AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला? कोण होणार नवे पालकमंत्री?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा काळ ठरण्याची शक्यता आहे. पाहिले अडीच वर्ष राष्ट्रवादी तर दुसऱ्या अडीच वर्षांची टर्म शिवसेनेला मिळणार असल्याची शक्यता आहे. 

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला? कोण होणार नवे पालकमंत्री?
| Updated on: Mar 03, 2025 | 5:47 PM
Share

राजयकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. रायगडचं पालकमंत्रिपद हे महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. तर नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं होतं. मात्र या दोनही ठिकाणी पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेचे नेते इच्छूक होते. नाशिकसाठी दादा भुसे तर रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले हे इच्छूक होते. मात्र पालकमंत्रिपद न मिळाल्यानं भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती.

भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद मिळावं अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील इच्छा होती. मात्र त्यांना पालकमंत्रिपद मिळालं नाही, त्यांच्या ऐवजी आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रिपद मिळालं तर नाशिकचं पालकमंत्रिपद हे गिरीश महाजन यांना मिळालं यावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर महायुती सरकारनं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली, अखेर आता हा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा काळ ठरण्याची शक्यता आहे. पाहिले अडीच वर्ष राष्ट्रवादी तर दुसऱ्या अडीच वर्षांची टर्म शिवसेनेला मिळणार असल्याची शक्यता आहे.  पहिले अडीच वर्षे अदिती तटकरे याच रायगडच्या पालकमंत्री पदी राहण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या अडीच वर्षांत पालकमंत्रिपद हे भरत गोगावले यांना मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती आता समोर येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता अडीच -अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवला जाण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांनाही रायगडचं पालकमंत्रिपद मिळू शकतं. पहिले अडीच वर्ष आदिती तटकरे तर दुसरे अडीच वर्ष भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...