
“हा फेक शो होता, नॉट टॉक शो तारीख पे तारीख दिली आहे. काल गुपचूप पंप हाऊसचं उद्घाटन झालं, पण काहीही झालेलं नाही. मी माहिती घेतली आहे. पुणे, नागपूर शो देखील पाहिले. सर्व सारखेच होते, प्रश्न विचारणारे त्यांचेच होते” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. “3 लाख कोटी मुंबई महानगरपालिकेला देणे आहे, फडणवीस-शिंदे यांनी मुंबईला लुटले आहे. 93 हजार कोटींची डिपॉझिट देखील तोडली आहे, मुंबई सुरक्षित ठाकरे बंधूंच्या हातात राहील” असं अंबादास दानवे यांनी सांगितलं. “आम्ही आधी 50 खोके घोषणा देत होते, आता भाजप देत आहे. परळीत राष्ट्रवादी शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसली आहे. एमआयएम देखील सोबत आहे” अशी टीका दानवे यांनी केली.
“भगवा शान राखली पाहिजे, पण भगवी शान कशी असावी, शहराचा चेहरा मोहरा बदलला तरच भगव्याची शान आहे. भाजप हिंदुत्ववादी आहे असं कोण म्हणतं? भाजप ढोंगी हिंदुत्ववादी आहे” असं अंबादास दानवे म्हणाले. “मला असे वाटते की विकासावर बोलले पाहिजे. अशा गोष्टींना अर्थ नाही, लोकांच्या मनातलं विश्लेषण आम्हाला मान्य नाही, निवडणुकीसाठी अशा गोष्टी दिले जातात, रिकाम्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं पाहिजे” असं दानवे म्हणाले.
भाजप सांगण्यात पटाईत
“खोटारडेपणा भाजपच्या पाचवीला पुजलेला आहे, भाजप सांगण्यात पटाईत आहे, प्रत्यक्षात काही करत नाही” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. उदय सामंत मुंबई तोडण्याची भाषा करतात. “हे असत्य आहे उदय सामंत यांनी सांगावे, वल्लभभाई पटेल यांचे नाव मिटवून मोदींचे नाव मैदानाला देण्यात आले यावर सामंत यांनी बोलावे” असं दानवे म्हणाले.
साटम-झाटम विकासावर बोला
“रावसाहेब दानवे यांनी काहीही काम केलं नाही म्हणून कल्याण काळे निवडून आले. दानवेंना चकवा म्हटलं जातं, दोन आमदार मुलांचा बाप असणे ही काही विकास कामाची पावती असू शकत नाही” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. “नितेश राणे विकासावर बोला. यांची जी पिलावळ आहे राणे, साटम, झाटम, विकासावर बोला” असं अंबादास दानवे म्हणाले.