
Maharashtra News Live Update : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. या घटनेनंतर राजकारणात खळबळ उडाली. सध्या याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. तसेच पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून विविध खुलासे समोर येत आहेत. तर दुसरीकडे आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आजच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
समाजवादी पक्ष महाराष्ट्रात राजकीय मैदान तयार करणार आहे. मुस्लिमबहुल मालेगावमध्ये एका जाहीर कार्यक्रमात अखिलेश यादव सहभागी होणार आहेत. 18 आणि 19 ऑक्टोबरला ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. 19 तारखेला धुळ्यातील राजकीय कार्यक्रमातही ते सहभागी होणार आहेत.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने झेड श्रेणीची सुरक्षा दिली आहे.
हरियाणातील भाजप नेते कृष्णलाल पनवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. पनवार यांनी दिल्लीत उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. कृष्णलाल पनवार यांचा राजीनामा उपराष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. कृष्णलाल पनवार यांना 2020 मध्ये हरियाणामधून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते, परंतु आता विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून ते इसराना मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार बनले आहेत, त्यामुळे त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे.
दिल्लीचे मंत्री गोपाल राय म्हणाले, “आता तापमान झपाट्याने कमी होईल आणि जसजसे तापमान कमी होईल तसतसे वातावरणातील निलंबित कण कमी होतील. प्रदूषणाचे स्रोत कमी करणे हेच आमचे एकमेव शस्त्र आहे. आम्ही हवामान बदलू शकत नाही, परंतु आम्ही स्त्रोत मर्यादित करू शकतो. आजपासून 1 जानेवारीपर्यंत आम्ही फटाक्यांच्या उत्पादनावर, साठवणुकीवर आणि वितरणावर पूर्ण बंदी घातली आहे.
महायुतीने केलेले काम यामुळे महायुतीचे सरकार येणार. मुख्यमंत्री त्यांचा होणार नाही त्यामुळे त्यांचा चेहरा ते सांगू शकत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना थेट म्हटले की, राज ठाकरे यांनी लोकसभेच्या वेळी मोदींचा प्रचार केला.
हमीभाव केंद्रामुळे बार्शी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा. सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 ठिकाणी हमीभाव केंद्रांना मान्यता मिळाली असून यापैकी पहिल्या केंद्राचे आज बार्शीत उद्घाटन झाले.
स्कूल बस टोलमुक्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे…
मुलुंड एल बी एस टोल नाका या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून जल्लोष करण्यात येत आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी जल्लोषमध्ये सामील
कालच्या ‘ राडा ‘ च्या पार्श्भूमीवर देणार शिवसृष्टीला भेट. दुपारी 4 वाजेपर्यंत मंत्री छगन भुजबळ येणार येवल्यात. काल मनोज जरांगे पाटील येवला दौऱ्यात झाला होता राडा. मराठा आंदोलक व भुजबळ समर्थक आले होते सामोरा समोर. कालच्या राड्यानंतर भुजबळांच्या दौऱ्याला महत्व.. भुजबळ काय बोलतात याकडे लागले लक्ष..
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर विधानसभा निवडणूक लढविणार आहे. अहिल्यानगरच्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातून ते उभे राहणार आहेत.
कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये पुण्याच्या राऊत बहीण भावाने सुवर्णपदक पटकावले. कादंबरी राऊत हिने स्कॉट या प्रकारात तसेच चिंतामणी राऊत यानेही सुवर्णपदक पटकावले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांसोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांची बैठक झाली. ही बैठक तीन तास चालली. त्यात निवडणुकी रणनीती आणि जागा वाटप याबाबत चर्चा झाली.
गेल्या पाच वर्षांपासून यवतमाळकर प्रतीक्षेत असलेल्या बस स्थानकाचे बांधकाम पूर्ण झाले असून आज या बसस्थानकाचे ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण केले गेले.
नाशिकमध्ये महिलांनी पाण्यासाठी आंदोलन केले. मनपावर महिलांनी हंडा मोर्चा काढत आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने महिला आक्रमक झाल्या होत्या.
मुंबईच्या टोलनाक्या हलक्या वाहनांना टोल माफी करण्यात आलीय.हा राज्य मंत्रिमंडळाचा हा ऐतिहासिक निर्णय असून या निर्णयामुळे मुंबई एम एम आर रिजन मधील ठाणे ,पालघर अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. शिवसेनेने या निर्णयाचे पेढे वाटप करुन स्वागत केले.
