AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमराजेंना शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न केला, आदल्या रात्री काय काय केलं? ठाकरेंनी पहिल्यांदाच सगळं सांगितलं

शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात आज उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली, यावेळी बोलताना त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ओमराजेंना शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न केला, आदल्या रात्री काय काय केलं? ठाकरेंनी पहिल्यांदाच सगळं सांगितलं
Uddhav ThackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 28, 2026 | 7:22 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राज्यात काही दिवसांपूर्वीच ऑपरेश टायगर झालं, शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली. या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ज्या-ज्या मतदारसंघात बंडखोरी झाली, त्या -त्या मतदारसंघात आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दौरा करत आहेत. आज ते शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत, त्यांनी धाराशिवमध्ये सभा घेतली. या सभेमध्ये बोलताना त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

जेव्हा मी खासदारांची बैठक बोलावली होती, तेव्हा मला यांनी न येण्याची वेगवेगळी कारणं दिली होती. तेव्हा मी यांना म्हटलो नका येऊ. मात्र जेव्हा यांचे चेहरे मला व्हिडीओमध्ये दिसायला लागले, तेव्हा मी ओमराजे निंबाळकरांना विचारलं, तुमचा चेहरा बरोबर दिसत नाहीये. तुमच्यावर काही तणाव आहे का? की रात्री झोप झालेली नाहीये? तेव्हा ते म्हणाले नाही माझं सगळं बरोबर आहे, मी ठीक आहे, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली, वाटलं काही तरी गडबड आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ओमराजे निंबाळकर यांना जपण्याचा प्रयत्न मी शेवटपर्यंत केला. खोट कशाला सांगू? अगदी खासदार फुटण्याच्या आदल्या रात्री, मध्यरात्री दीड वाजता, मी कैलास पाटील आणि वरून सरदेसाई यांना त्यांना भेटण्यासाठी पाठवलं होतं, मी त्यांना हे देखील म्हणालो होतो, मला ओमराजे पाहिजे त्यांना खासदार पाहिजे आता निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर घणाघात केला आहे.  हरामाचा पैसा पाहिजे होता म्हणून गद्दार तिकडे गेला, 2022 ला सर्व गद्दारांना त्यांच्या माहेरी गुजरातला नेलं होतं, पण त्यावेळी  कैलास पाटील लाथ मारून परत आले होते. गद्दारांचं नेतृत्व करणाऱ्यांचं नशीब फिरल्याशिवाय राहणार नाही. मी तुमची माफी मागतो कारण मी जर त्याला उमेदवारी दिली नसतील तर तुम्ही त्याला मतदान केलंच नसतं, ही कीड वाढलीच नसती असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, तसेच ओमराजे निंबाळकर कपाळावरील हा गद्दारीचा डाग कसा पुसणार ? असा सवालही यावेळी ठाकरे यांनी केला आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी