कोकणवासीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा; देवगडातील उदय लळीत देशाचे 49 वे सरन्यायाधीश होणार; घराला वकीलीची परंपरा

| Updated on: Aug 04, 2022 | 5:56 PM

सर्वोच्च न्यायलयाने उदय लळीत यांना ज्येष्ठ वकील म्हणून नामनिर्देशीत केले होते. देशभरातील असंख्य महत्वाच्या खटल्यांमध्ये आपल्या वकीलीचा त्यांनी ठसा उमटवला आहे. सात वर्षे ते महाराष्ट्र सरकारच्या सर्वोच्य न्यायालयाच्या पॅनेलवर ज्येष्ठ वकील म्हणून काम पाहत होते.

कोकणवासीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा; देवगडातील उदय लळीत देशाचे 49 वे सरन्यायाधीश होणार; घराला वकीलीची परंपरा
Follow us on

सिंधुदुर्गः कोकणवासीयांच्या शिरपेचात आता एक आणखी मानाचे तुरा रोवले जाणार आहे, कारण आता सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड (Sindhudurg Devgad) तालुक्यातील सुपुत्र भारताचे 49 वे सरन्यायाधीश (Chief Justice) बनणार आहेत. 27 ऑगस्टला न्यायमूर्ती उदय उमेश लळीत (Uday Umesh Lalit) हे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. कोकणवासीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणाऱ्या या घटनेपूर्वी उदय लळीत यांचा हा यशस्वी प्रवास. न्यायमूर्ती उदय लळीत हे मुळचे देवगड तालुक्यातील गिऱ्ये गावातील आहेत. आजही या गावात लळीत यांची आठ ते दहा कुटुंब वास्तव्याला आहेत. उदय लळीत यांच्या घरण्याला कायदेतजज्ज्ञांची एक परंपराच आहे. उदय लळीत यांचे वडिल उमेळ लळीत हेदेखील मुंबई उच्च न्यायलयाचे ज्येष्ठ वकिल होते. त्यांनी 1974 ते 76 च्या काळात ते नागपूर खंडपीठाचे अतिरिक्त सरन्यायाधीश झाले होते.

मुंबईतून शिक्षण पूर्ण

आता सरन्यायाधीश म्हणून विराजमान होणाऱ्या उदय लळीत यांनी आपले शिक्षण मुंबईत पुर्ण केले असून त्यांनी 1983 आपल्या वकिलीला सुरुवात केली होती. तर दिवंगत ज्येष्ठ वकिल एम. एम. राणे यांच्याकडे त्यांनी वकिली केली होती.

सोली सोराबजी यांचे निकटचे सहकारी

त्यानंतर ते दिल्लीत, तब्बल सहा वर्ष जेष्ठ विधितज्ज्ञ सोली सोराबजी यांचे निकटचे सहकारी म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यानंतर ते अनेक वर्षे उदय लळीत सर्वोच्च न्यायालयात स्वंतत्रपणे वकिली करत होते. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या आजोबांपासून ते त्यांचे चार काकादेखील वकील होते. उदय लळीत यांचे आजोबा वकिली करण्यासाठी आपटे येथून कोल्हापूरला स्थाईक झाले होते.

2 जी स्पेक्ट्रम घोटाळा

2004 मध्ये सर्वोच्च न्यायलयाने उदय लळीत यांना ज्येष्ठ वकील म्हणून नामनिर्देशीत केले होते. देशभरातील असंख्य महत्वाच्या खटल्यांमध्ये आपल्या वकीलीचा त्यांनी ठसा उमटवला आहे. सात वर्षे ते महाराष्ट्र सरकारच्या सर्वोच्य न्यायालयाच्या पॅनेलवर ज्येष्ठ वकील म्हणून काम पाहत होते. देशातील सुमारे 14 राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्य न्यायलयात प्रकरणे चालवली.

ईडीच्यावतीने अभियोगाची जवाबदारी

माजी केंद्रीय दळणवळण मंत्री ए. राजा यांच्यासह अनेक बड्या आसामी आरोपी असलेल्या 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा खटल्या प्रकरणी सीबीआय आणि ईडीच्यावतीने अभियोगाची जवाबदारी उदय लळीत यांच्यावर टाकण्यात आली होती. 80 हजार पानांचा डोलारा सांभाळत त्यांनी 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा चालवला असल्याचेही सांगण्यात येत आहे. असे हे सिंधुदूर्गचे मुळ सुपुत्र असलेले भारताचे भावी सरन्यायधीश होणार असल्याने कोकणातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुमारे 200 वर्षापुर्वी काही कारणामुळे त्यांचे वास्तव्य कुंभवडे, पेंढरी, हरचेरी, चुना कोळवण तसेच रायग़ड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील आपटी या गावी स्थलांतरीत झाले.