Maharashtra News Live : महापालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता-रवींद्र चव्हाण

देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra News Live : महापालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता-रवींद्र चव्हाण
| Updated on: Dec 12, 2025 | 11:24 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 12 Dec 2025 11:24 AM (IST)

    महाजनांना सत्तेचा माज, तुम्ही काय होता आणि आज काय झालात – सचिन अहिर

    मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी महाजन ठाकरेंवर बोलतात… असं वक्तव्य सचिन अहिर यांनी केलं आहे. एवढंच नाही तर, महाजनांना सत्तेचा माज, तुम्ही काय होता आणि आज काय झालात… असं देखील अहिर म्हणाले.

  • 12 Dec 2025 11:20 AM (IST)

    शिर्डी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार…

    शिर्डी – साकुरी शिवेवर बिबट्याचा मुक्त संचार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  मानवी वस्तीजवळ बिबट्याच्या मुक्त संचाराने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे…

  • 12 Dec 2025 11:10 AM (IST)

    ठाणे शहरात आणखी चार दिवस 50 टक्के पाणी कपात

    नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे ठाणे महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. पाणी कपातीवरून सत्ताधारी मधील भाजप पक्षाने कळवा शहर येथे आंदोलन केले होते, तर ठाकरे गट, मनसे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विरोधकांनी देखील ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या ठिकाणी आंदोलन केले होते.

  • 12 Dec 2025 10:55 AM (IST)

    ठाणे शहरात आणखी चार दिवस 50 टक्के पाणी कपात

    ठाणे शहरात आणखी चार दिवस 50 टक्के पाणी कपात होणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन ठाणे महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

    पाणी कपातीवरून सत्ताधारी मधील भाजप पक्षाने कळवा शहर येथे आंदोलन केलं होतं. तर ठाकरे गट ,मनसे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विरोधकांनी देखील ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं.

  • 12 Dec 2025 10:31 AM (IST)

    शिर्डी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये दहशत

    राज्यात विविध भागात बिबट्याच्या संचारामुळे दहशतीचं वातावरण असतानाच आता  शिर्डी – साकुरी शिवेवर बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालं.  मानवी वस्तीजवळ बिबट्या दिसल्याने नागरिक मात्र चांगलेच घाबरले आहेत.  वन विभागाने लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

  • 12 Dec 2025 10:12 AM (IST)

    पंढरपुरात ऊस दराचं आंदोलन पेटलं, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

    पंढरपुरात ऊस दर आंदोलन पेटलं असून आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी 4 ट्रॅक्टरचे एकूण 32 टायर फोड. त्यामुळे  ऊस वाहतूक ठेकेदारांचे लाखो रूपयांचे नुकसान झालं आहे.  वाखरी येथे रात्री शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टायर फोडून ऊस वाहतूक रोखली. गेल्या 5 दिवसांपासून पंढरपुरात ऊस आंदोलन सुरू आहे.

  • 12 Dec 2025 10:05 AM (IST)

    पुणे विमानतळावर महिलेकडून 72 लाखांचा गांजा जप्त

    पुणे विमानतळावर महिलेकडून 72 लाख रुपयांचा गांजा जप्त, बँकॉक ते पुणे या विमानाने  आलेल्या महिलेने चिप्सच्या डब्यात 722 ग्रॅम गांजा लपवला होता. अखेर पुणे विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने कारवाई करून त्या महिलेला अटक केली आणि लाखोंचा गांजा जप्त केला.

     

  • 12 Dec 2025 09:50 AM (IST)

    सांताक्रूझ वेधशाळेमध्ये 14.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

    मुंबई सर्वात नीचांकी थंडी.थंडीने मुंबई गारठली.  यंदाचे सर्वात नीचांकी तापमान नोंदवले गेले. झपाट्याने थंडीमध्ये वाढ झालीये.

  • 12 Dec 2025 09:40 AM (IST)

    सोलापूरच्या पाणी प्रश्नावर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत बैठक

    बैठकीत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना घेतले फैलावर. सोलापूरकरांना रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत होणारा पाणीपुरवठा बंद होणार. अण्णा बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना याबाबत कडक शब्दात सुनावले. पाणी पुरवठ्याची 882 कोटी रुपयांची योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करण्याचे अण्णा बनसोडे यांचे आश्वासन

  • 12 Dec 2025 09:30 AM (IST)

    बिबट्याने पुन्हा एकदा आक्षी साखरी येथे दोघांवर हल्ला

    रायगडच्या अलिबाग नागाव पारोडा येथे दोन दिवसांपूर्वी सहा जणांवर हल्ला करून पसर झालेला बिबट्या आज सकाळी नागाव पासून काही अंतरावर आक्षी साखरी येथे. शुक्रवारी सकाळी प्रातःविधीसाठी गेलेल्या दोघांवर हल्ला केल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल आतापर्यंत या बिबट्याने आठ जणांना जखमी केले आहे.

  • 12 Dec 2025 09:20 AM (IST)

    माढ्याच्या टेभुर्णी मधील वाळू माफियांकडून वकिलाला मारहाण प्रकरण

    बेकायदा वाळू उपशाची माहिती अधिकार्याना का दिली -या कारणावरुन 7 ते 8 वाळू माफियांनी अॅड पाडुरंग तळेकर या वकिलावर जिव घेणा हल्ला मारहाण प्रकरणी सोना पराडे सह एकूण 8 वाळू माफियांवर टेभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल झालाय-

  • 12 Dec 2025 09:20 AM (IST)

    भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू असताना 6 जणांकडून तक्रारदारावर हल्ला

    भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू असताना 6 जणांकडून तक्रारदारावर हल्ला

    बीडच्या केज तालुक्यातील सुकळी गावातील अमर गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी सुरू असताना सरपंच नितीन गायकवाड आणि त्याचे सहकारी अक्षय गायकवाड, प्रदीप भिसे, अनिकेत गायकवाड, ज्ञानेश्वर गव्हाणे आणि रविराज खाडे यांनी अश्लील शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण केली.

  • 12 Dec 2025 09:10 AM (IST)

    मुंबईतील ‘या’ भागांमध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद

    महानगरपालिकेतर्फे अंधेरी पूर्व (के पूर्व), सांताक्रूझ (एच पूर्व) आणि दादर, प्रभादेवी (जी उत्तर) विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिन्यांच्या जोडणीची कामे सुरू. या कामासाठी आज, १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १३ डिसेंबर रोजी सकाळी ९ या चोवीस तासांच्या कालावधीत के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला

  • 12 Dec 2025 09:00 AM (IST)

    पुणे विमानतळ परिसरात वावरणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद

    एप्रिल महिन्यापासून पासून पुणे विमानतळ परिसरात अधूनमधून दिसणारा एक प्रौढ नर बिबट्या पुणे वनविभागाच्या नेतृत्वाखाली, RESQ Charitable Trust, Indian Air Force आणि Pune Airport Authorities यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे सुरक्षितरीत्या बेशुद्ध करून पकडण्यात आला.या बिबट्याने विमानतळ परिसरातील भूमिगत बोगदे, दाट झुडपे आणि कमी मानवी हालचाली असलेल्या भागांचा वापर करून आत-बाहेर हालचाल चालू ठेवली होती.विमानतळाचा विस्तृत आणि संवेदनशील परिसर लक्षात घेता, त्याला पकडण्याच्या प्रयत्नांना अनेक गंभीर तांत्रिक आणि सुरक्षा विषयक अडचणींचा सामना करावा लागला

  • 12 Dec 2025 08:50 AM (IST)

    मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात केवळ ९८ कुणबी प्रमाणपत्र

    मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर २ सप्टेंबर रोजी निघालेल्या हैदराबाद गॅझेटियर जीआरनुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात साडेतीन महिन्यांमध्ये मराठा समाजाला केवळ ९८ कुणबी ओबीसी प्रमाणपत्रे मिळाली आहेत. त्यासाठी केवळ ५९४ जणांनी अर्ज केले होते. ९८ अर्ज मंजूर केल्यानंतर प्रमाणपत्र वाटपाची कार्यवाही करण्यात आलीय. त्यात सर्वाधिक ४४५ अर्ज ही एकट्या परभणी जिल्ह्यातील आहेत. परभणी जिल्ह्यात त्यापैकी ४७ कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. उर्वरित अर्जाची चौकशी सुरु असल्याचं सांगितलं जातंय.

  • 12 Dec 2025 08:40 AM (IST)

    भटक्या कुत्र्यांची अंबरनाथमध्ये दहशत, आठ जणांना घेतला चावा

    अंबरनाथ मध्ये एका दिवसात भटक्या श्वानांने आठ नागरिकांना चावा घेतला. अंबरनाथ पश्चिमेतील बालाजी नगर परिसरात ही घटना घडली. शहरातील भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव चिंताजनक ठरत आहे.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यात काही शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. श्वानांचा निर्बीजीकरण आणि नियमित लसीकरणाची नागरिकांकडून केली जात आहे. श्वान निर्बीजीकरण केंद्र काही दिवस बंद असल्याने अंबरनाथमध्ये ही प्रक्रिया ठप्प झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा कामाला सुरुवात झाली असून, शहरातील निर्बीजीकरण आणि लसीकरण सुरू करण्याची तयारी नगरपालिका करत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  • 12 Dec 2025 08:30 AM (IST)

    कल्याण डोंबिवलीत युती होण्यापूर्वी शिवसेना–भाजप आमनेसामने

    युती होण्यापूर्वीच जागावाटपा वरून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे-भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यात जुंपली आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये युतीत लढणार असल्याचे संकेत शिवसेना भाजप कडून देण्यात येत असतानाच आता …कल्याणमध्ये मात्र दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते आमने-सामने आले आहेत.

  • 12 Dec 2025 08:20 AM (IST)

    वृक्षतोडीवर महापालिकेचे अधिकृत स्पष्टीकरण

    नाशिक शहरात तब्बल 1 हजार 270 झाडांवर कुऱ्हाड पडल्याचे महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या 4 नव्या मलनिस्सारण केंद्रांना झाडं अडथळा ठरत असल्याचे पालिकेने म्हणणं मांडलं. तोडण्यात येणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात नव्याने 17 हजार 680 वृक्षांची लागवड फाशीचा डोंगर परिसरात करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

  • 12 Dec 2025 08:10 AM (IST)

    जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर

    राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले. त्यामुळे निवडणुकीतील गोंधळ अजूनही निस्तारलेले नसल्याचे दिसून येते. अगोदर महापालिका निवडणुका होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मनपा निवडणूक या जानेवारी महिन्यात होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

  • 12 Dec 2025 08:01 AM (IST)

    भाजपमधील इच्छुकांच्या आजपासून मुलाखती

    महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपतर्फे सुमारे २ हजार ३५० कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे. इच्छुक उमेदवारांची छाननी करण्यासाठी भाजपच्या शहर कार्यालयात शनिवारी आणि रविवारी कोअर कमिटीतर्फे मुलाखती घेतल्या जाणार आहे. यानिमित्ताने एकाच प्रभागातील अनेक स्पर्धक एकमेकांच्या पुढे येणार आहे. पुणे महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील राजकीय पक्षांमधील घडामोडींना वेग आला आहे.

राज्यातील मुंबईसह प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता आहे. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका उशीरा होण्याची शक्यता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. नुकतीच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. दादर येथील शिवसेना भवनासमोर भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेनेत बॅनर वॉर रंगले आहे. आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. तर निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. राज्यात पारा घसरला असून अनेक शहरं आणि गावं गारठली आहेत. तर महान फुटबॉलपटू लिओनल मेस्सी उद्यापासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचा.