LIVE : 24 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येला जाणार

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, मोठ्या बातम्या, राजकारण, मुंबई, पुण्यासह सर्व बातम्यांचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

LIVE : 24 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येला जाणार
Picture

24 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येला जाणार

येत्या दोन तीन दिवसात शिवनेरीवर जाणार, त्यानंतर 24 तारखेला मी अयोध्येला जाईन : उद्धव ठाकरे

09/11/2019,4:18PM
Picture

मुख्यमंत्री वडाळ्यातील राम मंदिरात दर्शनाला जाणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील आज दुपारी वडाळा येथील राम मंदीरात राम दर्शनाला जाणार

09/11/2019,11:03AM
Picture

मालाडच्या द रीट्रिट हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

मालाडच्या द रीट्रिट हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, रात्रीपासून एकही शिवसेनाचा आमदार हॉटेलबाहेर आलेला नाही. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व शिवसेना आमदार हॉटेलच्या रुममध्येच

09/11/2019,10:05AM
Picture

अकोला- वाशिम मार्गावरील मेडशी जवळ अपघात, दोन जण गंभीर

वाशिम : अकोला- वाशिम मार्गावरील मेडशी जवळ दोन आयशरचा समोरासमोर धडक, या अपघातात दोन जण गंभीर जखमी तर पाच जण किरकोळ जखमी, जखमींना उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले आहे.

09/11/2019,9:41AM
Picture

रोहित पवार शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल

रोहित पवार शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल, शरद पवार आणि रोहित पवार यांच्यात चर्चा सुरु

09/11/2019,9:40AM
Picture

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय देणार महत्त्वपूर्ण निकाल

अवघ्या देशभराचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय आज (9 नोव्हेंबर) सकाळी 10.30 वाजता अंतिम निर्णय देणार (Ayodhya Hearing) आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

09/11/2019,9:31AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *