
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज राज्यभरात ठिकठिकाणी महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून शांततापूर्वक मूक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात महाविकासआघाडीचे अनेक नेते सहभागी होणार आहेत. मुंबईतील शिवसेना भवनाजवळ ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आंदोलन करणार आहेत. तर पुण्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे मूक आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यासोबत काँग्रेसही राज्यभरात मूक आंदोलन करणार आहे. यावेळी महाविकासआघाडीचे नेते तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करणार आहेत. तर महाविकासआघाडीच्या आंदोलनाला भाजपकडून प्रत्युत्तर देत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच २५ ऑगस्टला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. उद्या 25 ऑगस्ट रोजी जळगावात होणाऱ्या लखपती दीदी परिषदेत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे. कार्यक्रमादरम्यान 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना या परिसरात आणखी दहशतवादी असण्याची भीती आहे, त्यामुळे शोध मोहीम राबवली जात आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अल कायदाच्या एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे आणि 11 संशयितांना अटक केली आहे, तर काही जणांची चौकशी सुरू आहे.
छत्तीसगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, छत्तीसगडमध्ये नक्षलवादाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. बिहार, झारखंड, ओडिशा नक्षलमुक्त झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने एक दिवसीय लाक्षणिक बंदाची हाक दिली आहे. महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीतर्फे व्यापारांच्या विविध अडचणीसाठी हा एकदिवसीय लाक्षणिक बंद असणार आहे. 27 ऑगस्टला हा लक्षणिक बंद असणार आहे. मालावर आकारला जाणारा दुहेरी कर आणि विविध अशा मागणीसाठी हा बंद असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (दादा गट) जम्मू-काश्मीर विधानसभा लढवणार आहे. राष्ट्रवादीने तीन जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. पुलवामा राजपुरा आणि त्राल या 3 मतदारसंघातून राष्ट्रवादी निवडणूक लढवणार आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या घरी एसआयटी ची टीम दाखल झाली. एसआयटीने अक्षय शिंदेच्या घरी जवळपास 45 मिनिटं सर्च ऑपरेशन केलं. अक्षय शिंदे यांचा मोबाईल मिळत नसल्याने एसआयटी त्याचा मोबाईल शोधण्यासाठी घरी आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर पोलिसांनी एका व्यक्तीला तोंडावर रुमाल बांधून त्याच्या घराजवळ आणलं होतं. त्याला सोबत घेऊन एसआयटी घराचे दरवाजे उघडून दाखल झाली.
पक्षातूनच विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना विरोध. भाजप प्रदेश सचिव अरुण मुंडे आणि ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी शेवगाव येथे निर्धार मेळावा घेत केली उमेदवारीची इच्छा व्यक्त. विधानसभा निवडणुकीत दोघांपैकी कोणालाही उमेदवारी द्या. विद्यमान आमदार मोनिका राजळे यांचं काम करणार नसल्याचं मेळाव्यात केलं जाहीर. निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून मुंडे आणि दौंड यांच मोठ शक्ती प्रदर्शन.
कल्याण डोंबिवलीत जोरदार पावसाला सुरुवात. सकल भागात रस्त्यावरती पाणी साचायला सुरुवात, तर कल्याण स्टेशन परिसरामध्ये रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करत पाण्यातून मार्ग काढत चालवावी लागत आहेत वाहने.
काही वेळातच राज ठाकरे यांचे अमरावती शहरात होणार आगमन. मनसेच्या वतीने क्रेनच्या माध्यमातून राज ठाकरे यांना घातला जाणार हार. ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरे यांचे होणार स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी साधणार सवांद.
रेल्वे ट्रॅकवर लाकूड ठेवून अपघात करण्याचा प्रयत्न. फर्रुखाबाद एक्सप्रेस ट्रेनच्या इंजिनमध्ये लाकडाचा ओंडका अडकला. पायलटने इमरजेंसी ब्रेक लावून ट्रेन थांबवली. पायलटच्या समयसुचकतेने मोठा अनर्थ टळला. ओंडका अडकलेली ट्रेन कासगंज ते फर्रुखाबाद कडे जात असताना घडली घटना. शुक्रवारच्या रात्रीची घटना. घटना घडल्यानंतर प्रशासनाची टीम हजर.
