
जळगावच्या सराफ बाजारामध्ये चांदीच्या आणि सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाल्याचे दिसते. सोन्याचे भाव 500 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 86 हजार 430 रुपयांवर पोहोचले आहे.
२००५ पासून मी राजकारणात काम करत आहे आज-काल आलेले आयरे गयरे नार नटरंगी कोणी येऊन सल्ले देऊन जाणार अशा लोकांना सोशल मीडियाच्याच माध्यमातून उत्तर देणं गरजेचं असतं. नटरंगी नार म्हणत रूपाली ठोंबरे पाटील यांचा रूपाली चाकणकर यांना टोला लगावला. रूपाली ठोंबरे पाटलाचा अनुभव किती प्रदीर्घ आहे हीच आठवण करून दिली. नवीन आलेल्या नाकाने कांदा सोलणाऱ्यांनी लक्षात घ्यावं. त्याच्यासाठीच ही पोस्ट होती, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्ट केले.
उमरगा तालुक्यातील मुंबई हैदराबाद महामार्गावरील कोरेगाव पुलाचे काम करण्याच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी पाण्यात बसून आंदोलन सुरू केले. गेली आठ महिन्यापासून फुलाच्या खाली पाणी साठुन राहत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याचे ते म्हणाले. जोपर्यंत महामार्ग अधिकाऱ्याकडून काम सुरु करण्यात येणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आमदार प्रवीण स्वामी यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फुले व पुष्प अर्पण केले, तर या ठिकाणी एका सामाजिक संस्थेच्या वतीने फुले वाहन्या ऐवजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्यांकडून एक पेन व एक वही घेऊन, या वह्या आणि पेन देण्याचा उपक्रम राबविला, या वह्या आणि पेन जिजाऊ जयंती सावित्रीबाई फुले जयंती छत्रपती शाहू महाराज जयंती या दिवशी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत.
मत चोरी ही देशातील सर्वात मोठी चोरीची घटना आहे. लोकशाहीत सर्वात मोठा अधिकार मतदानाचा आहे,आणि तोच चोरी होत असेल तर आवाज उठवावा लागेल. कुणीही आवाज उठवला तर त्यामागे सहभागी होणे गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणाले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 वा महापरिनिर्वाण दिन आहे या दिनानिमित्त संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार परिसरामध्ये त्यांच्या विचारांच्या साहित्याचं वाटप आणि विक्री केली जाते..डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे साहित्य महाराष्ट्र राज्य मुद्रांक आणि प्रकाशन विभागाकडून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे दहा टक्के कमी दरामध्ये याची विक्री सध्या सुरू आहे आणि याला विकत घेण्यासाठी बरेचशे अनुयायी पोहचत आहेत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत असे शरद पवार यांनी जाहीर केल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली. त्यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना फोनवरून ही माहिती कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती जगताप यांनी दिली.
मला लाज वाटते की सरकारने झाडांवर फुल्या मारल्या आहेत. मुख्यमंत्री यांनी जसे पार्थ पवारांना माफ केले तसे या झाडांना माफ करावे… मनसे या एकही झाडाला हात लावू देणार नाही… गिरीश महाजन यांच्यावर आमचा विश्वास नाही… कालही ते खोटे बोलले की हैदराबादला गेलो होतो वगैरे… खासगी बिल्डरच्या घशात देण्याचा हा घाट आहे… असं वक्तव्य अमेय खोपकर यांनी केलं आहे.
आज सहा डिसेंबर आणि या; दिवशी आयोध्ये मधील वादग्रस्त ( बाबरी ढाचा )पाडला होता आणि त्या निमित्ताने भाजपाच्या वतीने आज शौर्य दिवस साजरा करण्यात येत आहे. भाजपच्या वतीने औरंगपुरातील दक्षिणमुखी महादेव मंदिरात आरती करण्यात येत आहे. यावेळी मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे या आरतीला उपस्थित आहेत.
समृध्दी महामार्गावरील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक कामबंद आंदोलन सुरू केल्याने महामार्गावर टोल वसुली बंद झाली आहे. मुंबईहून सुरू होणाऱ्या मार्गाचा प्रथम व नागपूरहून येणाऱ्या मार्गाचा शेवटचा टोल असलेला निंबवली पथकर टोल नाका आहे. येथेही एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने टोल पूर्णपणे खुला झाला आहे. कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा पगारवाढीची मागणी लेखी स्वरूपात केल्याचे सांगितले असून, व्यवस्थापनाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज सकाळी ८ वाजेपासून अचानक कामबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांना आज टोलमुक्त प्रवासाचा लाभ मिळत आहे.
