अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू

गोदावरी नदी पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलींच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू

जालना : गोदावरी नदी पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला आहे. किशोरी कुटे (10) आणि नेहा कुटे (8) अशी या दोन्ही मुलींची नावे आहेत. जालन्यातील अंबडमधील गोरी गंधारी परिसरात ही घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गोदावरी नदीतल्या सावळेश्वर येथील पात्रात किशोरी आणि नेहा आपल्या आईसोबत गेल्या होत्या.  मात्र सावळेश्वर नदी पात्रात पाणी नसल्याने त्यांची आई मंगल कुटे या गोरी –गंधारी या ठिकाणी कपडे धुण्यास बसल्या होत्या. त्या दरम्यान किशोरी आणि नेहा या दोघीही सावळेश्वर नदीपात्रात अंघोळीसाठी उतरल्या. नदी पात्रात खेळता खेळता त्या दोघीही खोल पाण्यात गेल्या. त्यावेळी त्या दोघींनाही नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

किशोरी संतोष कुटे (10) आणि नेहा संतोष कुटे (8) अशी या दोन्ही चिमुकल्यांची नावे आहेत. दोन्ही मुलींच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *