AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omraje Nimbalkar : तुम्ही उद्धव ठाकरे गटासोबत आहात का? ओमराजे निंबाळकर यांचं सूचक उत्तर VIDEO

Omraje Nimbalkar : नॉट रिचेबल असलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी टीव्ही 9 मराठीने संवाद साधला. 'मी पुण्यातच आहे. दिल्लीला गेलेलो नाही' असं त्यांनी सांगितलं.

Omraje Nimbalkar : तुम्ही उद्धव ठाकरे गटासोबत आहात का? ओमराजे निंबाळकर यांचं सूचक उत्तर VIDEO
Omraje Nimbalkar
| Updated on: Jun 17, 2026 | 1:35 PM
Share

महाराष्ट्राच राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार स्वतंत्र चूल मांडणार अशा बातम्या येत आहेत. या सहा खासदारांच्या स्वतंत्र गट स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाईल, राजाभाऊ वाजे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. त्यात संजय राऊत यांनी स्पष्ट केलं की, “मागे जे झालं, त्याची पुनरावृत्ती होणार असेल तर जनता गप्प बसणार नाही. शिवसेना नाहीच. जो राडा व्हायचा तो होईल. ही गांडूगिरी, नादाणपणा खपवून घेतला जाणार नाही” दरम्यान कोणाच्या संपर्कात नसलेल्या सहा खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर यांच्याशी टीव्ही 9 मराठीचा संपर्क झाला आहे.

तुम्ही दिल्लीला आहात का? तुम्हाला तानाजी सावंत दिल्लीला घेऊन गेले का? या प्रश्नावर ओमराजे निंबाळकर यांनी उत्तर दिलं. ‘मी पुण्यातच आहे. दिल्लीला गेलेलो नाही’ असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.तानाजी सावंत मला दिल्लीला घेऊन गेलेले नाहीत असही त्यांनी स्पष्ट केलं. तुम्ही उद्धव ठाकरे गटासोबत आहात का? यावर ओमराजे निंबाळकर यांनी थेट उत्तर देणं टाळलं.

त्यांच्या राजकीय भवितव्यात शिवसेनेचा मोठा वाटा

ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे, निष्ठावंत खासदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी फुटून बाहेर पडणं हा ठाकरेंसाठी मोठा झटका असेल. ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भवितव्यात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. एकदा ते शिवसेनेच्या तिकीटावर आमदार, दोनदा खासदार झाले. 2006 साली वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येमुळे ओमराजे निंबाळकर यांना वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी राजकारणात प्रवेश करावा लागला. शांत, संयमी स्वभावाचे राजकारणी म्हणून ते ओळखले जातात.  धाराशिव जिल्ह्यातून येणाऱ्या या खासदाराचा तळागाळातील जनतेसोबत दांडगा जनसंर्पक आहे. भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय पाटील, ओमराजे निंबाळकर , संजय देशमुख हे खासदार ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं बोललं जातं.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!