
अमरावतीच्या दर्यापुरातील विदर्भ कृषी सेवा केंद्रात अजित 155 या कापसाच्या वानाची अवैध साठेबाजी. कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकत प्रकार आणला उघडकीस. मागणी असलेल्या अजित 155 या कापसाच्या वाणाचा विदर्भ कृषी सेवा केंद्राकडून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातं होता तसेच ज्यादा दरातही बियाणे विकत असल्याची बाब निदर्शनास. दरम्यान तालुका कृषी अधिकारी आरती साबळे यांच्या पथकाने साठवणूक केलेला माल शेतकऱ्यांना केला वितरीत. पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी पुण्यात येतात. या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यात शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांतील १० टक्के रुग्णशय्या आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पालखी मार्गावरील मांस आणि मासळी विक्रीची दुकाने पालखीच्या कालावधीत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. या युतीबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचं दिसत आहे. राज्याच्या मनात आहे तसंच करू असे सांगत टाळी पुढे केल्याचं दिसत आहे.
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा हा विषय गाजत आहे. अनिवार्य नसलं तरी हिंदी मागच्या दरवाज्याने लागू करत असल्याचा आरोप राजकीय नेते करत आहे. हाच मुद्दा पकडून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे. हिम्मत असेल तर हिंदी सक्तीची करून दाखवा, असं चॅलेंज दिला आहे.
शिवसेना वर्धापनदिनी सोहळ्यात ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली. शिवसेना स्थापन झाली तेव्हा दाढी खाजवणारे कुठे होता माहिती नाही. सर्व चोरांचा बाजार आहे. भाजपाची पाळलेली बेडकं डराव डराव करत आहेत.
दोन्ही शिवसेना आणि मनसेने एकत्र यावं असं वक्तव्य शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांनी केलं आहे. सध्या कीर्तिकर हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत.
‘काश्मीर या देशाचं महत्त्वाचं अंग आहे. राज्यातील अनेक पर्यटक पहलगाममध्ये जातात. तिथे चार अज्ञात लोक बंदूक घेऊन येतात आणि धर्म विचारून आमच्या माय भगिनीवरच्या माथ्यावरचं कुंकू पुसतात. देशात हाहाकार माजतो. दोन महिने हल्ल्याला झाले तरी चार अतिरेक्यांचा शोध ५६ इंचाचं सरकार घेऊ शकले नाही. कुठे गेले ते अतिरेकी.’, असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला.
शिवसेना ठाकरे गटाची वर्धापनाची सभा षण्मुखानंदमध्ये सुरु आहे. या कार्यक्रमात शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. आमच्या मनोरंजनाची जबाबदारी सरकारने घेतली आहे. कुणीतर एक मंत्री उघडाबंब अघोरी बाबासमोर बसला आहे, असं सांगत टीका केली.
संत तुकाराम महाराज यांची पालखी निगडी येथे दाखल
संत तुकाराम महाराज पालखी रथाचे सारथ्य आमदार शंकर जगताप व आमदार अमित गोरखे यांनी केले
पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी व दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी
पालखी आज आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा लक्षवेधी ठरणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वरळी डोममध्ये शिवसेनेचा कार्यक्रम होत आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचा षण्मुखानंदमध्ये सोहळा पार पडणार आहे. आता हे दोन्ही नेते काय बोलणार? याकडे लक्ष लागून आहे.
कल्याणसह परिसरात पावसाची संततधार
पावसामुळे कल्याण तालुक्यातील काळू नदीची पातळी वाढली
कल्याण तालुक्यातील टिटवाळा जवळचा रुंदे पूल पाण्याखाली
रुंदा, उशिद, मढ, आरेले, भोंगाळपाडा इत्यादी गावाचा संपर्क तुटला
तहसील प्रशासनाकडून ग्रामस्थांना पर्यायी पुलाचा वाहतुकीसाठी वापर करण्याचा सूचना
अमरावती शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस
दांडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने बळीराजा आनंदी
पावसाने दमदार हजेरी लावल्याने पेरणी ला येणार वेग
पावसाने दांडी मारल्याने पिके जगवण्यासाठी तुषार सिंचन लावून शेतकऱ्यांनी केल होत केलं भर पावसाळ्यात सिंचन सुरू
स्लीपर चप्पलमध्ये लपवून गांजा जेलच्या आता नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैद्याला धंतोली पोलिसांनी अटक केली. नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सारफराज जहागीर आलम कैद्याला न्यायालयीन कामकाजासाठी बाहेर आणण्यात आले होते. परत जेलमध्ये नेत असताना त्याची तपासणी केली असता त्याची चप्पल कडक लागली त्यामुळे जेलमध्ये असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याने त्याची कसून तपासणी केली. त्याची स्लीपर बघितली असता त्याच्या आत गांजा लपविलेला होता. पोलिसांनी 200 ग्राम गांजा त्याच्या कडून जप्त करत गुन्हा दाखल केला. पोलीस आता हा गांजा त्याला कोणी दिला, तो कोणासाठी जेलमध्ये घेऊन जात होता याचा तपास करत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बाणगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. ओझर येथे बाणगंगा नदीला आलेल्या पुरात एक व्यक्ती वाहून गेला आहे. विठ्ठल नामदेव शिंगाडे असे या वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा शोध प्रशासनाकडून सुरू आहे.
सांगली जिल्ह्यातील रेठरेहरणाक्ष गावात, दलित वस्तीजवळ असलेल्या एका पानपट्टीत खुलेआम सुरू असलेली देशी दारूची विक्री सरपंच शुभांगीताई धनाजी बिरमुळे यांनी धाडसाने बंद पाडली. दारूमुळे गावातील तरुणाई व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक कुटुंबांत कलह वाढत होता, ज्यामुळे महिला भगिनी त्रस्त होत्या. पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने दारू विक्रेत्याचे फावत होते. महिलांच्या तक्रारीनंतर, शुभांगीताईंनी स्वतः पुढाकार घेत एकट्यानेच पानपट्टीवर धाव घेतली. त्यांनी स्वतः शोध घेतल्यावर दारूचे बॉक्स आढळून आले, ज्यामुळे दारू विक्रेत्याची भंबेरी उडाली. शुभांगीताईंनी त्याला सज्जड दम भरल्यावर, त्याने माफी मागून यापुढे दारू विक्री न करण्याची ग्वाही दिली, आणि अशा प्रकारे या लोकनियुक्त सरपंचाने गावातील मोठी समस्या सोडवली.
आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मालाड विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी, माजी शाखाप्रमुख संजय जगम, गोवंडी येथील शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका नादिया मोहसिन शेख, मोहसिन शेख, आणि घाटकोपरचे माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेच्या वर्धापन दिनादिवशीच झालेल्या या पक्षप्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकांपूर्वीच शरद पवार गट आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, कालच मातोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक पार पडल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी काही माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला खिंडार पडल्याचे दिसून येत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जाकी पिंपरी येथे एक दुर्घटना घडली आहे. लग्नाच्या 3 दिवस आधी विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला आहे. विद्युत पोलच्या लाईन वरील स्विच बदलताना शॉक लागला. शॉकमुळे तरुणाचा मृत्यू झाला आहे.
आज संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील बोरघर येथे पाणी साठले आहे. संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे एका बाजूची वाहतुक खोळंबली आहे. मुंबईकडे जाणारी वाहतुक दुसर्या लेनने सुरु ठेवण्यात आली आहे.
नाशिकमध्ये आज सकाळापासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे तेथील गोदावरी नदीतील पाणीपातळी वाढली असून येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, गोदावरी नदीच्या पात्रात कार बुडाल्याची माहिती समोर येत आहे.
गोंदियात छत्तीसगढ येथील एका बिडीच्या ब्रँडची नकली आवृत्ती करणाऱ्या अटक, तीन लाखाचा मुद्देमाल जप्त झाला असून तीन आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
नालासोपारा पूर्व येथे रात्री पासून पडणाऱ्या पावसामुळे विरार – वसई जोडणाऱ्या आचोळे मुख्य रस्त्यावर दोन फूट पाणी साचले असून रुग्णवाहिका, वाहनधारक यांना पुरातून मार्ग काडताना मोठी कसरत करावी लागत आहे.
मुंब्रा रेल्वे अपघातात अपघाती मृत्यूंची संख्या वाढली, ज्युपिटर रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये दोन जणांपैकी अनिल मोरे यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.
