Maharashtra Breaking News LIVE 5 June 2025 : अकोल्यात डीपीडीसी बैठकीनंतर भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमनेसामने

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 5 जून 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 5 June 2025 : अकोल्यात डीपीडीसी बैठकीनंतर भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमनेसामने
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Sep 14, 2025 | 2:45 PM

मान्सूनच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जिल्ह्यासह विभागात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे नुकसान झाले असून, तोडणीही थांबली आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक घटली आहे. दुसरीकडे ग्राहकांकडून भाज्यांना मागणी वाढली असल्याने बहुतांश प्रकारच्या भाज्यांच्या भावाने शंभरी ओलांडली आहे. भाज्यांच्या भावात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाजपाची आज नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय परिषद होणार. उत्तर महाराष्ट्राच्या या विभागीय परिषदेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती. गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावलसह भाजपाचे उत्तर महाराष्ट्रातील इतर मंत्री देखील राहणार उपस्थित. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विभागीय परिषदेचे आयोजन. उत्तर महाराष्ट्रातील सर्व भाजपचे प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित. आलेले मान्यवर या पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Jun 2025 05:49 PM (IST)

    अकोल्यात डीपीडीसी बैठकीनंतर भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमनेसामने

    विदर्भातून मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यात डीपीडीसी बैठकीनंतर भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्यात तुफान बाचाबाची झालीय. दोन्ही आमदारांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते नियोजन भवन परिसरात जमलेत.

  • 05 Jun 2025 05:38 PM (IST)

    चर्चगेट रेल्वे स्थानकातील दुकानाला आग

    मोठी बातमी समोर आली आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकातील दुकानाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र दुकानाला आग लागल्याने धुराचे लोट तयार झाले आहेत. इतर दुकानं रिकामी करण्यात आली आहे. तसेच अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांची एकच धावपळ पाहायला मिळाली.

  • 05 Jun 2025 05:34 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन

    छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘क्या हुवा तेरा वादा’, असा प्रश्न विचारत ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या आंदोलनाद्वारे मंत्री अतुल सावे यांना दिलेल्या आश्वासनाबाबत जाब विचारण्यात आलाय. ठाकरेंच्या शिवनेसेनकडून मंत्री अतुल सावे यांना निवेदन देण्यात आलं आहे.

  • 05 Jun 2025 05:05 PM (IST)

    नागरिकांनी एकल वापर प्लास्टिकचा वापर टाळावा, मंत्री पंकजा मुंडे यांचं आवाहन

    जागतिक पर्यावरण दिननिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटी इथं एकल प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. वसुंधरेच्या संरक्षणासाठी पर्यावरण विभागाने पाऊलं उचलली असून नागरिकांनी एकल वापर प्लास्टिकचा वापर टाळण्याचं आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं.

  • 05 Jun 2025 05:01 PM (IST)

    येवल्यात पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला

    येवला – गेल्या बारा ते तेरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर हजेरी लावली. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या या पावसामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तथापि, शेतकरी वर्गाला अजूनही मोठ्या आणि दमदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

  • 05 Jun 2025 05:00 PM (IST)

    हगवणे प्रकरणात जेसीबीचा अनधिकृत ताबाप्रकरणी तीन जणांना अटक

    प्रशांत येळवंडे यांच्या ताब्यातील जेसीबी मशीन अनधिकृतपणे ताब्यात घेतल्याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या तिघांनी फिर्यादी चालकाकडून जेसीबी मशीन हिसकावून ती आरोपी शशांक हगवणे याच्या ताब्यात दिली होती. या प्रकरणात बोगस बँक अधिकाऱ्यांची भूमिकाही उघडकीस आली असून, अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना खेड न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.

  • 05 Jun 2025 04:58 PM (IST)

    खासदार वर्षा गायकवाड महापालिका आयुक्तांच्या भेटीला, मुंबईकरांच्या समस्यांवर चर्चा

    मुंबईत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी आज महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, मुंबईकरांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर त्यांनी आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली. या महत्त्वाच्या बैठकीला खासदार गायकवाड यांच्यासोबत आमदार ज्योती गायकवाड, आमदार अस्लम शेख आणि आमदार अमीन पटेल हेदेखील उपस्थित होते.

  • 05 Jun 2025 03:57 PM (IST)

    पाकिस्तानी हेर रवी वर्माला न्यायालयीन कोठडी

    पाकिस्तान हेरगिरी प्रकरण तीन दिवसांच्या पोलीस कस्टडीनंतर एटीएस मधील अटक आरोपी रवी वर्माला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आले. रवि वर्माला ठाणे सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी आज सुनवण्यात आली आहे.

  • 05 Jun 2025 03:08 PM (IST)

    तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केलं लग्न

    तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी BJD च्या माजी खासदार पिनाकी मिश्रासोबत लग्न केलं. बिजू जनता दलाचे माजी खासदार पिनाकी मिश्रा आणि महुआ मोईत्रा यांनी जर्मनीमध्ये ३ मे रोजी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 05 Jun 2025 02:56 PM (IST)

    औद्योगिक कंपनीतील कपड्याच्या गोदामाला लागलेली आग 15 तासानंतरही धुमसतेय

    मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या औद्योगिक कंपनीतील कपड्याच्या गोदामाला लागलेली आग 15 तासानंतर ही धुमसत आहे. काल रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही भीषण आग लागली होती. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवणाकडून कुलिंगचे काम सुरू आहे. या घटनेत कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीमध्ये कामगारांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने फायर सेफ्टी नसल्यामुळे आगीचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे

     

  • 05 Jun 2025 02:33 PM (IST)

    शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा; समृद्धी महामार्गावरून फडणवीस,शिंदे, अजिदादांचा प्रवास

    समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा सुरु आहे. ईगतपुरी ते आमने 76 किलोमीटरच्या भागात ‘समृद्धी’वर 5 बोगदे असणार आहे. नागपुरातून मुंबईच्या वेशीवर 8 तासांत पोहोचता येणार. दरम्यान आता या समृद्धी महामार्गावरून फडणवीस,शिंदे, अजिदादा कारने प्रवास करत आहेत. कारचं स्टेअरिंग मात्र फडणवीसांच्या हातात आहे.

  • 05 Jun 2025 02:23 PM (IST)

    शिंदेंनंतर आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या हाती स्टेअरिंग, समृद्धी महामार्गावर चालवली कार

    समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा सुरु आहे. ईगतपुरी ते कसारा अंतर आता फक्त 8 मिनिटांवर असणार आहे. ईगतपुरी ते आमने 76 किलोमीटरच्या भागात ‘समृद्धी’वर 5 बोगदे असणार आहे. नागपुरातून मुंबईच्या वेशीवर 8 तासांत पोहोचता येणार. आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असणार आहे. दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार चालवली आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी हाती स्टेअरिंग घेत कार चालवून पाहिली.

  • 05 Jun 2025 02:10 PM (IST)

    समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा, ईगतपुरी ते कसारा अंतर आता फक्त 8 मिनिटांवर

    समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा सुरु आहे. ईगतपुरी ते कसारा अंतर आता फक्त 8 मिनिटांवर असणार आहे. ईगतपुरी ते आमने 76 किलोमीटरच्या भागात ‘समृद्धी’वर 5 बोगदे असणार आहे. नागपुरातून मुंबईच्या वेशीवर 8 तासांत पोहोचता येणार. आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असणार आहे.

     

     

  • 05 Jun 2025 01:59 PM (IST)

    100 प्लस चा नारा

    नाशिक महापालिकासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी 100 प्लस चा नारा दिला. युती झाली तर ठीक नाहीतर गिरीश महाजन यांनी स्वबळाचा नारा दिला. नाशिकमध्ये आयोजित भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेत गिरीश महाजन यांनी मोठं विधान केले आहे.

  • 05 Jun 2025 01:50 PM (IST)

    प्यारे खान यांच्यावर टीका

    नितेश राणे यांची अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्यावर टीका केली आहे. प्यारे खान जरी फडणवीस, गडकरी यांच्या सोबत फिरत असतील पण मी त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. त्यांनी मला संस्कार शिकवू नये, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

  • 05 Jun 2025 01:40 PM (IST)

    पीएमपीएमएल भाववाढीच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनोखं आंदोलन

    पीएमपीएमएल प्रशासनाने पुणेकरांवर अन्यायकारक भाव वाढ लादल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या समोरील पी पीएमपीएल बस थांब्यावर आंदोलन केले. महापालिकेसमोर घोडे गाडी बैलगाडी मधून प्रवास करून जोरदार घोषणाबाजी केली.

  • 05 Jun 2025 01:30 PM (IST)

    कल्याणच्या रिंग रोडवर विचित्र अपघात

    कल्याणच्या रिंग रोडवर विचित्र अपघात घडला. नियंत्रण सुटलेल्या डंपरची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार ते पाच गाड्यांना धडकले. अपघातात चार ते पाच चार चाकी गाड्या आणि तीन दुचाकी गाड्याचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी नाही. रिंग रोड मार्ग अजून सुरू नाही मात्र वारंवार या रिंग रूट मार्गावर अपघात होत आहेत

  • 05 Jun 2025 01:20 PM (IST)

    खिळेमुक्त वृक्ष अभियान

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खिळेमुक्त वृक्ष अभियान राबवण्यात आले. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत विविध भागात मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. विक्रोळी मतदारसंघात अमित ठाकरे दाखल झाले होते. मोहिमेत कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले.

  • 05 Jun 2025 01:10 PM (IST)

    एकनाथ शिंदे हेच खरे वारसदार

    एकनाथ शिंदे हेच खऱ्या अर्थाने शिवसेनेचे विचार तसेच शिवसेना पक्ष पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत. गावाच्या चौकात चौकात उभा राहणार्‍या प्रत्येकाच्या सुखा दुखात जाणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे आहे. शिवसेनेचा ते वारसा खऱ्या अर्थाने चालवता आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोलताना दिली आहे.

  • 05 Jun 2025 01:00 PM (IST)

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर मनसेचा जन आक्रोश मोर्चा

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर मनसेचा जन आक्रोश मोर्चात मनसे नेते अविनाश जाधव माजी आमदार प्रकाश भोईर , जिल्हाप्रमुख उल्हास भोईरसह शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. हातात आता थांबायचं नाही कचरा कर रद्द करा अशा आशयाचे बॅनर घेत पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला

  • 05 Jun 2025 12:57 PM (IST)

    ⁠रवी वर्मा हनीट्रॅप प्रकरणी मोठा खुलासा

    ⁠रवी वर्मा हनीट्रॅप प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. रवींद्र वर्मा बरोबर संभाषण करण्याकरिता पाक एजंटने भारतीय सिमकार्डचा वापर केला होता असे तपासामध्ये समोर आलं आहे.

    रवी वर्मा आणि प्रिती सिंघल ( पाक एजंट ) यांच्यात भांडणे झाली होती.  ⁠रवीची आई रेखा वर्माने प्रिती सिंघलला फोनवरुन शिव्या दिल्या होत्या.

