‘संविधानाची शपथ घेऊन अशा पद्धतीने वागणारा व्यक्ती मंत्री…’ देवेंद्र फडणवीसांना सवाल

"कोणी काय, कुठे खायचं यावर ते बोलतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोडून तोडून सांगतात. हे सर्व असंवैधानिक वर्तन करताना ते अभिमानाने सांगतात की, माझा बॉस सागर बंगल्यावर आहे"

संविधानाची शपथ घेऊन अशा पद्धतीने वागणारा व्यक्ती मंत्री... देवेंद्र फडणवीसांना सवाल
Devendra Fadnavis
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Mar 16, 2025 | 2:24 PM

आमदार आणि मंत्री नितेश राणे वारंवार जी वक्तव्य करत आहेत, त्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांना पत्र लिहिले आहे. “मंत्रीपदाची शपथ घेतली आहे आणि ती शपथ संविधानाची घेतलेली आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, सगळ्या मंत्र्यांनी म्हटलेलं आहे की कोणत्याही प्रकारची आकस किंवा कोणाविरुद्ध बदल्याची भावना वगैरे ठेवणार नाही. सगळ्यांना समान वागणूक देणार वगैरे वगैरे आणि मला असं वाटतं त्याचं वारंवार उल्लंघन ते करत आहेत. शपथविरोधी वागत आहेत तर गव्हर्नरने त्यांच्यावर कारवाई करावी” अशी मागणी अखिल चित्रे यांनी केली.

“गव्हर्नरनी कारवाई करण्यासाठी जे या सरकारचे, राज्याचे प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून, हे शपथविरोधी वागत आहेत, असा प्रस्ताव गव्हर्नरकडे पाठवणं गरजेचं आहे” असं अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे. “अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल आणि हे जे काही वारंवार हे काय मंत्री महोदय आहेत ते कधी म्हणतात, की कोणत्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना, सरपंचांना मी एक रुपयाही निधी देणार नाही. जो विकास निधी असतो, तो आमच्या टॅक्स पेअरचा असतो. तो काय तुमच्या घरातल्या तुमच्या वडिलांच्या प्रॉपर्टीतला पैसा नाही” असं अखिल चित्रे म्हणाले.

असा व्यक्ती मंत्री पदावर योग्य आहे का?

त्याच्यानंतर, “कोणी काय, कुठे खायचं यावर ते बोलतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोडून तोडून सांगतात. हे सर्व असंवैधानिक वर्तन करताना ते अभिमानाने सांगतात की, माझा बॉस सागर बंगल्यावर आहे. संविधानाची शपथ घेऊन अशा पद्धतीने वागणारा व्यक्ती मंत्री पदावर योग्य आहे का?” असा सवाल अखिल चित्रे यांनी विचारला आहे.


‘तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली पाहिजे’

“देवेंद्र फडणवीस हे राज्यातील सरकारचे प्रमुख आहेत. तुम्ही अशा वक्तव्यांना पाठिंबा देता का? जर नाही, तर तुम्ही अशा मंत्र्याविरोधात कायदेशीर कारवाई कधी करणार?” असा सवाल अखिल चित्रे यांनी विचारलाय. “राज्याचे नेते या नात्याने तुम्ही तुमच मौन सोडणं आवश्यक आहे. या संबंधी तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली पाहिजे” असं अखिल चित्रे म्हणाले.