इम्तियाज जलील हा दलाल आहे, निजामाची औलाद आहे, त्याने आम्हाला शिकवायचे का की राजकारण काय असतं, बाळासाहेब काय करायचे, बाळासाहेबांनी कधीही जातीचे राजकारण केलं नाही, कोणत्या जातीचा कोण आहे ते पाहिले नाही. त्यांच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढणार असे मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
माऊली चरणी प्रार्थना करतो की राजकारणाचा जो स्तर खाली जात आहे. पैसा दडपशाही मोहमाया दाखवून मत घेण्याचा प्रयत्न सुरू असून हे स्वार्थी राजकारण थांबावे.पूर्वी सारखे राजकारण व्हावे ही प्रार्थना असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले.
या नंतर पक्षातील तक्रारी नको , एकदिलाने काम करा असा इशारा पुण्यातील काँग्रेस पदाधिकार्यांना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. निवडणूक होईपर्यंत पक्ष संघटनेत बदल होणार नाहीत. आघाडी सोबत निवडणूक लढवायची की स्वबळावर याचा अहवाल मागितला.
नागोठणे शहरात अंबा नदीचं पाणी रस्त्यावर आलं असून, त्यामुळे नागोठणे शहरात जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पातळी वाढल्याने रस्त्यावर पाणी साचलं आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्तासह बॅरिकेटिंग लावून वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.
नाशिकमध्ये सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळपासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामकुंड आणि गोदा घाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे. आज नाशिकला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय
मला आज बाळासाहेब ठाकरेंची आठवण येत आहे आज एकाच पक्षाच्या दोन मेळावा का होत आहेत? उद्धव ठाकरे यांनी याचा विचार करायला हवा होता. खरा वर्धापन दिन शिवसेनेचा आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना सोडलेले नाही. काल माजी नगरसेवकाची भेट घेतली आणि त्यांना विचारले की त्यांना राज ठाकरेंसोबत जायचे आहे का? तुम्ही ही बैठक आधी का घेत नव्हता? असे सवाल करत कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर टीका केली.
मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उंच लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारटपट्टीवर 3.5 ते 3.8 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मच्छिमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिंगोली- किराणा दुकानाला आग लागून शालेय साहित्यासह विविध साहित्य जळून खाक झालं आहे. दुकानालगत असलेल्या घरातील सदस्य वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. वसमत तालुक्यातील भोरिप-गावातील ही दुर्दैवी घटना आहे.
वसमत येथील अग्निशमन दलाच्या साह्याने दीड तासानंतर आग आटोक्यात आणली.
खडकवासला धरण साखळीत 4 तासात 15 टक्के पाण्याची वाढ झाली आहे.
सकाळी 6 वाजता 65 टक्के जल साठा होता, 10 वाजता तो 80 टक्के झाल्याची माहिती पाठबंधारे विभागाने दिली.
खडकवासला धरण 80 टक्के भरल्याने दुपारी 1 वाजता 1920 क्यूसेक्सने मुठा नदी पात्रात विसर्ग करण्यात येणार आहे.
रायगड, पुण्यात पावसाचा जोर वाढला असून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून शाळा, कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुण्यात सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरातील हिंगणे खुर्दमधील घरात पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकाची त्रेधातिरपीट उडाली आहे.
रायगडमध्ये पावसाचा जोर वाढत असतानाच कुंडलिक नदीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या या नदीची पाणीपातळी 24.50 मीटरवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे आंबा नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या 10.20 मीटरवर पोहोचली आहे. नागोठणे येथील एसटी स्टँड परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज परिसरात सध्या पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे प्रशासनाने सावधतेचा इशारा दिला असून, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील रोशनी सोनघरेच्या पार्थिवावर डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीला कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, तसंच एअर इंडिया (टाटा समूहाचे कर्मचारी) आणि राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोंबिवलीकरांनी भावपूर्ण अश्रूंनी रोशनीला अखेरचा निरोप दिला.
पुणे- नणंदेच्या त्रासाला कंटाळून महिलेनं ६ वर्षीय मुलासह इमारतीवरून उडी मारली असून यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिलेनं सहा वर्षीय चिमूरड्यासह इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. आंबेगाव बुद्रुक परिसरातील कल्पक सोसायटीत ही घटना घडली.
आमदार किरण लहामटे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आमदारांच्या विरोधात सर्व कंत्राटदारांनी आंदोलन केलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. आमदार नाहक त्रास देत असल्याची मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली. जर कोणत्याही कंत्राटदारानं आत्महत्या केली तर आमदार जबाबदार असतील अशा इशाराच असोशिएशनने दिला.
