
महानगर गॅसच्या (MGL) पाइपलाइनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सलग दुसऱ्या दिवशीही महामुंबईतील सीएनजीची (CNG) टंचाई कायम आहे. ऑनलाइन सीएनजी मिळत नसल्याने टॅक्सी चालक आणि खाजगी वाहनांनी माजगाव इथल्या ऑफलाइन सीएनजी पंपावर तुफान गर्दी केली आहे. माजगावच्या सीएनजी पंपावर रात्री 12 वाजल्यापासून खाजगी वाहने आणि टॅक्सींच्या दोन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळतंय. तर बिघाडामुळे आता टेम्पो सीएनजी सप्लायच्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने इंधन पुरवठा सुरू करण्यात आला आहे. टॅक्सी चालक इतर पंपांवर सीएनजी मिळत नसल्याने ऑफलाइन पुरवठा सुरू असलेल्या पंपांचा शोध घेऊन रांगा लावत आहेत. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
पुण्यात वाहन तोडफोडीच सत्र सुरूच आहे. पुण्यातील नऱ्हे गाव परिसरातील JSPM कॉलेज जवळ वाहनाची तोडफोड करण्यात आला आहे. याचा CCTV समोर आला आहे. दुचाकीवर येत तीन जणांकडून चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे. लोखंडी रॉड आणि दगडाने आरोपींकडून तोडफोड करण्यात आल्याचे CCTV मध्ये दिसत आहे.
उमरगा येथे अर्ज छाननी प्रक्रियेवर काँग्रेस आणि दोन्ही शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. गेल्या दीड तासापासून उमरगा येथे नगरपालिकेच्या उमेदवाराची अर्ज छाननी प्रक्रिया बंद आहेत. डमी उमेदवाराचा अर्ज बाद करण्याच्या प्रकरणावरून तिन्ही पक्षाने छाननी प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. कागदोपत्री सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर डमी उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतो, या निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रक्रिया पार पाडण्याची तिन्ही पक्षांनी मागणी केली आहे.
इगतपुरी नगरपालिकेच्या अर्ज छाननीत नगराध्यक्ष पदासाठी 6 पैकी 4 अर्ज वैध तर 2 अवैध ठरले आहेत. तर नगरसेवक पदासाठी 83 पैकी 77 अर्ज वैध तर 6 अवैध घोषित झाले आहे. सहा उमेदवारांचे अर्ज त्रुटींमुळे अवैध ठरले. काहींनी फॉर्म मिळणार नसल्याचा अंदाज होता, त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत, त्यामुळे राजकीय पेच वाढला आहे.
मुंबई मेट्रो-3 सुरू होऊन दीड महिना होत आला असला, तरी दिव्यांग प्रवाशांसाठी या मार्गिकेचं चित्र आजही बदललेलं नाही. अनेक स्टेशनवर लिफ्ट बंद असल्याने व्हीलचेअरवर असलेल्या दिव्यांगांना प्रवास करणे अक्षरशः अशक्य होत आहे. सुलभ प्रवासाच्या नावाखाली दिव्यांगांना रोजच त्रासाचा सामना करावा लागत आहे.
मोठी बातमी समोर आली आहे. भाजपमधील इनकमिंगवरुन शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला. शिंदेंचे मंत्री माजी नगरसेवकांच्या भाजप पक्षप्रवेशावरुन नाराज आहेत.
मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात पालिका निवडणुकीत भाजपने खातं उघडलं आहे. दोंडाईचा पालिकेत नगराध्यक्ष पदाचा पहिला निकाल भाजपाच्या बाजुने लागला आहे. दोंडाईचा नगरपालिका नगराध्यक्षपदी भाजपाच्या नयनकुवर रावल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने राज्यात भाजपाला पालिका निवडणुकीत यश मिळालं आहे.
दोंडाईचा येथे विरोधी उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यामुळे रावल यांची बिनविरोध निवड झाली आहे. 26 पैकी 7 नगरसेवकही बिनविरोध निवडले आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे.
धाराशिव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेक पोस्टवर तपासणी सुरू करण्यात आलीय. या तपासणीत 4 व्हीलरमध्ये पाच लाख रुपये आढळले. ही रक्कम धाराशिवमधील व्यावसायिकाचं असल्याचं स्पष्ट झालं आहे. निवडणूक पथकाने शहानिशा केली. त्यानंतर पथकाने व्यावसायिकाला 5 लाख रुपये परत केले.
सीएनजीची उपलब्धता नसल्याने मुंबईकरांना ऑटो रिक्षा मिळण्यास अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे मनसे विभागाध्यक्ष दिनेश साळवी यांनी कांदिवलीमध्ये मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी गैरसोय टळणार आहे. मनसेकडून ही बससेवा कांदिवली ते गणेश नगर, ऑस्कर हॉस्पिटल आणि हिंदुस्तान नाका इथपर्यंत उपलब्ध करण्यात आली आहे.
माजी नगरसेवक महेश पाटील यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यानंतर महेश पाटील यांनी शिवसेनेच्यानेत्यावर गंभीर आरोप केला आहे. भाजपमध्ये पक्षप्रवेश करायलाच ठरवलं नव्हतं. मात्र आमचीच लोक आमच्या विरोधकांना मोठं करतात. माझा विरोधक मोक्काचा आरोपी कुणाल पाटील याला वाचवण्याचा आणि क्लीनचीट देण्याचं काम पक्षातील लोक करतात. तसेच मला आणि माझ्या मुलाची हत्या करण्याच्या कट ज्यांनी रचला त्यांना अटक करू नका, यासाठी शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून दबाव टाकल्याचा गंभीर आरोप महेश पाटील यांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्यात सावदा, भुसावळ, आणि जामनेर भाजपचे तीन सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. भुसावळमध्ये भाजपच्या उमेदवार प्रीती मुकेश पाटील ,सावदा येथे रंजना भारंबे आणि जामनेरमध्ये उज्वला तायडे बिनविरोध विजयी झाले आहेत.
मीरा-भाईंदरमध्ये रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांची कानउघडणी केल्यानंतर आज मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी आयुक्तांना पत्र देत ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे.शहरातील रस्ते खोदकामामुळे अक्षरशः चाळण झाल्याने वाहतुकीची कोंडी आणि अपघातांची मालिका सुरू आहे.अनेक नागरिकांचा नाहक जीव जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
काही पदाधिकारी फोडून आपला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर आपला महापौर बसेल असे वाटत असेल तर आमदार म्हणून त्यांना सांगतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेची मोठी ताकद आणि कार्यकर्ते सक्षम आहे. महापौर महायुतीचा बसणार आहे त्यामुळे एक नंबर असलेल्या पक्षाने फोडाफोडीचे राजकारण करू नये असे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी म्हटले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेत प्रभाग 14 ‘अ’ मधून अपक्ष उमेदवार अशांतभाई वानखेडे यांची नगरपरिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. मलकापूर नगर परिषदेतील प्रभाग 14 ‘अ’ मध्ये अजून एका अपक्ष उमेदवाराने उमेदवार अर्ज दाखल केला होता. मात्र छाननीत त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने अशांतभाई वानखेडे हे प्रभाग 14 मध्ये बिनविरोध विजयी झाले आहेत..
अर्ज छाननीच्या दरम्यान परंडा येथे दोन गटात दगडफेक झाली. दोन्ही गट आमनेसामने नगरपालिकेमध्ये गोंधळ निर्माण झाला. परंडा नगरपालिकेमध्ये आमदार तानाजी सावंत यांचा गट आणि माजी आमदार राहुल मोटे यांचा गट आमने-सामने आला. शिवसेना गटाचे उमेदवार जाकीर सौदागर यांना तीन अपत्य असल्याने विरोधकांनी उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याने गोंधळ झाला. तानाजी सावंत गटाचे उमेदवार जाकीर सौदागर आणि आमदार राहुल मोटे गटाचे उमेदवार विश्वजीत पाटील यांच्या दोन गटांमध्ये गोंधळ झाला. अर्ज छाननी मध्ये ऑब्जेक्शन घेतल्यावर गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेस एसआयआर विरोधात एक मोठी रॅली काढणार आहे. ही रॅली दिल्लीच्या रामलीला मैदानावर होणार आहे. एसआयआरवरील काँग्रेसच्या बैठकीनंतर संघटनात्मक सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी याची घोषणा केली. राहुल गांधी आणि खरगे यांनी एसआयआर प्रभावित राज्यांमधील वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठकीलाही हजेरी लावली.
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील सह-आरोपी जसीर बिलाल वाणी याला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने 10 दिवसांच्या रिमांडवर पाठवले आहे.
भारतातील पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट 2027 मध्ये सुरू होईल. सुरुवातीला ती 100 किलोमीटर धावेल. हा प्रकल्प 2029 मध्ये पूर्ण होईल. ही बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई असा प्रवास अंदाजे दोन तासांत करेल.
पंढरपूरमधील आढीव येथे तीन दुकानांना मोठी आग लागली आहे. वेल्डिंग फॅब्रिकेशन,ऑटो गॅरेज, दूध डेरी, चहाचे कप बनवणरे दुकान,अशा चार दुकानांना मोठ्या प्रमाणात आग. शेजारी असलेल्या संभाजी ब्रिगेड वाचनालाच्या शेजारील तीन दुकानांपर्यंत आग पसरण्याची शक्यता आहे.
धाराशिव नगरपालिकेमध्ये दोन्हीही राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. महाविकास आघाडी मधून शरद पवार राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्यासाठी बाहेर पडली आहे तर दुसरीकडे महायुती मधील जागा वाटपातील वादामुळे अजित पवार राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या स्वतंत्र लढण्याच्या निर्णयामुळे धाराशिव नगरपालिकेमध्ये राजकीय वातावरण तापले असून चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्टार प्रचारक बैठकीला सुरुवात झाली आहे. बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, झीशान सिद्दीकी, आनंद परांजपे, रुपाली चाकणकर सह अजित पवार गटाचे प्रमुख नेते उपस्थित असल्याचे दिसत आहे.
धुळे जिल्ह्यातील 3 नगरपरिषद 1 नगरपंचायतसाठी नगराध्यक्षपदासाठी 37 उमेदवार रिंगणात उतरल्याचे दिसत आहे. तर नगरसेवक पदासाठी 593 अर्ज भरण्यात आले. छाननी प्रक्रियेत कुणाचे अर्ज बाद होतात याकडे जिल्ह्याचे लक्ष.
शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये गेलेल्या माजी नगरसेवक महेश पाटील यांचा शिवसेना शिंदे गटावर गंभीर आरोप. पक्षप्रवेश करायचं मी ठरवलं नव्हतं. मात्र आमचीच लोक आमच्या विरोधकांना मोठं करतात. माझा विरोधक मोक्काचा आरोपी कुणाल पाटील याला वाचवण्याचा आणि क्लीनचीट देण्याचं काम आमच्या पक्षातील लोकच सपोर्ट करतात. मला व माझ्या मुलाची हत्या करण्याच्या कट ज्यांनी रचला त्यांना अटक करू नका त्याचा दबाव देखील आमच्याच पक्षातील लोकांनी टाकला. आमच्या पक्षातील लोक त्यांना मदत करतात ही गोष्ट मला कळली तेव्हापासून दडपणा खाली काम करत होतो असा आरोप महेश पाटील यांनी केला.
ठाणे रेल्वे स्थानकच्या ठिकाणी असणाऱ्या रिक्षा स्टॅन्डवर रिक्षा चालक मनमानी करतात. प्रवाशांकडून अधिक भाडे वसूल करत असल्यामुळे समाज सेवक महेश मोरे आणि संगम डोंगरे यांनी अनधिकृत विना स्टँड वर उभे असणाऱ्या रिक्षां मधील टायर मधून हवा काढत मुजोर रिक्षा चालकाना धडा शिकवला आहे .
“अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. चौकशी समितीत 6 पैकी 5 सदस्य पुण्याचे आहेत. अशा समितीकडून चौकशी कशी होईल?. सिंचन घोटाळ्यावेळी अजित पवारांनी राजीनामा दिला होता. फडणवीस, मोदीही गैरव्यवहार रद्द करु शकत नाहीत” असं अंजली दमानिया म्हणाल्या.