मुंबई उपनगरातील दहिसर बोरीवली मागाठणे परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने आज मुंबईत मुसळधार पावासाचा इशारा दिला होता.
कोलकता प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार आणि खून प्रकरणात आता सात जणांची पॉलीग्राफ टेस्ट होणार आहे. आरोपी संजय रॉय संदीप घोष यांच्यासह चार डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याची पॉलीग्राफ टेस्ट होणार सीबीआय कार्यालयात पॉलीग्राफ टेस्ट होणार आहे.
आज सकाळपासून मुंबई उपनगरात अधूनमधून पाऊस पडत आहे.अंधेरी भुयारी मार्ग पाणी भरल्याने बंद झाला आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसानंतर अंधेरी सबवे सध्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले आहे. अपघाताचे कारण अद्याप समोर नाही. हेलिकॉप्टरमधले लोक सुखरूप असल्याची एसपींनी माहिती दिली.
आमच्या बहिणीचा प्रेम अनमोल आहे निखळ आहे. तुम्ही म्हणतात 10 टक्के महिलांना फायदा होणार नाही मात्र दीड कोटी महिलांना लाभ मिळतेय. कुठल्याही बहिणीला वंचीत ठेवणार नाही. शेवटचा फॉर्म येई पर्यत थांबणार नाही सप्टेंबरमध्ये सुद्धा लाभ देऊ, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या 25 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. लखपती दीदी या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी यांची उपस्थिती राहणार आहेत. जळगावच्या विमानतळा समोर शंभर एकर जागेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या लखपती दीदी कार्यक्रमाची जय्यत अशी तयारी केली जात आहे. या कार्यक्रमाला जवळपास एक ते दीड लाख बचत गटाचा महिलांची उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे मनोरुग्ण युवतीवरील बलात्कार प्रकरणी शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसने आयोजित केलेल्या मोर्चाने शहर भ्रमण करत स्थानिक पोलीस ठाण्यावर धडक दिली.
अवकाळी पाऊस गारपीट होते. राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहत आहे. आम्ही 1 रु पीकविमा आणला. विविध योजना आणल्या, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. 1000 क्युसेस ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज आणि उद्या नाशिक मध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. धरण क्षेत्रात देखील पावसानं जोरदारल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळींची गुणरत्न सदावर्तेंवर सडकून टीका केली आहे. सदावर्ते म्हणजे गाढव पाळणाराच ना? मुळात गाढवं पाळणारा गाढवासारखा वागतो हें कालच्या घटनेने सिद्ध झाले. भाजपच्या गाढवाने काल कोर्टात याचिका दाखल केली, असे जिव्हारी वार त्यांनी केला.
बदलापूरमध्ये ज्या शाळेत लहान मुलींवर अत्याचार झाला होता, ती शाळा सुरु होताच शाळेत सुरक्षेसाठी काय काय व्यवस्था केली आहे यांची पालकासोबत बैठक घेऊन माहिती देण्याची मागणी करत पालकांनी शाळे बाहेर गोंधळ घातला आणि जाब विचारला,
महाविकास आघाडीचे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात तोंडाला काळ्या फिती हातात झेंडे घेऊन निषेध आंदोलन. राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी.
बदलापूर येथील घटनेचा निषेधार्थ जालन्यात निषेध आंदोलन करण्यात आलेय. तोंडाला काळ्या पट्ट्या लावून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध केलाय..
मेळाव्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे येते आहेत. आदिवासी भागातील आकाळकुवा येथे येणार आहे.
अंबादास दानवे यांचा मूळ डीएनए हा भाजपचा आहे. भाजपमध्येच अंबादास दानवे यांचं प्रशिक्षण झालं आहे. त्यांच्या मनात भाजप आहे आणि ओठावर शिवसेना आहे.
बंदुकीच्या साहाय्याने बेशुद्ध करण्यात आले अस्वलाला. नवेगाव नागझिरा रेस्क्यू टीमने केले अस्वलाचे रेस्क्यू. गोंदिया शहराच्या गणेश नगर परिसरात असलेल्या जुन्या जिल्हा परिषदच्या आवारात अस्वला आल्याने एकच खळबळ उडाली होती.