  • 05 Jun 2025 12:46 PM (IST)

    संजय राऊत यांचा तोल गेलेला आहे – शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची टीका

    संजय राऊत साहेबांचा तोल गेलेला आहे. त्यांना काय बोलायचं, किती खालच्या दर्जाचे बोलायचं हे महाराष्ट्राच्या जनतेने समजून घ्यायला पाहिजे अशी टीका शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

  • 05 Jun 2025 12:27 PM (IST)

    राज्यातील 903 योजनांच्या प्रशासकीय मान्यता रद्द, सरकारचा मोठा निर्णय

    राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने राज्यातील 903 योजनांच्या प्रशासकीय मान्यता रद्द केल्या आहेत. 3 वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रलंबित असलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. भूसंपादन, स्थानिकांचा विरोध आणि ठेकेदारांच्या असहकार्यामुळे या योजना रखडल्या होत्या. मृद आणि जलसंधारण विभागाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. रद्द करण्यात आलेल्या योजनांमध्ये ल. पा. योजना, कोकण पाट बंधारे, पाझर तलाव, साठवण तलासमावेश दुरुस्ती योजनांचा समावेश आहे.

  • 05 Jun 2025 12:16 PM (IST)

    पीएमपीएमएल भाववाढी विरोधात शरद पवार गट आक्रमक; थेट घोडागाडी, बैलगाडीतून आंदोलन

    पीएमपीएमएल प्रशासनाने पुणेकरांवर अन्यायकारक भाव वाढ लादल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाने पुणे महानगरपालिकेच्या समोरील पीएमपीएल बस थांब्यावर आंदोलन केलं. महापालिकेसमोर घोडागाडी, बैलगाडीमधून प्रवास करून जोरदार घोषणाबाजी केली. पुणेकरांवर अतिरिक्त दरवाढीचा भार टाकणाऱ्या महापालिका आणि प्रशासनाचा यावेळी निषेध करण्यात आला.

  • 05 Jun 2025 12:09 PM (IST)

    तलवार घेऊन रील बनवणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक ,नांदेडच्या इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    हातात तलवार घेऊन रिल्स बनून सोशल मीडियावर टाकणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवनी येथील आलिम सलीम खा पठाण रिल्स बनवणाऱ्या या तरुणाचं नाव आहे. हातात तलवार घेऊन या तरुणाने अनेक रूल्स बनवल्या. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा प्रकार केल्याचं समोर आलं. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून तलवार देखील जप्त केली आहे. या तरुणावर बेकायदेशीर रित्या हत्यार बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 05 Jun 2025 12:06 PM (IST)

    जालिंदर सुपेकर यांचं काय होणार? त्या आरोपांनी खळबळ

    वैष्णवी हगवणे प्रकरणातील अटकेतील शशांक हगवणे याचा मामा जालिंदर सुपेकर यांच्यावर सहा मोठे आरोप करण्यता आले आहेत. सुपेकरांनी कैदी गायकवाड याच्याकडून 550 कोटीची मागणी करण्यात आली होती. तसेच कैद्यांच्या दिवाळी फराळातही त्याने घोटाळा केला होता, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

  • 05 Jun 2025 11:51 AM (IST)

    पुणे- पीएमपीएमएल भाववाढीच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं अनोखं आंदोलन

    पुणे- पीएमपीएमएल भाववाढीच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं अनोखं आंदोलन सुरू आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने पुणेकरांवर अन्यायकारक भाव वाढ लादल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या समोरील पीएमपीएल बस थांब्यावर आंदोलन करण्यात येतं.. महापालिकेसमोर घोडागाडी आणि बैलगाडीमधून प्रवास करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुणेकरांवर अतिरिक्त दरवाढीचा भार टाकणाऱ्या महापालिका आणि प्रशासनाचा निषेध यावेळी करण्यात आला.

  • 05 Jun 2025 11:43 AM (IST)

    राज साहेबांचा अपमान उद्धवजींनी किती वेळा आणि कसा केला याचं एक स्वतंत्र पुस्तक होऊ शकतं- नितेश राणे

    “आदरणीय राज साहेबांचा अपमान उद्धवजींनी किती वेळा आणि कसा केला याचं एक स्वतंत्र पुस्तक होऊ शकतं. निष्ठावान मनसैनिक का अस्वस्थ आहेत असं तुम्हाला वाटतं? अमेय खोपकर, संदीप देशपांडे का अस्वस्थ आहेत? खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार राज ठाकरे असताना देखील त्यांना सगळ्या पद्धतीने त्रास देऊन, अपमानित करून शिवसेना सोडायला लावली. बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे राज ठाकरे शिवसेना बांधत होते. त्यावेळचा शिवसैनिक बाळासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून राज ठाकरेंकडे बघत होता. राज ठाकरेंचा त्यांनी किती वेळा अपमान केला हे माझ्यासारख्या जुन्या शिवसैनिकाला विचारा,” असं नितेश राणे म्हणाले.

  • 05 Jun 2025 11:30 AM (IST)

    मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला

    मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत. तटकरे-गोगावले वादावर मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

     

  • 05 Jun 2025 11:26 AM (IST)

    मंत्री नितेश राणे यांची शिवसेना ठाकरे गटावर सडकून टीका

    “मातोश्रीतला नरक हे वेगळं पुस्तक होऊ शकतं. संजय राजाराम राऊतच्या पुस्तकाचा भाग दोन मातोश्रीतला नरक असं होऊ शकतं. ठाकरे गटाची मोहीम ही शिवसेनेसाठी आहे की आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं,” अशी टीका नितेश राणेंनी केली.

  • 05 Jun 2025 11:10 AM (IST)

    वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात महत्त्वपूर्ण अपडेट

    वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी फरार होण्यासाठी ज्या थार गाडीचा उपयोग केला, ती थार गाडी संकेत चोंधे याची होती. संकेत चोंधेच्या भावाच्या पत्नीने छळवणूक होत असल्याबाबत खडक पोलीसात तक्रार दिली होती. यावर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप धनश्री चोंधे यांनी केला आहे. जालिंदर सुपेकरांचे मेहुणे शशिकांत चव्हाण हे खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत.

  • 05 Jun 2025 10:56 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात एकाची हत्या

    मुलीची छेड काढणार्‍या तरुणांना जाब विचारायला गेलेल्या वडिलावर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या खेड तालुक्यातील कडूस येथे घडली आहे. संतोष बबन ढमाले या मुलीच्या वडिलांचा घटनेत मृत्यू झाला.

  • 05 Jun 2025 10:47 AM (IST)

    तुळजाभवानी मंदिराच्या आराखड्यात कोर्टात आव्हान देणार

    श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या विरोधात भोपे पुजारी मंडळ उच्च न्यायालयात जाणार आहे.
    पुजारी मंडळाला विश्वासात न घेता 1865 कोटी रुपयांच्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला राज्य सरकारने मान्यता दिल्याचा आरोप या मंडळाने केला आहे.

  • 05 Jun 2025 10:32 AM (IST)

    सांगलीत तरुणाचा खून

    सांगली शहरामध्ये एका भाजी विक्रेत्या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. शहरातल्या शंभरफुटी रोडवर पाठलाग करत धारदार शस्त्राने महेश कांबळे या तरुणाचा खून करण्यात आला आहे.

  • 05 Jun 2025 10:19 AM (IST)

    महाराष्ट्र हितासाठी आम्ही त्याग करणार

    महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करण्यास तयार आहे. महाराष्ट्र हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आम्ही सकारात्मक आहोत. आमचे नेते एका सुरात बोलत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  • 05 Jun 2025 10:08 AM (IST)

    मुक्ताईनगरमध्ये अत्याचाराचा प्रकार उघड

    मुक्ताईनगरच्या भिलवाडी येथे १६वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

  • 05 Jun 2025 10:04 AM (IST)

    मुक्ताईनगरच्या भिलवडीत 16 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार

    मुक्ताईनगरच्या भिलवडीत 16 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार

    घटनेनं मुक्ताईनगरमध्ये खळबळ

    अत्याचार प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी केलं अटक

    घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची पोलिसांकडून माहिती

     

     

