
किल्ले रायगडावर आज तिथीनुसार ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील गडावर उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातही शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. ठाण्यात होणाऱ्या या पक्षप्रवेश सोहळ्यात पाच हजार कार्यकर्त्यांसह ते शिवसेनेत दाखल होणार आहे. राज्यातील कोकण-गोव्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. मे महिन्यात पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा सुमारे एक हजार टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
शिवराज्याभिषेक दिन म्हणजे हिन्दवी स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात आला. देवदर्शन पदयात्रेचे आयोजनही करण्यात आले आहे. संभाजी भिडे गुरुजी आणि शिवप्रतिष्ठान कार्यकते यांची उपस्थिती होती.तसेच मंत्री संभुराजे देसाई आणि मंत्री प्रकाश अबीटकर याचीही प्रमुख उपस्थिती होती.
मुंब्र्यातील 2 रेल्वे ट्रॅकमधलं अंतर मोजण्यासाठी अधिकारी ट्रॅकवर आले आहेत. मुंब्र्यातील 2 रेल्वे ट्रॅकमधील अंतराचं मोजमाप रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे. रेल्वे अधिकारी आणि पोलि रुळावर उतरून काम सुरु करण्यात आलं आहे. तसेच दोन ट्रेन एकमेकांच्या फार जवळून पास होतात तेव्हा त्यांच्यामधील अंतर किती असतं. याची पाहणी देखील केली गेली. एवढंच नाही तर अपघात झाला तेव्हा नक्की काय झालं होतं हे देखील तपासून पाहण्यात आलं आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्यावर शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ठाकरे बंधू राजकारणातल्या बुडत्या नावेत बसलेत. दोघे एकत्र आले तरी त्यांचा राजकीय उद्धार होणारच नाही” असं खोचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन कळवा रुग्णालयात पोचले आहेत
मृतांच्या नातेवाईकना ५ लाखांची मदत जाहीर –
जखमींना मदत करून त्यांचे उपचार सरकार करणार
महाराष्ट्रात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. शिवसैनिकाकडून या निर्णय होण्यासाठी उत्सुकता आहे. पुण्यात आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकाकडून एकाच बॅनरवर शुभेच्छा देण्यात आला आहेत. आज राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना पुण्यातील शिवसैनिकाकडून चौका चौकामध्ये आदित्य ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लागल्यास पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांची आतापासूनच मनाची तयारी करून शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहे.
मुंबईत आज सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. कसाऱ्याहून CSMT कडे जाणाऱ्या लोकलमधून ८ प्रवासी पडून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. आपल्या देशात माणसाची किंमत नाही. मुंबईतील गर्दी नवी नाही, रेल्वेमंत्री काय करतात, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
महाराष्ट्रात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. शिवसैनिकाकडून या निर्णय होण्यासाठी उत्सुकता आहे पुण्यात आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकाकडून एकाच बॅनरवर शुभेच्छा देण्यात आला आहेत.
गोंदियामध्ये मृग नक्षत्र सुरू होऊन सुध्दा पावसाचे आगमन झालेले नाही. उलट तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात 42.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. शनिवार 7 जूनला 38 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद घेण्यात आली होती. मात्र, अचानक तापमानात वाढ झाली असून 42.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात घेण्यात आली आहे. तर या उन्हामुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला असून या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत…
आपल्या देशात माणसाची किंमत नाही. मुंबईतील गर्दी नवी नाही, रेल्वेमंत्री काय करतात, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. रेल्वे दुर्घटनेनंतर सरकारने तातडीने लक्ष दिलं पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.
मुंब्रा अपघातात पाच जणांचा मृत्यू. खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती. कळव्यामध्ये एक तर सिव्हिल रुग्णालयामध्ये चार जणांचा मृत्यू. इतरांवर उपचार सुरु. ठाण्यापर्यंत पाचव्या, सहाव्या लाईनचे काम झालय. जास्तीत जास्त गाड्या सोडाव्यात. 12 डब्याची लोकल 15 डब्बे करावे अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी केली.
मध्य रेल्वेची लोकल सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने. अंबरनाथ रेल्वे स्थानकावर 12.24 ची लोकल उशिराने. बदलापूर ते सीएसएमटी लोकल उशिराने.
