AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृताचा भाऊ अन् आरोपीत त्या हॉटेलमध्ये नेमकी काय चर्चा झाली? संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात सर्वात मोठा खुलासा

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे, देशमुख यांच्या हत्येपूर्वीचे दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

मृताचा भाऊ अन् आरोपीत त्या हॉटेलमध्ये नेमकी काय चर्चा झाली? संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात सर्वात मोठा खुलासा
| Updated on: Dec 17, 2024 | 7:30 PM
Share

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आली. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली, दरम्यान या घटनेच्या आठ दिवसांनंतर आता दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीचे असल्याचं सांगण्यात येत आहे.

पहिला व्हिडीओ जो व्हायरल झाला आहे, तो व्हिडीओ या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि निलंबनाची कारवाई झालेले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या भेटीचा आहे, ते केजमधील एका हॉटेलमध्ये भेटल्याचं दिसत आहे, पहिल्या व्हिडीओमध्ये आणि दुसऱ्या व्हिडीओमध्ये चार मिनिटांचं अंतर आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये आरोपी सुदर्शन घुले, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि त्यांच्यासोबत ज्यांची हत्या झाली त्या संतोष पाटील यांचा भाऊ  धनंजय देशमुख हे देखील दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये धनंजय देशमुख हे त्या दोघांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं होतं अखेर या व्हिडीओप्रकरणात आता धनंजय देशमुख यांनीच खुलासा केला आहे.

नेमकं काय म्हणाले धनंजय देशमुख? 

मी आगोदरच हॉटेलमध्ये बसलो होतो. त्यांनी मला वेटरद्वारे इशारा केला आणि मला त्यांच्या टेबलवर बोलावून घेतले. सहा तारखेला जे भांडण झालं होतं, त्याबाबत ते विचार होते. पीएसआय राजेश पाटील यांच्याकडे या मारहाणीसंदर्भातील तपास होता. आमच्या गावचं मिटलं आहे असं मी त्यांना यावेळी सांगितलं. माझ्या भावाचा खून होणार असल्याची भनक मला लागली असती तर मी त्यांना भेटलोच नसतो. आम्ही त्या हॉटेलमध्ये चहा घेतला. चहाचं बिल देखील मी दिले. त्यावेळी हाच आपला घात करणार आहे हे मला माहीत देखील नव्हते. या प्रकरणात राजेश पाटील आणि सुदर्शन घुले यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील यावेळी धनंजय देशमुख यांनी केली आहे. दरम्यान याप्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आलं असून, चार जण फरार आहेत.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...