विवेकच्या मृत्यूने रहाडे कुटुंबाची मोठी हानी; तरुणांनो, धीर सोडू नका, टोकाचा निर्णय घेऊ नका; उदयनराजेंचं आवाहन

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे शिक्षणाच्या चिंतेतून आत्महत्या करणाऱ्या विवेक रहाडेला उदयनराजेंनी श्रद्धांजली वाहिली आहे. मराठा युवकांनी धीर सोडू नये, असं आवाहन उदयनराजेंनी केलं आहे. (Udayanraje appeal to maratha youth after suicide of vivek rahade )

विवेकच्या मृत्यूने रहाडे कुटुंबाची मोठी हानी; तरुणांनो, धीर सोडू नका, टोकाचा निर्णय घेऊ नका; उदयनराजेंचं आवाहन
Follow us
| Updated on: Oct 01, 2020 | 4:51 PM

सातारा: राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण स्थगितीमुळे शिक्षणाच्या चिंतेतून आत्महत्या करणाऱ्या विवेक रहाडेला श्रद्धांजली वाहिली आहे. विवेकच्या जाण्यानं रहाडे कुटुंबाची भरुन न निघणारी हानी झाली आहे. मात्र, धीर सोडून व टोकाचा निर्णय घेऊन चालणार नाही आणि यातून काही निष्पन्न होणार नाही, असे आवाहन उदयराजेंनी मराठा समाजातील तरुणांना केले आहे. (Udayanraje Bhonsle appeal to maratha youth after suicide of Vivek Rahade)

बीड जिल्ह्यातील गरीब शेतकरी कुटुंबातील मराठा तरुण विवेक कल्याण रहाडे या बांधवाने आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. त्याची वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा होती. विवेकच्या परिवारासोबत संवेदना आहेत. विवेकच्या जाण्याने त्याच्या कुटुंबाची कधीही भरुन न निघणारी हानी झाली आहे, असे उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

समाजातील युवकांना उदयराजेंचे आवाहन

देशाचे भविष्य असणाऱ्या नवयुवकांनी असे पाऊल उचलणे, हे राष्ट्राच्या व समाजाच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे. धीर सोडून व टोकाचा निर्णय घेउन चालणार नाही आणि यातून काही निष्पन्न होणार नाही. मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र व भावनिक आहेत हे मान्य आहे. त्यासाठी आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही, असं उदयराजे म्हणाले आहेत.

आजची परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली तरी न्यायालयात मोठ्या ताकदीने लढा देत आहोत. त्यामुळे आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला आहे.

विवेक रहाडेची सुसाईड नोट

“मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मी नुकतीच नीट (NEET) ही मेडिकलची परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्यामुळे माझा नीटमध्ये नंबर लागला नाही. प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकवण्याची माझ्या घरच्यांची ऐपत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची किव येईल आणि माझे मरण सार्थक होईल.”

संबंधित बातम्या :

मी मेल्यावर तरी राज्य-केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल, बीडच्या विवेकची सुसाईड नोट

“लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं”, मराठा आरक्षणावर संभाजीराजेंचं युवकांना आत्महत्या न करण्याचं आवाहन

(Udayanraje Bhonsle appeal to maratha youth after suicide of Vivek Rahade)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.