
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी मोर्चा काढलाय. बच्चू कडूंनी ट्रॅक्टर महाएल्गार मोर्चा काढला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा इशारा दिला. दुसरीकडे फलटण येथील 28 वर्षीय वैद्यकीय अधिकारी महिलेने आत्महत्या केल्याने खळबळ माजली असून गंभीर आरोप केली जात आहेत. डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली. राजकीय वळण या प्रकरणाला लागले असून सत्ताधाऱ्यांवर आरोप केली जात आहेत. साताऱ्याचे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचले असून कॉंग्रेसने दिल्लीमध्ये काल आंदोलन केले. या प्रकरणात एका पीएसआयचेही नाव आले असून धक्कदायक खुलासे होते आहेत. मोंथा चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील अनेक भागांमध्ये बघायला मिळतोय. मोंथा चक्रीवादळाने थैमान घातलाय. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.