तिवसा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूनी बच्चू कडू यांची केली वैद्यकीय तपासणी. गेल्या 24 तासापासून बच्चू कडू यांच्या पोटात अन्नाचा कण नसल्याने बच्चू कडू यांना जाणतोय अशक्तपणा. सध्या बच्चू कडू यांची प्रकृती स्थिर. आंदोलन स्थळी गुरूंकूज मोझरी मध्ये पारा आहे 40 डिग्री.
वाशिम जिल्ह्यातील येवती येथील एका हॉटेलमध्ये आज सकाळी गॅस गळतीमुळे आग लागून स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, उंदराने गॅसची नळी कुरतडल्यामुळे गळती झाली आणि त्यानंतर आग भडकली. हॉटेल मालक गजानन काळे हे या आगीत जखमी झाले आहेत. आगीच्या वेळी काही नागरिक हॉटेलमध्ये नाश्ता करत होते.
मुंबईत सकाळी झालेल्या लोकल अपघातात ऐरोलीला निघालेल्या तरुणीचा समावेश आहे. स्नेहा दौडें असं जखमी तरुणीचं नाव आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तिच्यावर देखील उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. शिवसैनिकाकडून हा निर्णय होण्यासाठी उत्सुकता आहे. पुण्यात आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून एकाच बॅनरवर शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. आज राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना पुण्यातील शिवसैनिकाकडून चौका चौकामध्ये आदित्य ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लागल्याचं पाहायला मिळत आहे.
छत्तीसगड माओवाद्यांच्या IED ब्लास्टमध्ये एएसपी आकाश राव शहीद झाले. माओवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन सुरू असताना 76 पोलीस जवानांना टार्गेट करण्यासाठी माओवाघांनी ब्लास्ट केला होता. या ऑपरेशनचं मुख्य नेतृत्व करणारे छत्तीसगड पोलिसाचे ASP हल्ल्यात शहीद झाले. यात काही जवान जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सुकमा जिल्ह्यातील कोंटा भागातील घटना आहे.
लोकल ट्रेनमधून पडून आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. “नवीन गाड्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसह येतील. त्याच्यामध्ये 238 एसी लोकल मुंबई उपनगरासाठी घेतले जाणार आहेत. या गाड्यांना ऑटोमॅटिक डोअर फिटमेंट असेल. तिसरा निर्णय म्हणजे आयसीएफद्वारे आताच्या लोकल गाड्यांना रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावण्याचा प्रयत्न करणार आहोत,” असं जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांचा खाली पडून मृत्यू झाला आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. हे सर्व प्रवासी फूटबोर्डवर उभं राहून प्रवास करत होते, असं रेल्वेच्या पीआरओंनी सांगितलंय.
सोलापूर-गोवा विमानसेवेला आज (सोमवारपासून) सुरुवात होणार आहे. गोव्यावरून सोलापूरच्या दिशेने निघालेले विमान काही वेळात सोलापूर विमानतळावर दाखल होणार आहे. गोव्यावरून आलेल्या विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात येणार आहे. प्रवाशांच्या स्वागतासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राम सातपुते आणि अन्य नेते उपस्थित आहेत.
दिवा-मुंब्रा दरम्यान लोकलमधील काही प्रवाशी समोरुन येणाऱ्या एक्सप्रेसला घासले गेले. यात 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
स्वतःचं घर बांधण्यासाठी दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने धाराशिवमध्ये जेरबंद केल आहे. धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या धुमाकूळ घालणारा अट्टल गुन्हेगार कृष्णा उर्फ पिंटू खडेल शिंदेच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या अट्टल गुन्हेगाराने आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यात 15 ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. मात्र अखेर स्थानिग गुन्हे शाखेने गुन्हेगाराला अटक करण्यात यश मिळवलंय. पोलिसांनी पिंटूकडून साडेआठ तोळे सोनं जप्त केलं आहे.
दिवा-मुंब्रा इथे रेल्वेतून पडलेल्या 5 जणांच्या मृत्यूबाबत नवी माहिती समोर आली आहे. दिवा-मुंब्रा दरम्यान काही वेळापूर्वी एक्सप्रेसमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र ते प्रवासी एक्सप्रेसमधील नसून लोकल रेल्वेतून प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. लोकलला लटकलेले प्रवासी समोरुन आलेल्या एक्सप्रेसला घासले गेल्याची अपडेट आहे. या सर्व प्रकारात 8 प्रवासी लोकलमधून खाली पडले. त्यापैकी 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. या सर्व प्रकारानंतरही वाहतुक सुरळीत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
धुळे शहरात 850 कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिकेच्या वतीने हे काम करण्यात येत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या भागात भूमिगत योजनेचे काम सुरू आहे. काम सुरू झाल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ते लवकर दुरुस्त व्हावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
महिलांवरील कौटुंबिक हिंसाचारात वाढ… ठाण्यात गुन्ह्यांनी गाठला 200 चा आकडा.. सर्वाधिक कल्याण परिमंडळ 87 गुन्हे दाखल,ठाणे 46,भिवंडी 48, उल्हासनगर 49… जानेवारी ते मे महिना दरम्यान ठाणे आयुक्तालय क्षेत्रात एकूण 206 गुन्हे दाखल… एकूण 206 गुन्हे उघडकीस तर 256 जणांना अटक करण्यात ठाणे पोलिसांना यश….
पुष्पक एक्स्प्रेसमधून खाली पडल्याने 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. प्रवाशांच्या मृत्यूची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. दिवा – मुंब्रा रेल्वे स्थानका दरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबईहून लखनौला एक्स्प्रेस जात असतान घडली घटना…
तुळजाभवानी मातेच्या मंदीरात वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमी खबरदारी घेण्यात येत आहे. संस्थानकडून परिसरात स्वच्छते बरोबरच सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे. तसेच कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सुचना देखील मंदीर संस्थानच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून भाविक येत असतात. त्यामुळे दर्शनासाठी येताना भाविकांनी मास्क,सॅनिटायझर व सोशल डिस्टंन्स ठेवण्याचे आवाहन मंदीर संस्थानच्या वतीने करण्यात आलंय.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर देखील हालचाल नसल्याने साधू महंत अस्वस्थ… पंधराशे एकर जागा कायमस्वरूपी अधिग्रहित करण्याची साधुमंतांची मागणी… कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या देशभरातील साधू महंत यांच्यासाठी जागा अधिग्रहणाचा प्रस्ताव… मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेनंतर देखील अद्याप अतिग्रहणाची प्रक्रिया सुरू नाही.. नाशिकच्या तपोवन परिसरात साधू ग्रामचा प्रस्ताव… 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला अद्यापही मुहूर्त नाही… साधू ग्रामच्या जागेचा अद्याप निर्णय होत नसल्याने नाराज
बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 60 पेक्षा अधिक कार्यकर्ते आणि शेतकरी बसले आमरण उपोषणाला… जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही… शेवटपर्यंत बच्चू कडूंना साथ देणार उपोषणकर्त्यांची भूमिका… 12 तारखेनंतर गावागावात आंदोलन पेटणार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक..
पुणे यंदाच्या मे महिन्यात पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा सुमारे एक हजार टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यातील सरासरीपेक्षा ३९ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. आता १४ जूननंतर पाऊस सक्रिय होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
विदर्भातील पंढरी म्हणून ओळखले जाणारी संत गजानन महाराज यांची पालखी पांडुरंग भेटीच्या ओढीने संत नगरी शेगाव येथून मार्गस्त झालेल्या पालखीचे वाशीम जिल्ह्यात काल दाखल झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी मालेगाव शहरात प्रवेश करणार आहे.
पीएमपीचे तिकीट काढताना प्रवाशांची नोंद करण्यात येणार आहे. भविष्यातील योजनेसाठी डेटा गोळा केला जाणार आहे. पीएमपी प्रशासनाकडून बसमध्ये नेमके किती पुरुष, किती महिला आणि लहान मुले प्रवास करतात यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात झाली आहे.
जालनामधील भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद शिवारातील खादगाव फाटा या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास एका सीएनजी कारणे पेट घेतल्याची घटना घडली. यामध्ये कार पूर्ण जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.