अमरावती : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने बाईक व कार अभिवादन रॅलीचं आयोजन करण्यात आलं. अभिवादन रॅलीत काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक काँग्रेसने नेत्या यशोमती ठाकूर सहभागी होत्या… महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना आज अभिवादन केले जाणार आहे.
साधू ग्राम परिसरातील केर कचरा उचलण्यास सुरुवात. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर राडा रोडा उचलण्यास सुरुवात
नागरिकांच्या तक्रारी नंतर महापालिकेला आली जाग
3 जानेवारी पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने शाकंभरी महोत्सव होणार साजरा. यावर्षी शाकंभरी महोत्सवात तुळजापूर शहरातील कागदे कुटुंबाला मिळाला यजमान पदाचा मान. उल्हास कागदे आणि वैशाली कागदे यांना मिळाला शाकंभरी नवरात्र महोत्सवात यजमान पदाचा मान. शारदीय नवरात्री महोत्सवा नंतर शाकंभरी वर्षभरातील सर्वात मोठा महोत्सव
मीरा-भाईंदरमध्ये आज सकाळी 8.40 वाजता एमबीएमसीच्या 12 नंबर बसमध्ये प्रवाशांचा जीव थरकाप उडवणारी घटना घडली आहे. बसच्या फायरच्या बाटलीवर एका प्रवाशाचा पाय नकळत नोकवर पडला आणि बाटली सील नसल्याने प्रेशर तयार होऊन अचानक धूर बाहेर आला. क्षणात बसमध्ये घनदाट धूर पसरल्याने प्रवाशांची एकच धावपळ झाली. धक्कादायक म्हणजे ही फायर बाटली डेपोतून सुटण्यापूर्वी चेकच का झाली नाही, यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
संदीप गायकवाड असं अटक केलेल्या आरोपीचे नाव. काल रात्री जामखेड पोलिसांनी केलं संदीप गायकवाड याला अटक. दीपाली पाटील हिला संदीप गायकवाड हा लग्नाचा तगादा लावत असल्यानेच तिने आत्महत्या केल्याचा तिच्या नातेवाईकांचा आरोप आहे…
इंडिगोच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी नुकताच मोठे विधान केले. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, सरकारने इंडिगोवार कारवाई केलीच पाहिजे. इंडिगोला नक्की काय झालं हे कळत नाहीये.
जामखेड – अहिल्यानगरच्या जामखेड नृत्यांगना दिपाली पाटील आत्महत्येने मोठी खळबळ माजली असून याप्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. काल रात्री जामखेड पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली.
धाराशिव जिल्ह्यातील आधारभूत किंमत हमीभाव केंद्रे बारदाना नसल्याने गेल्या पाच दिवसापासून बंद आहेत. जिल्ह्यात नाफेड आणि पणन मंडळाकडून 51 सोयाबीन हमीभाव केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. पण 2 डिसेंबर पासून बारदान नसल्याने ही हमीभाव केंद्र ओस पडली आहेत. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव मिळावा या उद्देशाने सुरू केलेले हमीभाव केंद्रे बारदान अभावी बंद आहेत. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय .
इंडिगो एअरलाइन्स विमान रद्द प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणीची मागणी करण्यात आली आहे. अडचणीच्या परिस्थिती सरकारकडे कोणते पर्याय आहेत, अशी विचारणा या याचिकेतून करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाकडून समन्स बाजवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात अवैध वाळू वाहतूक प्रकरणी न्यायालयातून सुटलेली 2 वाहने तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात महसूल विभागाने ताब्यात घेत पुन्हा जप्त केली. वाळू माफियांवर मागच्या काही दिवसापासून कडक कारवाई केली जात आहे. 30 लाखांचा थकीत असलेला दंड न भरल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाज जागृत केला, समाजातील विषमता दूर केली, सर्वांना संधीची समानत दिला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. पुण्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याचा रस्त्यावर वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. भक्ष्याच्या शोधात बिबटे लोकवस्तीत येत आहेत त्यामुळे बिबट्याचा मुक्तसंचार दिसत असून नागरिक दहशतीखाली आहेत. जालना जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून तापमानात घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. दोन दिवसांपासून जालना शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिकच वाढल्यामुळे ग्रामीण भागात जागोजागी शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.