AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणातून पुन्हा उद्धव ठाकरे यांना धक्का, अनेक बडे नेते भाजपत

uddhav thackeray tension: दोन दिवसांपूर्वी शिवसेना उबाठाचे मुंबईतील माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी आज आपल्या हजारो शिवसैनिकांसोबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता कोकणात भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांना हा धक्का दिला आहे.

कोकणातून पुन्हा उद्धव ठाकरे यांना धक्का, अनेक बडे नेते भाजपत
uddhav thackeray tensionImage Credit source: TV 9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 11, 2025 | 3:34 PM
Share

Uddhav Thackeray: शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के बसत आहे. कोकणातून पक्षाला सुरु झालेली गळती कमी बंद होत नाही. एकामागे एक नेते पक्ष सोडून जात आहे. काही दिवसांपूर्वीच राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर दापोलीतून माजी आमदार संजय कदम पक्ष सोडत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. दापोलीत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होता. त्यानंतर आता मालवणमधून शिवसेना ऊद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसत आहे.

मालवणमधून कोण कोण सोडणार पक्ष

मालवणमधून ठाकरे सेनेला भाजप मोठा राजकीय धक्का देत आहे. शिवसेना उबाठाचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगरसेवक मंदार केणी भाजपमध्ये जात आहे. बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक यतिन खोत, समाजसेविका तथा कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख सौ. शिल्पा यतिन खोत, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, समाजेवक भाई कासवकर हे सर्व पक्ष सोडत आहे. या सर्वांचा मंगळवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे.

मुंबई अन् कोकणातून धक्के

दोन दिवसांपूर्वी शिवसेना उबाठाचे मुंबईतील माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी आज आपल्या हजारो शिवसैनिकांसोबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता कोकणात भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांना हा धक्का दिला आहे.

मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता भाजप प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा होत आहे. शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांना कोकणातून एकामागे एक धक्के बसत आहे. पक्षाला होणारी ही गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आमदार आणि खासदारांची बैठकही घेतली होती. त्यानंतर ही गळती थांबत नाही.

Follow Us
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे लोक... जरांगे पाटील स्पष्टच बोलले
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी बैठकीत...
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत!
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक प्रकार
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, आता...
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, कारखानदारांनी मागितली 2 दिवसांची मुदत
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील इमारत...
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील मुसाफिरखाना इमारतीवर पालिकेची मोठी कारवाई
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे...
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे यांची मोठी घोषणा
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!