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठक होणार आहे. बैठकीला राज्यातील भाजप कोअर कमिटीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, भूपेंद्र यादव, विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय होणार आहे.
मुलुंड- रात्री बारा वाजण्याची वाट न पाहता मनसेकडून आताच मुलुंड टोलनाक्यावरून लहान वाहनधारकांना टोलमुक्त करत सोडण्यात येत आहे. एकीकडे मनसे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट टोल नाक्यावर जल्लोष करत घोषणाबाजी करत आहे.
“टोलमाफीचा निर्णय निवडणुकीपुरता नाही तर कायमस्वरुपी असेल. टोलमाफीमुळे ट्रॅफिकची समस्या दूर होणार आहे. हा निर्णय ऐतिहासिक असून सरकारचा हा मास्टरस्ट्रोक आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“टोल माफ करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून जनतेकडून मागणी होत आहे. मी आमदार असताना टोलमाफीसाठी आंदोलन केलं होतं. या निर्णयामुळे कारने प्रवास करणाऱ्या लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत वाढणारी थंडी आणि प्रदूषण लक्षात घेता दिल्ली सरकारकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. फटाक्यांचं उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर दिल्ली सरकारने बंदी आणली आहे. येत्या दिवाळीतही फटाक्यांवर बंदी कायम राहणार आहे. थंडी सुरु होण्यापूर्वीच राजधानी दिल्लीतल्या काही भागातील एअर क्वालिटी इंडेक्स 300 पर्यंत पोहोचला आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात येणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील या निर्णयानंतर नवी मुंबईत मनसेनं वाशी टोल नाक्यावर पेढे वाटून जल्लोष केला आहे.
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा आरोप असलेल्या दोघांना 9 ऑक्टोबर रोजी विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर हिंदुत्ववादी गटांनी त्यांचे भव्य स्वागत केले. परशुराम वाघमोरे आणि मनोहर यादव, ज्यांनी सहा वर्षे तुरुंगात घालवले होते, त्यांना 9 ऑक्टोबर रोजी बेंगळुरू सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आणि 11 ऑक्टोबर रोजी औपचारिकपणे परप्पाना अग्रहारा तुरुंगातून मुक्त केले.
नाशिकमधील सिडको परिसरात महिलांचं पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे. नाशिक पालिकेवर महिलांनी हंडा मोर्चा काढला आहे. पाण्याचा प्रश्न भीषण झाल्याने महिला आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहे.
मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात येणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत सर्व नागरिकांचे तसेच मनसे सैनिकांचेही अभिनंदन केलं आहे.
टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला… आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही, असं राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा खूप खूप अभिनंदन.
टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल…
— Raj Thackeray (@RajThackeray) October 14, 2024
धारावी पुनर्विकासासाठी कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय, मुंबईतील आणखी 125 एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवनार डंम्पिंग ग्राऊंडची जागा देण्यात येणार आहे.
परतीच्या पावसाने संपूर्ण धुळे जिल्ह्याला जोडपून काढले आहे .साखरी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरणात पाण्याचा वेग वाढल्याने धरणातून 35000 क्यूसेस पाणी पांझरा नदी पात्रात सोडण्यात आलं आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.
रोज साडेतीन लाख वाहने ये जा करतात. हलक्या वाहनांना टोलमाफी व्हावी अशी मागणी होती. जड वाहने सोडून आज रात्री 12पासून टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. 45 व 75 रूपये टोल होता. 2026 पर्यंत टोलची मुदत होती. 2 लाख 80हजार वाहनांना फायदा होईल. आर्थिक भाराची प्रतिपूर्ती सरकारकडून केली जाईल, असे शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं.
राजधानी दिल्लीमध्ये वक्फ विधेयकावरील संसदेच्या संयुक्त समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीसाठी अरविंद सावंत, नरेश म्हस्के, सुरेश म्हात्रे, मेधा कुलकर्णी उपस्थित आहेत. संयुक्त समिती आज विविध धर्मसंस्थांची मते जाणून घेणार आहे.
धुळे- साखरी तालुक्यात झालेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरणातून 35 हजार क्यूसेस पाणी पांजरा नदीच्या पात्रात सोडण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून साखरी तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने अक्कलपाडा धरणात पाण्याचा वेग वाढला आहे. काल रात्रीपासून पांजरा नदी पात्रात टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येत आहे. आज सकाळी 35 हजार क्यूसेस पाणी सोडल्याने पांजरा नदीला पूर आला आहे. पांजरा नदीकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाशी, दहिसर, मुलुंड, आनंदनगर, ऐरोली टोल नाक्यावर टोलमाफी… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा… हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी… मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी…
तडीपार गुन्हेगारांनी परिसरात हैदोस घालत केली गाडीची तोडफोड… तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा केला प्रयत्न… दहशत निर्माण करण्याची घटना cctv कॅमेरात कैद… नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात संदीप दोंदे आणि तडीपार गुन्हेगार सिद्धार्थ दोंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक… राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणार बैठक… आतापर्यंत बैठकीसाठी नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण रमेश चेनीथला दाखल…
19 ऑक्टोबरला अखिलेश महाराष्ट्र दौऱ्यावर… विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत… मुस्लिम बहुल मालेगाव विधानसभा मतदारसंघात अखिलेश यांचा कार्यक्रम… सध्या समाजवादी पक्षाचे दोन आमदार… महाराष्ट्रात जवळपास 18 जागांवर समाजवादी पक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता…
महाराष्ट्र कौशल्य विकास युनिव्हर्सिटीला रतन टाटांचं नाव… राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, मंत्री लोढांची माहिती…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे. बैठकीसाठी काँग्रेसचे नेते दिल्लीत दाखल झालेत. राज्यातील काँग्रेसचे प्रमुख 6 नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. हरियाणा राज्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्राचा देखील आढावा घेणार आहेत. विधानसभेच्या जागावाटप बाबत देखील बैठकीत चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याने त्यावर आज चर्चा होणार आहे. सोबतच निवडणुकीच्या प्रचार रणनिती बाबत देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये वादाची चिन्हे निर्माण झाली आहेत. अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांना भाजपच्या शिवाजी पाटील यांनी आव्हान दिलं आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शिवाजी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावरून हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असताना आणि अजित दादांनी उमेदवारी जाहीर केलेली असताना प्रमोद सावंत यांनी परस्पर उमेदवारी जाहीर करणे बरोबर नाही. अजित दादा आणि भाजपचे वरिष्ठ याची योग्य ती दखल घेतील, असं हसन मुश्रीफ म्हणालेत.
समाजाचे पक्षाचे नेते अखिलेश यादव महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. 19 ऑक्टोबरला अखिलेश महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मुस्लिम बहुल मालेगाव विधानसभा मतदारसंघात अखिलेश यांचा कार्यक्रम असणार आहे. सध्या समाजवादी पक्षाचे दोन आमदार आहेत. महाराष्ट्रात जवळपास 18 जागांवर समाजवादी पक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते शशिकांत कांबळे यांची प्रदेश चिटणीसपदी निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते शशिकांत कांबळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. शशिकांत कांबळे हे छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असून समता परिषदेचे शहराध्यक्ष आहेत. पक्ष स्थापनेपासून ते राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आणि पदाधिकारी राहिले आहेत. पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिल्याबद्दल पक्षाचे त्यांनी आभार मानले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून कर्जत मतदारसंघात पाण्याची समस्या भेडसावत होती, या गोष्टीची दखल घेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी ५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन कर्जतमध्ये नळ जोडणी योजनेचे भूमीपूजन केले. त्यामुळे आता कर्जतकारांची पाण्याची समस्या कायमची दूर होणार असून येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे आज भूमिपूजन केले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सोहळा पार पडेल. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्याबरोबरच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित असणार आहे. 8 ऑगस्ट रोजी अचानक लागलेल्या आगीत केशवराव भोसले नाट्यगृह भस्मसात झाले होते. पुढच्या दीड वर्षांमध्ये हे नाट्यगृह पुन्हा सेवेत आणण्याचा प्रयत्न असणार आहे. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारकडून 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. यावेळी येत्या विधानसभा निवडणुकांबद्दल घोषणा केली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.