AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये मोठा राडा; महापौर दालनातच खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून दोन्ही शिवसेनेचे नगरसेवक आमनेसामने

nashik political news : नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. नाशिकमध्ये महापौर दालनातच खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून दोन्ही शिवसेनेचे नगरसेवक आमनेसामने आले.

नाशिकमध्ये मोठा राडा; महापौर दालनातच खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून दोन्ही शिवसेनेचे नगरसेवक आमनेसामने
| Updated on: Jul 30, 2026 | 2:40 PM
Share

नाशिकमधील रस्त्यावरील वाढते खड्डे सर्वसामान्यांच्या जीवावर बेतू लागले आहेत. मागील काही दिवसांत रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेवरून ठाकरे गटाच्या नगरसेवकांना आक्रमकपणे जाब विचारला. नाशिकच्या महापौर दालनातच खड्ड्या्च्या मुद्द्यावरून दोन्ही शिवसेनेचा नगरसेवक आमनेसामने आले. दोन्ही गटाच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच शा‍ब्दिक चकमक झाली. यामुळे नाशिक महापालिकेतील नगरसवेकांच्या हायव्होल्टेज ड्रामामुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं.

नाशिकमध्ये शहरातील रस्ते आणि खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होऊ लागले आहेत. शहरात खड्ड्यांचा कहर पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांत नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्याने दोघांचा बळी घेतला आहे. नाशिक कोतकर असे खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नाशिकमध्ये खड्ड्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मुद्द्द्यावरून ठाकरे गटाने शिंदे गटाच्या नगरसेवकांना जाब विचारला. दोन्ही शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये महापौर दालनातच शा‍ब्दिक चकमक झाली.

ठाकरे गटाकडून सकाळपासून आंदोलन सुरू आहे. ठाकरे गटाचे नगरसेवक केशव पोरजे म्हणाले, ‘शिंदे गट सत्तेत असून आंदोलन करत आहे. तुम्हाला जनतेसाठी भांडायचं असेल, तर सत्तेतून बाहेर या. नाशिक महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाचे कसं सुरु आहे बघा… एकाने मारल्यासारखं करायचं, तर दुसऱ्याने रडल्यासारखं करायचं. ही भूमिका शिंदे गटाची आहे. शिवसेनेची रस्त्यावर उतरण्याची भमिका आहे. तुम्ही आमच्यासोबत रस्त्यावर उतरा. राजीनामे द्या. या प्रकरणात महापौर असेल किंवा आयुक्त असेल, यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हेच लोक कंत्राटादारांना पाठिशी घालतात. महापालिकेत महापौरांनी म्हटलं होतं की, रस्त्यावरील खडड्यामुळे मृत्यू झाला, तर कंत्राटदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु आजपर्यंत एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. काल दुर्दैवाने शहरात चौथा व्यक्ती मृत्यूमुखी पडला. त्यामुळे आता कधी गुन्हा दाखल करणार? मी जाब विचारल्यानंतर यांनी महासभेची तारीख ही 7 तारीख जाहीर केली. महापौरांनी महासभा घेणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी आता महासभेले विशेष महासभा म्हणून जाहीर करावे. महौपारांना महासभा जाहीर करण्यासाठी 12 दिवस कसे लागले’.

‘सकाळपासून ठाकरे गटाचे नगरसेवक पायऱ्यावर बसून आंदोलन करत आहे. आम्ही आंदोलन केलं, त्यानंतर महापौरांनी 7 तारखेला महासभा घेणार असल्याचे जाहीर केले. आमच्या आंदोलनामुळे शिंदे गटाच्या नगरसेवकांच्या पोटात दुखलं. त्यामुळे शिंदे गटाचे दोनच नगरसेवक आंदोलन करत आहे. बाकीचे नगरसेवक कुठे आहे, शिंदे गटाचे गटनेते, उपमहापौर कुठे आहेत? त्यांनी सत्तेत असून आंदोलन करत आहे, ही दुर्दैवी बाब आहे. ते भाजपची लाचारी करत आहे. यांनी कुटुंबाला न्याय द्यायचा होता, तर महापौर आणि उपमहापौरांनी पीडित कुटुंबाला मदत जाहीर करण्याची गरज होती, असे ठाकरे गटाचे नगरसेवक पोरजे पुढे म्हणाले.

Follow Us
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला