AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thackeray Brothers Morcha : धर्मेंद्र प्रधान राजीनामा झांकी है, नरेंद्र मोदी बाकी है, शिवसैनिक-मनसैनिकांनी ट्रेन दणाणून सोडली

Thackeray Brothers Morcha : ठाकरे बंधू तरुणांना कोणता संदेश देणार, सत्ताधाऱ्यांवर कोणत्या मुद्द्यांवर निशाणा साधणार आणि आगामी राजकीय दिशा काय असणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आज दादरमध्ये जल्लोष सभा आहे.

Thackeray Brothers Morcha : धर्मेंद्र प्रधान राजीनामा झांकी है, नरेंद्र मोदी बाकी है, शिवसैनिक-मनसैनिकांनी ट्रेन दणाणून सोडली
Thackeray Brothers Morcha
| Updated on: Jul 26, 2026 | 10:23 AM
Share

मनसैनिकांपाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईतील वीर सावरकर मार्गावर होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या सभेसाठी कल्याण-डोंबिवलीतून मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेकडो कार्यकर्ते लोकल ट्रेनचा प्रवास करत मुंबईकडे रवाना झालेत. रेल्वे स्थानके आणि लोकल ट्रेनमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली; घोषणाबाजीने संपूर्ण वातावरण दणाणून गेले. “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झांकी है, नरेंद्र मोदी बाकी है” अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी आपला उत्साह व्यक्त केला. भगवे झेंडे आणि जोरदार घोषणाबाजीमुळे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये राजकीय रंग चढल्याचे चित्र दिसले. काही वेळातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावरून कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याने समर्थकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

ठाकरे बंधू तरुणांना कोणता संदेश देणार, सत्ताधाऱ्यांवर कोणत्या मुद्द्यांवर निशाणा साधणार आणि आगामी राजकीय दिशा काय असणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरे बंधूंच्या संयुक्त तिरंगा विजय जल्लोषसाठी ठाण्यातून ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईकडे रेल्वेने ठाणे स्थानक येथून रवाना होणार.शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि मनसे नेते अविनाश जाधव ,ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोर यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते ठाणे रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनने एकत्र प्रवास. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत सर्व कार्यकर्ते लोकल ट्रेनने मुंबईच्या दिशेने रवाना होणार.

‘ही तर फक्त झाकी आहे, पुढे अजून मोठी लढाई बाकी आहे’

ठाकरे बंधुंच्या जल्लोष सभेसाठी कल्याणहून मनसैनिकांचा मुंबईकडे लोंढा. रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी. वीर सावरकर मार्गावर होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या जल्लोष सभेसाठी कल्याण रेल्वे स्थानकावर शेकडो मनसैनिकांची मुंबईकडे जाण्यासाठी मोठी गर्दी. कार्यकर्ते मोठ्या उत्साहात लोकलने प्रवास करत मुंबईच्या दिशेने रवाना. स्थानक परिसर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तरुणाईच्या आंदोलनाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सभेचे आयोजन. “ही तर फक्त झाकी आहे, पुढे अजून मोठी लढाई बाकी आहे,” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी उत्साह व्यक्त केला.

Follow Us
प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; सगळीकडे लगबग,पहा
Thackeray Brothers Sabha | प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; सगळीकडे लगबग, पहा व्हिडीओ
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या