  • 05 Jun 2025 09:55 AM (IST)

    वाशिम जिल्हा पुरवठा विभागाचा मोठा निर्णय, जूनमध्ये मिळणार 3 महिन्यांचं धान्य

    वाशिम जिल्हा पुरवठा विभागाचा मोठा निर्णय

    जूनमध्ये मिळणार तीन महिन्यांचं धान्य

    पूर-धोक्याच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागानं घेतला निर्णय

    जून, जुलै, ऑगस्टच्या धान्याचं होणार एकत्र वाटप

    ३० जूनपूर्वी शिधापत्रिका धारकांनी धान्य घेण्याचे आदेश

    लाभार्थ्यांची पावसामुळे होणारी गैरसोय टळणार

  • 05 Jun 2025 09:22 AM (IST)

    अमरावती हादरलं! बापाचा मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

    पोटच्या मुलीवर बापाचा अत्याचार

    आरोपी पोलीस असल्याची माहिती

    24 वर्षीय तरुणीची राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार

    वडील – मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

    पोलीस पित्या विरोधात बलात्कार, विनयभंग अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल

     

  • 05 Jun 2025 09:05 AM (IST)

    सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई, चोरट्याकडून 36 लाखांचे मोबाईल जप्त

    सोलापुरात आंतरराज्य चोरट्याकडून तब्बल 36 लाख 33 हजार रुपयांचे 67 महागडे मोबाईल जप्त

    सोलापूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कामगिरी

    ब्रँडेड मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्याला सोलापुरात अटक

    सोलापुरातील होटगी रोड येथील शोरूममधून 78 ब्रँडेड मोबाईलची केली होती चोरी

    रामनिवास उर्फ रामा मंजू गुप्ता असे आंतरराज्यीय चोरट्याचे नाव

  • 05 Jun 2025 08:45 AM (IST)

    टर्किश एअरलाइन्सला डीजीसीएचा इशारा

    परवानगीशिवाय स्फोटके वाहून नेल्याचा आरोप. भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने टर्किश एअरलाइन्सला कठोर इशारा दिला. देशातील चार प्रमुख विमानतळांवर अचानक करण्यात आलेल्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्या. परवानगी न घेता स्फोटके वाहून नेल्याचा प्रकार. 29 मे ते 2 जून दरम्यान दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि बेंगळुरू विमानतळांवर टर्किश एअरलाइन्सच्या प्रवासी आणि मालवाहू विमानांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत गंभीर त्रुटी समोर.

  • 05 Jun 2025 08:44 AM (IST)

    अमरावती मेळघाटमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

    अमरावती मेळघाटमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भूकंपाचा झटका जाणवला. रात्री 9 वाजून 57 मिनिटांवर 3.8 तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन अधिकची माहिती घेत आहे.

  • 05 Jun 2025 08:43 AM (IST)

    बुलढाण्यात पुन्हा काँग्रेसला मोठा झटका, काँग्रेसचा मोठा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश

    बुलढाणा जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अखेरची घरघर लागलेली आहे. मागील तीन महिन्यांमध्ये या जिल्ह्यातून काँग्रेस पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांनी एक्झिट केली आहे. वेगवेगळ्या कारणाने पक्ष सोडून भाजप, शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केलेले आहेत. दरम्यान आता जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा हेही काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते पुढील आठवड्यात एका जंगी समारंभामध्ये प्रवेश करणार आहेत.

  • 05 Jun 2025 08:41 AM (IST)

    शरद पवारांच्या आमदाराकडून एकनाथ शिंदेंच्या स्वागताची जाहीरात

    राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जाहिरात. ‘स्वामींच्या पावन नगरीत अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे साहेब यांचे सहर्ष स्वागत’ अशा आशयाची जाहिरात देण्यात आलीय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अक्कलकोट दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार राजू खरे यांच्याकडून वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आलीय. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे आमदार राजू खरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे जाहिरात करण्यात आलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.