“गैरव्यवहार रद्द करणारे अजित पवार कोण?. मी प्रत्येक विषयाची माहिती घेऊनच लढते. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अंजली दमानिया यांना गेटच्या आत सोडलं नाही. अधिकाऱ्यांचा माझ्याशी उद्धटपणे संवाद. प्रकरणाची माहिती घेऊन उद्या पत्रकार परिषद घेणार” असं अंजली दमानिया म्हणाल्या.
पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरण – मुंढव्यातील जमीनीची पाहणी करण्यास अंजली दमानिया दाखल झाल्या आहेत. मात्र त्यांना आतमध्ये सोडण्यास नकार देण्यात आला.
चिपळूण( खडपोली) – कामगारांना अचानक कमी केल्याने कामगार आक्रमक झाले आहेत. साफाईस्ट कंपनी विरोधात कामगारांचे आंदोलन चिघळले असून कंपनी बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
कामगारांना न्याय देण्यासाठी कंपनी गेट बाहेर कामगार कुटुंबिय महिलांनी ठिय्या दिला असून गेल्या 4 दिवसांपासून 25 कामगारांचे आमरण उपोषण सुरु आहे.
२५० कामगारांना अचानक काढल्याने कामगार आक्रमक झाले आहेत.
मालेगाव – डोंगराळ येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार व खून प्रकरणात आजही कुसुंबा महामार्ग रोखला. स्थानिक नागरिकांसह किन्नर लोकांनी रोखला महामार्ग. किरीट सोमय्या देखील रस्ता रोकोत सहभागी झाले . आरोपीला लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी केली जात आहे.
Bst आंदोलन प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालय सुनावणी. या सुनावणीसाठी राहुल नार्वेकर न्यायालयात दाखल झाले असून थोड्या वेळात सुनावणी होणार आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी शिवसेना (शिंदे गट) मंत्र्यांची आज सकाळी ११:३० वाजता प्री-कॅबिनेट बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय विषयांवर चर्चा अपेक्षित असली तरी, मुख्य लक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर असणार आहे. विशेषतः, अलीकडे महायुतीमधीलच मित्रपक्षांकडून होणारे पक्षीय प्रवेश आणि यामुळे निर्माण झालेल्या राजकीय कोंडीवर या बैठकीत सखोल मंथन होण्याची शक्यता आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भातील उद्याच्या न्यायालयीन निकालाबाबत धुळ्याचे याचिकाकर्ते ॲड. राहुल वाघ यांनी मोठी शक्यता व्यक्त केली आहे. राज्य सरकारने योग्य आकडेवारी सादर न केल्यास, न्यायालय ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश देऊ शकते, असे ते म्हणाले. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात असल्याच्या भूमिकेवर वाघ ठाम असून, या शक्यतेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका पार पाडल्या जाऊ शकतात या शक्यतेने आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर ‘घर वापसी’ चे बॅनर लावत भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. ठाकरे गटाचे नाशिकमधील मोठे नाव अद्वय हिरे आणि छत्रपती संभाजीनगरमधील राजू शिंदे हे दोन बडे नेते आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते शिंदे गटातील मंत्री दादा भुसे आणि संजय शिरसाट यांच्या विरोधात विधानसभेत लढलेले असल्याने, भाजपकडून शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
बच्चू कडू यांनी नेत्यांच्या घराणेशाहीवर जोरदार टीका केली. नेत्यांकडून कार्यकर्त्यांना फक्त भावनांमध्ये आणण्याचा प्रयत्न असतो. अनेकदा सांगितले जाते की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. पण प्रत्यक्षात पाहिलं तर, अनेक ठिकाणी आमदारांच्या पत्नी, बहिणी, मंत्र्यांची मुलं किंवा पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. ज्याच्या घरात पती आमदार आहे, तो जर बायकोला नगराध्यक्ष करण्यासाठी उभे करत असेल, तर हे अत्यंत चुकीचे आहे. अशा लोकांना जनतेने निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला पाहिजे. यामुळे पक्षाची गुलामगिरी स्वीकारलेल्या लोकांमध्ये वैचारिक बांधिलकी सुटत चालली आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीसह राज्यभरातील नगरपालिका निवडणुकांवर भाष्य करताना मोठा आरोप केला आहे. रत्नागिरीपासून ते गडचिरोलीपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात प्रहार संघटना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवत आहे. मात्र, सध्या अनेक ठिकाणी निवडणूक धार्मिक युद्ध बनली आहे. जिथे हिंदू-मुस्लिम मतं आहेत, तिथे धर्मयुद्ध सुरू आहे, तर इतर ठिकाणी ‘निळा आणि भगवा’ किंवा ‘हिरवा आणि भगवा’ अशी लढत पाहायला मिळत आहे. निवडणुकांमध्ये होणारे हे धार्मिक ध्रुवीकरण अत्यंत चुकीचे आहे, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल परिसरात बिबट्या असल्याच्या माहितीमुळे दोन दिवस शाळेला सुट्टी देण्यात आली होती. मात्र, वन विभागाने परिसरात लावलेल्या ट्रॅप कॅमेरातून या अफवेचं सत्य समोर आलं आहे. कॅमेरात बिबट्याऐवजी रान मांजर (Jungle Cat) आढळून आले आहे. बिबट्याच्या भीतीने नागरिक चिंतेत असताना, रान मांजराची नोंद झाल्याने वन विभागाने आता त्याचा शोध सुरू केला आहे. या मांजराला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम यंत्रणा करत आहेत.
दिवसागणित तापमान खाली येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी शहरात तापमानाचा पारस 6.2°c नोंदवला गेले. जनजीवन विस्कळीत झालेल आहे. शीतलहरीकडे शहराची वाटचाल सुरू आहे. येणारे काही दिवस थंडीचा कडाका असाच कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे.
येवल्यात शिवसेना (ठाकरे) गटाला मोठा धक्का… शिवसेनेचे नेते संभाजी पवार यांच्यासह तालुकाप्रमुख रतन बोरणारे व शिवसैनिक करणार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश… दुपारी साडेतीन वाजता मुंबईमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा… स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तोंडावर या प्रवेश सोहळ्यामुळे येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची वाढणार ताकद…
कॅम्पस मध्ये लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेरात आढळून आले रान मांजर… भोसला स्कूल परिसरात बिबट्या असल्याची काही नागरिकांनी दिली होतो माहिती… वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरात मात्र रान मांजर आढळून आल्याने यंत्रणांकडून रान मांजराचा शोध सुरू… काल नंतर आज देखील शाळेला आज देण्यात आली आहे सुट्टी…
धाराशिवच्या भूम आणि परंडा नगरपालिकेसाठी शिवसेने विरोधात भाजप आणि काँग्रेस एकत्र आलीय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकमेकांच्या विरोधात असलेले काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्थानिक आघाडीच्या माध्यमातून शिंदे शिवसेनेच्या विरोधात एकत्र आलेत. धाराशिवच्या भूम आणि परंडा नगरपालिकेत आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे या दोन गटामध्ये लढत पाहायला मिळत आहे. या दोन्ही नगरपालिकेमध्ये सर्वपक्षीय जनशक्ती विकास आघाडी विरुद्ध शिवसेना तानाजी सावंत गट अशी लढत पाहायला मिळत आहे. भूम येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवसेनेच्या संयोगिता गाढवे विरुद्ध जनशक्ती विकास आघाडीच्या सत्वशीला थोरात यांच्यामध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे परंडा नगरपालिकेसाठी शिवसेना तानाजी सावंत गटाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवार जाकीर सौदागर यांच्याविरुद्ध जनसेवा विकास आघाडी कडून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र विश्वजीत पाटील यांच्यात मुख्य लढत आहे…
बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे शेतीच्या वादातून चार जणांना भावकीतीलच लोकांकडुन भीषण मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये लोखंडी पाईप, लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या दिसत आहेत. या मारहाणीत चार जण गंभीर जखमी असून बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुण्यात रोज एक गुन्हेगारी टोळी तयार होतेय… किती दिवस वाट पाहणार. पोलीस यंत्रणा कुचकामी पडतेय का? शंका मनात येतेय. राजकारणी माणसांना गुन्हेगारांशिवाय निवडणुका लढवता येत नाहीत. जे गुन्हेगार राजकारण्यांना कनेक्टेड आहेत त्यांची नावे आयुक्तांनी जाहीर केली पाहिजे.
