‘ते महिलांना नोकर समजत आहेत; आम्ही 3000 रुपये देणार’, उद्धव ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर रोखठोक भूमिका

"लाडकी बहीण योजना आम्हाला अडचणीच्या ठरत नाही. ते महिलांना नोकर समजत आहेत. १५०० रुपये दरमहा नोकरीवर ठेवल्यासारखं बोलत असतो. भाऊ बहिणीला ओवाळणी देतो तेव्हा तो जाहीरात करत नाही", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

'ते महिलांना नोकर समजत आहेत; आम्ही 3000 रुपये देणार', उद्धव ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर रोखठोक भूमिका
उद्धव ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 5:22 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीवेळी जे वातावरण होतं तसं वातावरण लाडकी बहीण योजनेमुळे नाही का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी लाडकी बहीण योजना ही महायुतीलाच अडचणीत आणणार, असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या बॅग तपासण्यावरही प्रतिक्रिया दिली.

“लोकसभेत आमचा टेम्पो होता. त्याचा ट्रक झालाय. माझ्या सभाच नाही विकास आघाडीच्या सभा बघा. लोकसभेसारख्या सभा होत आहे. लाडकी बहीण योजना आम्हाला अडचणीच्या ठरत नाही. ते महिलांना नोकर समजत आहेत. १५०० रुपये दरमहा नोकरीवर ठेवल्यासारखं बोलत असतो. भाऊ बहिणीला ओवाळणी देतो तेव्हा तो जाहीरात करत नाही. आमच्या जाहीरनाम्यात ३००० देणार याचा अर्थ आम्ही कर्तव्य म्हणून ती रक्कम देणार आहोत”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे बॅग तपासण्यावर काय म्हणाले?

“बॅग तपासायला हरकत नाही. कायदा समान पाहिजे. मला आहे तसाच कायदा मोदी, शाह आणि सत्तेतील तिघांनाही आहे. मोदी पंतप्रधान आणि शाह गृहमंत्री म्हणून येत असतील तर चूक आहे. कारण ते संविधानाने बसले आहेत. माझ्याप्रमाणे त्यांच्या बॅगा तपासल्या पाहिजे. मोदी आणि शाह यांच्या बॅगा जाताना तपासा. कारण ते महाराष्ट्र लुटून नेत आहे. मी संतापलो नव्हतो. त्यांनी त्यांचं काम केलं. मी माझं काम केलं. जो अधिकार त्यांना आहे तो मलाही आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

“तुम्ही आम्ही सारखे आहोत. तुम्ही कुणाला तरी मते देता ना. तुम्ही मत देता म्हणजे कोणत्या तरी पक्षाचा आहे. मी मतदार म्हणून माझी तपासणी करता तुमची का नाही करायची. प्रचारक येतात. ते सोलापूर आणि पुण्यात आहे. मोदी नरेंद्र मोदी म्हणून येता की पंतप्रधान म्हणून येतात. ते येतात त्यांना एअरपोर्ट बंद केला जातो. पंतप्रधान आहात तर पक्षाचा प्रचार करू नये. त्यांची बॅग का तपास करत नाही. माझ्यावर संशय व्यक्त केला. तर त्यांच्यावर का नाही?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.