा पकडत ही मोहीम सुरू केल्याचं बोलले जातय.

  • 15 Oct 2025 06:22 PM (IST)

    पालघरमध्ये पालकमंत्री गणेश नाईकांना वाहतूक कोंडीचा फटका

    पालघर – डीपीडीसी बैठकीसाठी निघालेल्या पालकमंत्री गणेश नाईकांना वाहतुकीचा फटका बसला आहे. वाहतूक कोंडीत अडकल्याने नाईक यांनी सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आहे. तसेच, वाहतूक कोंडी संपवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनागी नाईक यांनी केल्या आहेत.

  • 15 Oct 2025 06:06 PM (IST)

    राम मंदिर रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशाने दिला बाळाला जन्म

    काल रात्री १२:४० वाजता एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईला लोकल ट्रेनने प्रवास करत होती. त्यानंतर अचानक तिची तब्येत बिघडली. एका पुरुष प्रवाशाने राम मंदिर येथे चेन ओढून लोकल ट्रेन थांबवली. आणि मग महिलेसाठी वैद्यकीय सेवा शोधली पण रेल्वे स्टेशनवर कोणतीही सुविधा नव्हती. परिणामी तिची राम मंदीर रेल्वे स्थानकावरच प्रसूती झाली आहे.
  • 15 Oct 2025 05:53 PM (IST)

    हिंगोली: कळमनुरीत शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचाराचा प्रयत्न

    कळमनुरी तालुक्यातील येडशी तांडा गावामध्ये भोजाजी नाईक प्राथमिक आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकानेच अत्याच्याराचा प्रयत्न केल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित नराधम शिक्षक फरार झाला असून पीडित मुलीला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी रुग्णालयात पाठवले आहे. आता आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

  • 15 Oct 2025 05:39 PM (IST)

    मुंबई: युवक काँग्रेसकडून टिळक भवन येथे आंदोलन

    केरळमधील आयटी व्यावसायिक आनंदु अजी आत्महत्या प्रकरणी युवक काँग्रेसकडून मुंबईतील टिळक भवन येथे आंदोलन केले जात आहे. आनंदु अजी यांचा मृतदेह एका लॉजच्या खोलीत संशयास्पद स्थितीत आढळला होता. आनंदु अजी यांनी एका पोस्टमधून RSS वर गंभीर आरोप केले होते. याविरोधात युवक काँग्रेसकडून निषेध आंदोलन केलं जातं आहे.

  • 15 Oct 2025 05:22 PM (IST)

    पुणे : पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध

    पुरंदर विमानतळाला शेतकरी विरोध करत आहेत, शेतकरी म्हणाले की, आमच्याशी कुठलीही चर्चा न करता आमच्या जमिनी बळकवल्या जात आहेत.आम्हाला शासनाचा कुठलाही पैसा नको आम्हाला आमची जमीन हवी आहे. जर पुरंदरचे विमानतळ बनवायचा असेल तर आमच्या प्रेतावर त्यांना विमानतळ बनवावे लागेल.

     

  • 15 Oct 2025 05:07 PM (IST)

    मुंबई: एसटी बँकेच्या बैठकीत तुफान राडा

     

    एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा राडा झाला आहे. शिवसेना शिंदे गट आणि सदावर्ते गट यांच्यात हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीत अपमानास्पद भाषा वापरल्याने आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ही हाणामारी झाल्याचे समोर आले आहे.

  • 15 Oct 2025 04:53 PM (IST)

    राहुल गांधी 17 ऑक्टोबर रोजी फतेहपूरला भेट देणार

    काँग्रेस नेते राहुल गांधी 17 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे मृत हरिओम बाल्मिकी यांच्या कुटुंबाची भेट घेतील. तेथून ते प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आसामलाही जातील.