संत ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी प्रस्थान नेहमीपेक्षा तीन तास उशिरा होणार आहे. गुरुवारची परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात होईल.
पुणे – खडकवासला धरणात सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत 8% पाणी वाढ झाली आहे. सकाळी 6 वाजता खडकवासला धरणात 65 टक्के पाणीसाठा होता. तो 10 वाजल्यानंतर 73 टक्क्यांवर पोहोचला आहे. 80 टक्क्यांवर पाणीसाठा झाल्यानंतर धरणातून विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. गोंदे फाटा येथे वाहतूक कोंडी झालीय एक ते दीड किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसऱ्या बाजूला महामार्ग पोलिस केंद्र घोटीचे कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
पुण्यातील हगवणे प्रकरणानंतर शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेकडून हुंडाविरोधी हेल्पलाइनची घोषणा होणार आहे. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने हुंड्यामुळे पीडित महिलांसाठी आज हेल्पलाइन नंबर जारी करण्यात येणार आहे. या क्रमांकावर महिलेने तक्रार केल्यास शिवसेना शिवसेना स्टाईलने लक्ष घालणार. तक्रार करणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
रत्नागिरीतील 608 साकव वर्षानुवर्षे दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. कोकणातील अनेक साकवांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मुठीत जीव घेऊन ये-जा करावी लागत आहे. कुठरे, नांदगाव, पाते, तळवडे आणि घेगाव ही गावं साकवावर अवलंबून आहेत.
आमदार किरण लहामटे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आमदार किरण लहामटे यांच्या विरोधात सर्व कंत्राटदारांकडून आंदोलन करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे आमदार लहामटे यांची तक्रार करण्यात आली आहे. आमदार नाहक त्रास देत असल्याची मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. जर कोणत्याही कंत्राटदारानं आत्महत्या केली तर आमदार जबाबदार राहतील असा इशारा असोशिएशनने दिला आहे.
शासनाची फसवणूक करुन वनविभागाची जमीन लाटल्या प्रकरणात जे एम म्हात्रे यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीकडून पनवेल आणि दादर परिसरात छापेमारी करण्यात आली आहे.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदावर बच्चू कडू हे राहणार की नाही याचा निर्णय आज होणार आहे. बच्चू कडू यांना विभागीय सहनिबंधकांनी अपात्र केल्यामुळे त्यांचे संचालक पद गेले आहे. त्यावर बच्चू कडू यांनी न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी आज होणार आहे.
नाशिकच्या रामसेतू पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा निम्मा पूल खचल्याने दुर्घटना होण्याची भीती आहे. प्रत्येक पावसाळ्यात पूरस्थिती आल्यावर हा पूल पाण्याखाली जातो. या पुलाला मोठे तडे पडले आहे.
ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या लांबचा लांब रांगा लागल्या आहेत. मुलुंड टोल नाकाजवळ मोठ्या प्रमाणात वाहतुकी कोंडी झाली आहे.
पुणे जिल्ह्यात जेजुरी मोरगाव रोडवर एक भीषण अपघात झाला. किर्लोस्कर कंपनीच्या जवळ श्रीराम ढाब्यासमोर हा अपघात झाला. पिकअप वाहन आणि स्विफ्ट डिजायर कारच्या धडकेत 8 लोकांचा मृत्यू झाला.
पर्यटननगरी लोणावळ्यात तुफान पाऊस झालाय. गेल्या 24 तासांत तब्बल 221 मिलिमीटर म्हणजेच 8.70 इंच पाऊस कोसळलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेपर्यंत 323 मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा मात्र पावसाने इतकी जोमाने बॅटिंग केलीये की त्यामुळं आजच्या दिवसापर्यंत 1166 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या डोंबिवलीतील हवाई सुंदरी रोशनी सोनघरेचा मृतदेह आठवड्याभरानंतर काल मुंबईत दाखल झाला होता. थोड्याच वेळात रोशनीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी डोंबिवली पूर्वेकडील न्यू ओमीया सोसायटीत आणण्यात येणार. सकाळी साडे नऊच्या वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडणार असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी आज आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. या निमित्ताने आळंदी नगरीत जोरदार पाऊस असूनही भक्तिरसाचं उधाण आलं आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी इंद्रायणीच्या तीरावर एकवटलेत. ओठांवर ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर घेत हे वारकरी पंढरपूरच्या वाटेवर सज्ज झाले आहेत.