महायुतीकडे आम्ही 12 जागांची मागणी केली होती. सातत्याने मेटे साहेबांनी शेवटपर्यंत नगरपरिषदेत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम केलं. बीड विकासापासून दुर का आहे? जनकत्व त्याच नगराध्यक्षांकडे आहे. आम्ही 12 जागांची मागणी केली होती.. आमचे उमेदवार विस्थापित असल्याने काही अडचणी आल्या.. यामुळे आम्ही काही थोडक्या जागा लढत आहोत, असे ज्योती मेटे यांनी म्हटले.
सीएनजीचा तुटवडा मुळे ठाण्यातील महानगर गॅस पंप वरती रिक्षांच्या अर्धा ते एक किलोमीटर पर्यंत रिक्षाच्या लांबच लांब रांगा. सीएनजीचा फटका ठाण्यात रिक्षा चालक आणि मालक यांना बसला आहे.. ठाण्यातील अनेक ऑनलाईन सीएनजी पंपावर एक ते दोन तासापासून रिक्षा चालक रांगेत उभे…
शरद पवार गट वेगळे झाल्यापासून जिल्हाध्यक्ष पदाची सांभाळले होते धुरा. शरद पवार गटाला गोंदिया जिल्ह्यात मोठा धक्का…
गोंदिया- शरद पवार गटाचे राज्य सरचिटणीस शिंदे गटातून नगरसेवकाच्या रिंगणात उतरले आहेत. शरद पवार गट वेगळे झाल्यापासून जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. शरद पवार गटाला गोंदिया जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विक्रोळी आणि कांजूरमार्ग स्टेशनदरम्यान डाऊन स्लो मार्गावर रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे गेल्या अर्धा तासापासून लोकल सेवा विस्कळी झाली आहे.
नाशिकमध्ये बिबट्याची दहशत कायम असून आज सलग दुसऱ्या दिवशी भोसला मिलिटरी स्कूलला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. वनविभागाकडून काल सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर बिबट्या नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
जालना जिल्ह्यात तिन्ही नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार आहे. आमदार नारायण कुचे यांच्यासमोर अंबडचा गड राखण्याचं आव्हान आहे. तर भोकरदन आणि परतूरमध्ये सत्ता खेचून आणण्यासाठी रावसाहेब दानवे, लोणीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आघाडी आणि युतीमधील अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीविरोधात 100 हरकती आल्या आहेत. शुक्रवारी या विषयावर सुनावणी होणार आहे. साधुग्रामसाठी 1800 झाडांची मोजणी करण्या आली असून यातील 40 टक्के झाडं तोडणार आहेत. या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. हरकती सादर करण्यास सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
मुंबईच्या बहुतांश सीएनजी पंपांवर पुरवठा ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय. अनेक CNG पंपांवर ड्रायव्हर्सची किलोमीटरभर लांब रांग पाहायला मिळाली. अनेक पंपांवर “CNG बंद आहे” असे बोर्ड लावण्यात आले, त्यामुळे ऑटो-टॅक्सी चालकांमध्ये नाराजीचा सूर अधिकच चढलाय.
विविध जलकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीमुळे येत्या गुरुवारी जवळपास संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे देखभाल दुरुस्ती, फ्लो मीटर बसवणे, वाळू बसवणे यांसारख्या कामांसाठी हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मुंबईच्या माजगाव सीएनजी पंपावर टॅक्सीच्या रांगा लागल्या आहेत. दोन किलोमीटरपर्यंत खाजगी टॅक्सीच्या लांबच लांब रांगा आहेत. रविवारी महानगर गॅसचा मुख्य पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा फटका बसला आहे. मात्र इतर पंपांवर सीएनजी मिळत नसल्याने टॅक्सी चालक सीएनजी भरण्यासाठी सीएनजी पंपाचा शोध घेत आहेत.