  • 15 Oct 2025 04:45 PM (IST)

    कल्याण पूर्वमध्ये पाणी येत नसल्याने मनसे आक्रमक

    कल्याण पूर्व येथील काही भागांमध्ये अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने मनसेनेच्या कार्यकर्त्यांनी या अगोदर देखील आंदोलन केली होती. मात्र दिवाळीच्या सण तोंडावर आला असून घरामध्ये पाणी नाही, म्हणून मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. मनसेने महानगरपालिकेचा ड प्रभाग क्षेत्रात जाऊन पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या खुर्चीला चपलाचे हार घालून निषेध व्यक्त केला.

  • 15 Oct 2025 04:36 PM (IST)

    ब्राझीलचे उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमिन दिल्लीत दाखल

    ब्राझीलचे उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमिन 15-17 ऑक्टोबर 2025 दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले. त्यांच्या पत्नी मारिया लुसिया अल्कमिन या देखील त्यांच्यासोबत आहेत.

  • 15 Oct 2025 04:22 PM (IST)

    चेंबूर : संत गाडगे महाराज एसआरए बिल्डिंग लिफ्टमध्ये आग

    चेंबूर येथील संत गाडगे महाराज एसआरए बिल्डिंग लिफ्टमध्ये आग लागली. यानंतर फायर ब्रिगेड पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे. स्थानिक आमदार तुकाराम काते यांनीही घटनास्थळी धाव घेतली. लोकांमध्ये भीतीच्या वातावरण असून नागरिक बिल्डिंग सोडून खाली उतरले आहे..  आगीवर नियंत्रण मिळवले असून प्रथम दर्शनी आग सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे.

  • 15 Oct 2025 04:13 PM (IST)

    अंजनगाव सुर्जी तालुक्यातील 19 गावे मतदार प्रारूप यादीतून गायब

    अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील 19 गावे मतदार प्रारूप यादीतून गायब झाल्याचे प्रकरण समोर आलं आहे. धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता निवडणुक विभागाने स्पष्टीकरण दिलं आहे.  काही तांत्रिक अडचणीमुळे निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर याद्या अपलोड झाल्या नाही, असं कारण दिलं आहे. ज्या दिवशी या याद्या प्रसिद्ध झाल्या तेव्हा तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना त्याची कल्पना आली होती. ज्या याद्या सुटलेल्या आहे त्याचे कंट्रोल चार्ट तयार करून आम्ही पुन्हा अपलोड करत आहे. जेणेकरून कोणतेही गाव, कोणते नाव, कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आमचं काम सुरू आहे. ही प्रारूप मतदार यादी होती ही अंतिम मतदार यादी नव्हती. टेक्निकल अडचणीमुळे जे काही राहिल असेल ते आता दुरुस्त करण्याची संधी आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या आधी जो भाग सुटला आहे तो नव्याने अपलोड करत आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे.

  • 15 Oct 2025 03:58 PM (IST)

    ठाण्यातील मुंब्रा भागात शाळकरी मुलांमध्ये हाणामारी

    ठाण्यातील मुंब्रा भागात शाळकरी मुलांमध्ये हाणामारी झालेली पाहायला मिळाली. शाळा सुटल्यावर दोन गटात तुफान हाणामारी झाली. मुंब्रा खाडी मशीन रोड येथे ही घटना घडली. हाणामारीचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हाणामारी सोडवण्यासाठी स्थानिकांनी मध्यस्थी केली.

  • 15 Oct 2025 03:56 PM (IST)

    माळशिरस तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात

    माळशिरस तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मुख्यमंत्र्यांसाठी बनवलेल्या हेलीपॅडवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तारांबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही वेळेआधी सोलापूर-मुंबई विमान सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

  • 15 Oct 2025 03:38 PM (IST)

    कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे संजय राऊत यांच्या भेटीला

    शिवसेना ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे संजय राऊत यांच्या भेटीला गेले आहेत.  मुंडे दिव्यामधील विधानसभा क्षेत्रातील दुबार नाव संदर्भात कागदी गठ्ठा घेऊन खुलासा करणार आहेत. मुंडे 17 हजाराहून अधिक दुबार नावे असल्याचा पुरावा मांडणार आहेत.

  • 15 Oct 2025 03:17 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विमानसेवा देणाऱ्या कंपनीला आवाहन, म्हणाले…

    माझी विमान सेवा देणाऱ्या कंपनीला सांगणे आहे की आता विमनसेवा थांबू देऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात केलं आहे. तब्बल 15 वर्षांनी सोलापूर-मुंबई विमान सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. यावेळेस ते बोलत होते.

  • 15 Oct 2025 03:12 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खासदार प्रणिती शिंदे यांना टोला

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांना टोला लगावला आहे. “काही लोकांच्या डोक्यात किडा गेलेला असतो. काही राजकारणी नेते म्हणाले की हा पूर नैसर्गिक नसून सरकारनिर्मित आहे. कधी कधी मानसिक त्रास होतो हे आम्ही समजू शकतो”, अशा शब्दात फडणवीस यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना टोला लगावला.

  • 15 Oct 2025 03:09 PM (IST)

    राज्याच्या इतिहासातील सर्वात जास्त मदत केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    आमच्या शेतकऱ्यांना दिवाळी जड जाईल म्हणून दिवाळीनिमित्त आम्ही शिधा देतोय. बाजूच्या धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील चांगले कामं केलं. शेतकऱ्यांचा आर्थिक मानसिक नुकसान आपण कधीच भरून काढू शकत नाही. मात्र आम्ही जास्तीतजास्त मदत केली. राज्याच्या इतिहासातील सर्वात जास्त मदत केली, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते.

  • 15 Oct 2025 02:59 PM (IST)

    सोलापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विमानतळाबाबत महत्त्वाचे विधान

    सोलापुरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना संबोधित केलं. तसेच त्यांनी तेथील योजनांबद्दल सांगितलं आहे. सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी फार महत्त्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेत फडणवीसांनी सोलापुरातील विमानतळाविषयी वक्तव्य केलं आहे. विमानतळामुळे देशभरातील भाविकांना फायदा होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

     

  • 15 Oct 2025 02:54 PM (IST)

    मुंब्य्रात शाळकरी मुलांमध्ये तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

    मुंब्य्रात शाळकरी मुलांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. किरकोळ कारणावरून हा वाद झाल्याचं म्हटलं जातं आहे,

     

  • 15 Oct 2025 02:31 PM (IST)

    निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा : राज ठाकरे

    राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. “निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा, सर्व राजकीय पक्षांचे एकमत होत नाहीत तोवर निवडणुका घेऊ नका” असं म्हणत राज ठाकरेंनी टीका केली आहे.

  • 15 Oct 2025 02:11 PM (IST)

    बॅलेटवर निवडणुका घ्या, निवडणूक आयोग काही हरिश्चंद्र नाही : राज ठाकरे

     

    मतदार यांद्यावरून गोंधळ सुरु असताना विरोध पक्षातील अनेक प्रमुक नेत्यांनी निवडणूक अधिकारी व आयुक्तांची भेट घेऊन निष्पक्ष निवडणुकीची मागणी केली. काल निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं. आणि आजही त्यांची उर्वरित बैठक पार पडली. यामध्ये ठाकरे बंधू आक्रमक झालेले पाहायला मिळाले. “बॅलेटवर निवडणुका घ्या, निवडणूक आयोग काही हरिश्चंद्र नाही” असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.

     

     

     

  • 15 Oct 2025 02:00 PM (IST)

    चोरी पकडून पुराव्यासह दिली, पण कारवाई नाही – विजय वडेट्टीवार

    देवांग दावे हे राजकीय पक्षाचे पुढारी आहेत. त्यांना कंत्राट दिलं आहे, नावं डिलीट करण्याचं आणि घालण्याचं काम त्याला दिलं आहे. अधिकृत कंत्राट दिल्याने वेबसाईट हाताळण्याचं काम त्यांच्याकडे आहे. त्यामुळे तिथूनच घोळ असावा असा आमचा गोड गैरसमज आहे. राजोरा मतदारसंघात गुन्हा दाखल झाला नाही. भाजपच्या मोबाईलवरून ओटीपी केलीय. आम्ही चोरी पकडून दिलीय. पुराव्यासह दिली, पण कारवाई झाली नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

  • 15 Oct 2025 01:57 PM (IST)

    मतदार कोण हे आम्हाला कळू नये का? – राज ठाकरे

    मला एकच गोष्ट समजली नाही. मतदारांची यादी गोपनीय असते. मला वाटतं मतदान गोपनीय असते. आपण कुणाला मतदान करतोय ते गोपनीय असतं. यादी तुम्ही ऑनलाईन देतात, मग ते गोपनीय कसे. सीसीटीव्ही लावून तुम्ही पाहू शकता. आम्ही पाहू शकत नाही का? निवडणूक आयोग यांना निवडणूक लढवायच्या नाहीत. आम्हाला लढवायच्या आहेत. मग मतदार कोण हे आम्हाला कळू नये का?” असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

  • 15 Oct 2025 01:51 PM (IST)

    भाजपचे कार्यकर्ते या मतदार याद्यांशी खेळत आहेत – उद्धव ठाकरे

    एक गोष्ट सांगेल. एकूणच लोकशाहीसाठी आणि तिच्या रक्षणासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले. आम्ही भाजपला पत्र दिलं होतं. आमच्या कालच्या आणि आजच्या निवडणुक आयुक्तांच्या भेटीत भाजपकडून कोणी आलं नाही. एका पत्राचा उल्लेख जयंतरावांकडून राहिला. विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या आधी १९ ऑक्टोबरला निवडणूक आयोगाला महाविकास आघाडीने पत्र दिलं होतं. काही भाजपचे कार्यकर्ते या मतदार याद्यांशी खेळत आहेत. काही लोक त्यांना हवे ते घुसवत आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 15 Oct 2025 01:49 PM (IST)

    याद्या सुधारल्याशिवाय निवडणूक घेऊ नये – राज ठाकरे

    याद्यात सुधारणा होत नाही. तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं सांगितलं. पालिकेच्या निवडणुका पाहिल्या तर पाच वर्षात निवडणुका झाल्या नाही. पाच वर्ष यात गेली असली तरी याद्या सुधारण्यासाठी 6 महिने गेले तर काय फरक पडतो. याद्या सुधारल्याशिवाय निवडणूक घेऊ नये अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

  • 15 Oct 2025 01:30 PM (IST)

    घोटाळे असलेली मतदार यादी विधानसभा निवडणुकीत – बाळासाहेब थोरात

    आम्ही दोष असल्याचं सांगितलं होतं. आम्हाला उत्तर आलं नाही. निवडणूक दोषासहीत झाली. 20 हजार मतदान बाहेरून आणल्याचं एक आमदार सांगतो. काहींचे नावं वगळली. परत परत तीच नावे दिसत आहे. हॉस्टेलमध्ये राहणारे बाहेरच्या राज्यातील लोकही मतदार दाखवले जात आहे. अनेक घोटाळे असलेली मतदार यादी विधानसभा निवडणुकीत होती असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

  • 15 Oct 2025 01:22 PM (IST)

    राज्य निवडणूक आयोगाचा सर्व्हर दुसरा कोणी तरी चालवतोय – जंयत पाटील

    राज्य निवडणूक आयोगाचा सर्व्हर दुसरा कोणी तरी चालवतोय. आमचा समज आहे. मतदार याद्यात दुसरा कोणी तरी नाव घालतो. नाव काढतो. कुणी तरी बाहेरचा व्यक्ती सिस्टिम ऑपरेट करतो. राज्य निवडणूक आयोगाच्या हातात यंत्रणा राहिली नाही, असा आमचा समज झाला आहे असं जयंत पाटील म्हणाले.

  • 15 Oct 2025 01:20 PM (IST)

    पुराव्याबरोबरच त्यांना पत्रही दिलंय – जयंत पाटील

    राज्य निवडणूक आयोगाच्या काही जबाबदाऱ्या आहेत, असं सीईओंनी सूचवलं. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. सर्व विरोधी पक्षनेते सोबत गेलो. आम्ही काही पुरावे दाखवले. त्या पुराव्यासहीत आम्ही काही माहिती दिली. या पुराव्याबरोबरच त्यांना पत्रही दिलंय. पत्र देत असताना मतदार यादीत मतदारांचे पत्ते अपूर्ण, घर क्रमांक चुकीचे, संबंधित व्यक्ती त्या पत्त्यावरच नाही असं जयंत पाटील म्हणाले.

  • 15 Oct 2025 12:42 PM (IST)

    निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यावर मविआ ठाम

    निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यावर मविआ ठाम आहे.  जर वीवीपॅट नसेल तर निवडणुका बॅलेट वर घ्या अन्यथा रस्त्यावर ऊतरू अशी आक्रमक भूमिका राज ठाकरे यांनी निवडणुक आयुक्त आणि अधिकाऱ्यांसमोर घेतली आहे.  ऊद्धव ठाकरेयांनीही त्यांना अनुमोदन दिलं आहे.

  • 15 Oct 2025 12:33 PM (IST)

    ठाणे – चालत्या कारने अचानक घेतला पेट, सावधगिरी दाखवत चालकाची बाहेर उडी

    ठाण्यात चालत्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. मात्र चालकाने सावधगिरी दाखवत वाहनातून बाहेर उडी मारली .  ठाण्यातील तीन हात नाका येथे सकाळच्या वेळी साधारण साडेआठ वाजता घटना घडली .

    घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत चारचाकी वाहनाला लागलेली आग विझवली.

  • 15 Oct 2025 12:23 PM (IST)

    5 वर्षं निवडणूक घेतली नाही, अजून 6 महिने निवडणूक घेऊ नका – राज ठाकरे

    ५ वर्षं निवडणूक घेतली नाही, अजून ६ महिने निवडणूक घेऊ नका . राजकीय पक्षांसाठी, सत्ताधाऱ्यांसाठी काम करता असं दिसतंय असं राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सुनावलं.

  • 15 Oct 2025 12:14 PM (IST)

    बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या – राज ठाकरेंची मागणी 

    निवडणुकीसाठी जास्त दिवस लागले तरी चालेल, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. निवडणूक आयोगाला निवडमूक घेण्याशिवाय दुसरं काय काम आहे, असा सवालही त्यांनी विचारला.

  • 15 Oct 2025 12:04 PM (IST)

    संजय राऊतांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका

    फडणवीस यांच्यी मानसिक लेवल तपासली पाहिजे – संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमचं अस्तित्व असणार आणि तुमच्या छातडावर बसणार हे लिहून ठेवा फडणवीस, असा इशारा राऊतांनी दिला.

  • 15 Oct 2025 11:53 AM (IST)

    निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा- राज ठाकरे

    सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही, तोवर निवडणुका घेऊ नका. निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. 80-90 हजारांनी निवडून येणारे थोरात कसे पडले, असा सवाल त्यांनी केला आहे.

  • 15 Oct 2025 11:44 AM (IST)

    आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच- राज ठाकरे

    आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे. सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही करत आहात का, असा प्रश्न राज ठाकरेंनी केला आहे. तर त्रुटी असताना निवडणुका कशाला घेता, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

  • 15 Oct 2025 11:36 AM (IST)

    मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी?

    मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी करताय, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. राजकीय पक्षांना अंतिम यादी का दाखवत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तर मतदार याद्यांमधल्या घोळावर जबाबदारी कुणाची, असं उद्धव ठाकरेंनी विचारलंय. प्रत्येकजण जबाबदारी झटकण्याचं काम करतंय, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

  • 15 Oct 2025 11:27 AM (IST)

    गडचिरोली, चंद्रपुरातील भूमिपूत्रांना रोजगार देण्याचा संकल्प- फडणवीस

    “आमचा संकल्प आहे, पुढच्या पाच ते सात वर्षांमध्ये गडचिरोली आणि लगतच्या चंद्रपुरात किमान एक लाख स्थानिक भूमिपूत्रांना चांगल्या पद्धतीचा रोजगार आम्ही देणार आहोत. त्यांचं जीवन पूर्णपणे बदलण्याचा निर्णय आम्ही घेतलाय,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 15 Oct 2025 11:25 AM (IST)

    गडचिरोली, चंद्रपूर भागात तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक- फडणवीस

    “आज गडचिरोली हे स्टील मॅग्नेट बनतंय. गडचिरोली आणि चंद्रपूर या भागात जवळपास तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आलेली आहे. मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होतेय. गुंतवणूक करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की,  तुम्हाला ज्या सवलती पाहिजेत त्या आम्ही देऊ, पण आमची अट एकच असेल. तुमच्याकडे जी मंडळी कामाला लागतील त्यातली 95 टक्के मंडळी ही भूमीपुत्रच असली पाहिजेत. स्थानिकांनाच इथे रोजगार मिळाला पाहिजे,” अशी अट फडणवीसांनी घातली.

  • 15 Oct 2025 11:22 AM (IST)

    आत्मसमर्पण केलेल्या सर्वांचं उचित पुनर्वसन केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही- फडणवीस

    “ज्यांनी आत्मसमर्पण केलंय, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की तुम्ही भारतीय संविधान स्वीकारलेलं आहे. तुम्ही संविधानाच्या मुख्य धारेत आला आहात, आता याच संविधानाने तुमच्याकरिता जो न्याय अपेक्षित केला आहे, तो न्याय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम राज्यातलं सरकार केल्याशिवाय थांबणार नाही. आत्मसमर्पण केलेल्या सर्वांचं उचित पुनर्वसन केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही”, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

  • 15 Oct 2025 11:19 AM (IST)

    विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीला सुरुवात

    विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्तांसोबत बैठक सुरू आहे. काल काही मुद्द्यांवर समाधान झालं नव्हतं. त्यामुळे हा पुन्हा ही बैठक होत आहे.

  • 15 Oct 2025 11:14 AM (IST)

    देशातून मोठ्या प्रमाणात माओवाद्यांचं उच्चाटन- फडणवीस

    “आता देशातून मोठ्या प्रमाणात माओवाद्यांचं उच्चाटन होत आहे. मी गडचिरोली पोलिसांचं विशेष अभिनंदन करतो. त्यांनी मोठ्या प्रमाणात ऑपरेशन्स केले. अतिशय जहाल आणि वरिष्ठ केडर यांना नेस्तनाभूत करण्याचं काम केलं. जंगलात सातत्याने मोहिमा करून नक्षलवाद्यांना, माओवाद्यांना जेरबंद केलं”. अशा शब्दांत फडणवीसांनी कौतुक केलं.

  • 15 Oct 2025 11:11 AM (IST)

    आदिवासी समाजातील तरुण-तरुणी भरकटले गेले- फडणवीस

    “व्यवस्थेविरोधात संभ्रम निर्माण केला गेला. संविधान न्याय देऊ शकत नाही अशी भावना झाली. आदिवासी समाजातील तरुण-तरुणी भरकटले गेले. तेलंगणा, गडचिरोली भागात नक्षलवाद्यांचा म्होरक्या म्हणून भूपतीने जबाबदारी स्वीकारत मोठा लढा उभा केला,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 15 Oct 2025 11:07 AM (IST)

    6 कोटींचं बक्षीस असलेल्या भूपतीचं आत्मसमर्पण

    गडचिरोलीत भूपतीसह 60 हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाचं कौतुक केलं आहे. भूपतीसाठी सहा कोटी रुपयांचं बक्षीस होतं.

  • 15 Oct 2025 10:58 AM (IST)

    स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

    सोलापूर विमानतळावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथे जातील. तेथे पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार आहे.

  • 15 Oct 2025 10:48 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर, सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ करणार

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू होत असलेल्या मुंबई-सोलापूर आणि सोलापूर-बेंगलोर विमानसेवेचा शुभारंभ त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. सोलापूर विमानतळावर मुंबईहून येणाऱ्या पहिल्या विमानातील प्रवाशांचे मुख्यमंत्री गुलाबपुष्प देऊन स्वागत करतील.

  • 15 Oct 2025 10:31 AM (IST)

    विरोधी पक्षातील नेत्यांची निवडणूक आयोगासोबत बैठक, बाळासाहेब थोरात राहणार उपस्थित

    मतदार यादीतील कथित गोंधळावरून राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षातील नेते आज पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त भेट घेणार आहेत. या भेटीसाठी काँग्रेसच्या वतीने आज ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हजर राहणार आहेत. ते काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतील. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या एका महत्त्वाच्या कामानिमित्त दिल्लीला रवाना झाल्या आहेत, त्यामुळे त्या अनुपस्थित राहतील. याव्यतिरिक्त, काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांचाही या शिष्टमंडळात समावेश असण्याची शक्यता आहे.

  • 15 Oct 2025 10:19 AM (IST)

    बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, अमरावती पोलीस अलर्ट मोडवर, पोलिसांना माहिती गोळा करण्याचे आदेश

    बच्चू कडू यांनी येत्या २८ ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये भव्य महाएल्गार मोर्चा काढून आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमरावती पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस अधीक्षकांनी जिल्हाभरातील प्रत्येक पोलीस पाटलाला पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे पोलीस पाटलांना गावातून नागपूरकडे जाणाऱ्या गटाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचे नाव, सहभागी लोकांची संख्या, प्रवासाचे माध्यम (ट्रॅक्टर/इतर वाहने) आणि जीवनावश्यक साहित्यासह किती दिवसांच्या तयारीने जात आहेत, याची सविस्तर माहिती तात्काळ जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. बच्चू कडूंच्या या मोर्चात मोठ्या संख्येने ट्रॅक्टर आणि इतर वाहने नागपूरच्या दिशेने कूच करण्याची शक्यता असल्याने, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

  • 15 Oct 2025 10:07 AM (IST)

    अमरावतीतील मतदार यादीत मोठा घोळ; 20 गावांची नावे वगळली

    अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्याच्या प्रारूप मतदार यादीत गंभीर घोळ झाल्याची बाब समोर आली आहे. काही मतदारांची नव्हे, तर तालुक्यातील तब्बल २० गावे या यादीतून पूर्णपणे गायब झाली आहेत. या घोळावर माजी पंचायत समिती सभापती आणि कसबेगव्हाणचे सरपंच शशिकांत मंगळे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मंगळे यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली असून, “एकाच तालुक्यात जर २० गावे गायब असतील, तर जिल्ह्यात काय स्थिती असेल?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

  • 15 Oct 2025 09:57 AM (IST)

    जनसंवाद द्वारे अजित पवार जाणून घेतायत नागरिकांच्या समस्या

    भाजप आमदार शंकर जगताप आणि भाजपचा अभ्यद्य गड मानल्या जाणाऱ्या चिंचवड मतदार संघात अजित पवारांचं शिरकाव… जनसंवाद द्वारे अजित पवार जाणून घेतायत नागरिकांच्या समस्या… शहरासाठी एक जनसंवाद दिलेला असताना पुन्हा चिंचवड मतदार संघात जनसंवाद घेत भाजप नेत्यांना अजित पवार अहवान देत असल्याची चर्चा… जनसंवाद कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद पोलिस आयुक ,महापालिका आयुक्त आणि सगळ्या विभागाचे अधिकारी हजर

  • 15 Oct 2025 09:45 AM (IST)

    त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामांवर आजपासून प्रशासनाचा हातोडा

    कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू धडक मोहीम… दिवाळीपर्यंत राहत्या घरांना तात्पुरती सवलत… एनएमआरडीए प्रशासन ठाम भूमिकेत; स्थानिकांचा विरोध झुगारला… आयुक्त जलज शर्मा यांचे स्पष्ट आश्वासन – राहत्या घरांना सध्या अभय… कारवाईवरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता… नाशिक–त्र्यंबकेश्वर रस्ता होणार सहापदरी… पिंपळगाव बहुला ते पेगलवाडी भागातील बांधकामांना सात दिवसांची नोटीस संपली.. नोटीस कालावधी संपताच कारवाईला सुरुवात… मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्टमंडळाला न भेटल्याने कारवाईला मिळाली गती

  • 15 Oct 2025 09:30 AM (IST)

    खेडा कापूस केंद्रा वर कापूस विक्रीसाठी गर्दी…

    हजारो क्विंटल कापूस शेतकरी विकत आहेत खाजगी व्यापाऱ्याला… शासनाच्या वतीने अद्यापही जिल्ह्यात कपाशी खरेदी केंद्र सुरू न झाल्याने कमी भावात कपाशी विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ… व्यापाऱ्याकडून कपाशीला सहा हजार पाचशे ते सहा हजार सातशे रुपये क्विंटल दर… एन दिवाळीच्या सणावर आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर कमी भावात कपाशी विकण्याची वेळ… शासनाने खरेदी केंद्र सुरू करून किमान दहा हजार रुपये भाव द्यावा शेतकऱ्यांची मागणी…

  • 15 Oct 2025 09:11 AM (IST)

    शरद पवार आजच्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळा सोबत जाणार नाहीत

    शरद पवार आज पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुण्याला जाणार… थोड्याच वेळात शरद पवार पुण्यासाठी रवाना होणार… मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, रईस शेख, प्रकाश रेड्डी या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली होती… मंगळवारी चर्चा अपुरी राहिल्यामुळे आज पुन्हा मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक अधिकारी यांच्या सोबत बैठक होणार आहे…

  • 15 Oct 2025 08:55 AM (IST)

    दिवाळीत रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत फटाके वाजविण्यास बंदी

    जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पालन न करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश.  फटाके विक्री आणि वापराबाबत मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाकडून जारी. प्रदूषण, आपत्कालीन घटना , टाळण्यासाठी आदेश. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडात्मक कारवाईसह करावासाला जावे लागणार समोर

  • 15 Oct 2025 08:50 AM (IST)

    मराठवाड्यातील पूरग्रस्तांना ठाण्यातील ठाकरेंच्या सेनेकडून दिवाळीपूर्वी मदत रवाना

    महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या शेतीप्रमाणेच घरादाराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विविध राजकीय पक्षांकडून मदत पुरग्रस्त भागांमध्ये देण्यात येत आहे ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांच्या मार्फत देखील पूरग्रस्त भागात मदत पाठवण्यात आली आहे.

  • 15 Oct 2025 08:44 AM (IST)

    फायनान्स बँकेच्या रिलेशन मॅनेजरची १२ लाख ८० हजारांची फसवणूक

    जळगावात शेअरमध्ये चार कोटी नफ्याचे आमिष दाखवून खासगी फायनान्स बँकेच्या रिलेशन मॅनेजरची १२ लाख ८० हजारांत फसवणूक. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जना स्मॉल फायनान्स बँकेत रिलेशन मॅनेजर असलेल्या संभाजी ढोमण माळी यांची फसवणूक झाली आहे.

  • 15 Oct 2025 08:19 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अनेक गावे मतदार यादीतून गायब 

    जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या पूर्वसंध्येलाच निवडणूक विभागाचा अजब कारभार चव्हाट्यावर. निवडणूक पूर्वी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यात अख्खे गावे गायब माजी सभापती शशिकांत मंगळे यांचा आरोप. शशिकांत मंगळे यांनी जिल्हाधिकारी यांकडे केली तक्रार

  • 15 Oct 2025 08:16 AM (IST)

    देशाच्या समुद्री क्षेत्रात १० लाख कोटींची ‘महाभरारी’

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत यंदा दिवाळीनंतर देशाच्या समुद्री क्षेत्रात विक्रमी १० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार होणार आहेत. मुंबईत २७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ‘इंडिया मेरिटाइम वीक’ मध्ये हे ऐतिहासिक करार होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन होणार.