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे मोर्चा… गोंदिया शहरातील गांधी चौकात एकत्रित येत नोंदविला निषेध… काळे झेंडे दाखवत व तोंडावर काळी पट्टी बांधत केला निषेध आंदोलन..
विरोधकांना काहीच काम नाही म्हणून आंदोलन… विरोधक फक्त राजकारण करत आहेत… राजकिय फायदा घेण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न सुरू… पण लोकं यांना आता शिव्या घालत आहेत राजकीय फायदा मिळणार नाही… हे फक्त घंटाभर आंदोलन करतात आणि मग निघून जातात… असं वक्तव्य संजय शिरसाठ यांनी केलं आहे.
नेपाळ बस दुर्घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे काठमांडूला पोहोचल्या… रक्षा खडसे यांनी घेतला अधिकाऱ्यांकडून आढावा… भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव आणि नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव श्री ब्रिघू ढुंगाना यांच्यासोबत केली चर्चा… मृतदेह महाराष्ट्रात आणण्याबाबत केली चर्चा… लवकरच सर्व मृतदेह विशेष विमानाने महाराष्ट्रात आणले जाणार….
यूपीच्या खालोखाल महाराष्ट्रात सर्वाधीक बलात्काराची प्रकरणं… बीड, सांगलीत महिला ऊसतोड मजुरांच्या जीवाशी खेळ… सरासरी एका तासाला एका बलात्काराच्या प्रकरणाची नोंद… बलात्काराची प्रकरणं मविआच्या काळातही समोर आली आहेत… कठोर शासन होत नाही त्यामुळे रोज असे प्रकार सुरु आहेत… असा खुलासा देखील राज ठाकरे यांनी केला आहे.
शरद पवार यांनी फोडफोडीचं राजकारण सुरु केलं… गणेश नाईक, राणे गेले हे शरद पवार यांचं राजकारण… जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर सुरुवात झाली… असं वक्तव्य देखील राज ठाकरे यांनी केलं आहे.
गलिच्छ राजकारणाचा राग जनता विधानसभा निवडणुकीत काढणार… गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू… गलिच्छ राजकारण जनता विसरलेली नाही… जातीवादाला शरद पवार एकटे कारणीभूत… असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.
दिवाळी नंतर विधानसभा निवडणूक लागतील अस वाटतं… कारण आचार साहिंता लागत नाही तो पर्यंत काही सांगता येत नाही… असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.
शिवसेना भवनासमोर ठाकरे गटाचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात संजय राऊत, आदित्य ठाकरे अनिल देसाई हे नेते उपस्थित आहेत. यावेळी लाडकी बहिण योजना नको तर सुरक्षित बहिण योजना आणा, असं आंदोलक म्हणत आहेत.
कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच्या मूक निदर्शनाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये महाविकास आघाडीकडून मूकनिदर्शने सुरु आहेत. काँग्रेस नेते सतेज पाटील आंदोलन स्थळी पोहोचले आहेत. आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर उपस्थित आहेत.
बदलापूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून राज्यभर आंदोलन केलं जात आहे. मुंबईतील दादर भागातील शिवसेना भवनसमोर ठाकरे गटाचे नेते- कार्यकर्ते जमलेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे.
पुण्यात आज महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप आंदोलन करणार आहे. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजप देणार आंदोलनातूनच उत्तर देणार आहे. महाविकास आघाडीच्या मुक आंदोलनाच्या विरोधात भाजप करणार निषेध आंदोलन करणार आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात भाजपकडून महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध मूक आंदोलन केलं. आता थोड्याच वेळात भाजपच्या आंदोलनाला सुरुवात होत आहे
महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर निदर्शने करण्यात येत आहेत. सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ही निदर्शने करण्यात येत आहे. माकप, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने ही निदर्शने करण्यात येत आहेत. महाराष्ट्र बंदची परवानगी हायकोर्टाने नाकारल्यानंतर तोंडाला काळी पट्टी बांधत निदर्शने करण्यात येत आहे.
बदलापूरसह राज्यातील महिला आणि मुलीवर अत्याचाराबाबत मविआने आक्रमक भूमिका घेतली आहे. अमरावतीच्या राजकमल चौकात काळ्या पट्ट्या बांधून निषेध निदर्शने करण्यात आली. खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह मविआचे नेते आंदोलनाला उपस्थित आहेत. राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने सुरु आहेत.
महाविकास आघाडीच्या दुटप्पीपणाला उत्तर म्हणून आमदार प्रसाद लाड हे सायन सर्कल येथील भाजपा कार्यालयाच्या समोर निषेध आंदोलन करणार आहेत.
महिला अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भूमिका उघड करण्यासाठी आणि बदलापूर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने आज (24 ऑगस्ट) ११ ते १२ दरम्यान धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
यवतमाळ – विरोधक बदलापूर घटनेवरून राजकारण करत आहे, विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठले आहे अशी टीका उदय सामंत यांनी केली.
न्यायालयाने विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवले आहेते. न्यायालयाने विरोधकांना चपराक दिली आहे, असेही ते म्हणाले.
बदलापूरमधील शाळेतील मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी राज्यभरात मविआचे आंदोलन सुरू असून पुण्यात शरद पवार या मोर्चात सहभागी झाले आहेत. तोंडाला बांधला काळा मास्क
बदलापूरमधील शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मविआकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, तसेच सुप्रिया सुळे हे पुण्यातील आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत. तोंडावर काळा मास्क लावून तसेच काळ्या फिती बांधून केला निषेध. पुणे स्टेशन परिसरात सुरू आहे आंदोलन.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि ओबीसी आरक्षण सुनावणी पुन्हा लांबणीवर. येत्या 15 ऑक्टोबरला होणार सुनावणी.
विधानसभा निवडणुकांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता मावळली.
कोर्टाचे आदेश मानणे ही आमची परंपरा आहे. आम्ही कोर्टाचा सन्मान करतो. पण तरीही आम्ही महाविकासआघाडीचे सर्वच नेते आंदोलन करणार आहे. यावेळी आम्ही तोंडावर काळी पट्टी बांधून आंदोलन करणार आहोत. आमचा आवाज कोणीही दाबू शकत नाही, संजय राऊतांची टीका
बदलापूरमधील त्या शाळेतील उच्च माध्यमिक वर्ग सुरू
बदलापूरच्या अत्याचार प्रकरणात शाळा होती बंद
आजपासून पाचवी ते बारावी वर्ग भरण्यास सुरुवात
वीस ते पंचवीस टक्के विद्यार्थ्यांनी लावली शाळेत हजेरी
पुढील शाळेबाबत लवकरच होणार निर्णय
– नाशिकमध्ये मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
– नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात मराठा आंदोलन विरोधात गुन्हा दाखल
– मराठा आंदोलकांनी कुठलीही परवानगी नसता बेकायदेशीररित्या जमाव जमवून आरक्षणाचा मुद्द्यावर घोषणाबाजी करून तणाव निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल
– विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनांचा ताफा अडवून पूर्वपरवानगी न घेता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर घोषणाबाजी आणि तणाव निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा
राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शांततापूर्वक आंदोलन
मुंबईच्या शिवसेना भवन परिसरात ठाकरे गटाकडून आंदोलन
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: आंदोलनात सहभागी होणार
उद्धव ठाकरे काळी रिबीन बांधून या घटनेचा आणि सरकारचा निषेध करणार
शिवसेना भवन परिसरात काळ्या रंगाचा स्टेज बांधण्यात आला आहे.
शिवसेना भवनाबाहेर मोठी बॅनरबाजीही करण्यात आली आहे.
– पुण्यात आज महाविकास आघाडीचे मूक आंदोलन
– आंदोलनात शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सहभागी होणार
– तोंडावर काळी पट्टी आणि हातात काळा झेंडा घेऊन मूक आंदोलन करणार
– पुणे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बसून आंदोलन करणार
– सकाळी 10 ते 11 एक तास आंदोलन केले जाणार
– आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पुणे पोलिसांचा बंदोबस्त
आज पुण्यात शरद पवार आज मूक आंदोलनात होणार सहभागी
आज महाविकासआघाडीने बंद पुकारला होता, मात्र कोर्टाच्या निर्देशानुसार तो बंद मागे घेण्यात आला
पुण्यातील पुणे स्टेशनजवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मूक आंदोलन करण्यात येणार आहे
स्वतः शरद पवार एक तास यात सहभागी होणार आहेत