लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जुंपली

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये जुंपली. 1500 रुपये देता पण महागाईचं काय ?, देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ म्हणत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. त्यानंतर शिंदेंनीही पाटणच्या सभेतून प्रत्त्युत्तर दिलं. 

लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जुंपली
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 10:49 PM

विधानसभेसाठी प्रचार सुरु झालाय आणि सुरुवातीलाच लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जुंपली आहे. लाडकी बहिण योजनेमुळं कोणाचं घर चालतं का ?, महागाईचं काय असा सवाल करत देवा भाऊ, दाढी भाऊ आणि जॅकेट भाऊ अशी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी राधानगरीच केपी पाटलांसाठी सभा घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांनी शंभूराज देसाईंच्या पाटणमधून ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. टप्प्यात सावज आल्यावर करेक्ट कार्यक्रम केला, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘हे भाऊ नाहीत हे जाऊ तिथे खाऊ आहेत. या योजनेमुळे कोणाचे घर चालतंय असं एका जरी व्यक्तीने सांगितले तरी मी महाविकासआघाडीला सांगेल की महायुतीच्या विरोधात एकही उमेदवार नको. कारण घरं सगळी सुखी आहेत. ही योजना राबवताय पण महागाई कितीये.’

‘माझी आई काटकसर करायची हे मी पाहिलेय. यामध्ये जर आम्ही थोडा हातभार लावायला गेला तर तुम्ही त्याला रेवड्या म्हणतात. त्याला लाच म्हणतात. तुम्हाला लाज वाटली पाहिजेय ज्यांनी ज्यांनी यात खोडा घातलाय त्यांना कोल्हापुरी जोडा दाखवणार की नाही. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

जेव्हा लोकांनी बाळासाहेबांचा विचार सोडले. पक्ष विकायला काढला. जेव्हा खच्चीकरण होऊ लागले. बाळासाहेबांचे धनुष्यबाण, विचार जेव्हा तोडून मोडून टाकले. वेळ साधून करेक्ट कार्यक्रम करायचा असतो. असंही शिंदे यांनी म्हटले आहे.

भाजपच्या कटेंगे तो बटेंगे या कॅम्पेनवरुनही ठाकरेंनी ना तुटू देणार…ना लुटू देणार असा पलटवार केला. इकडे बारामतीच्या सभेतून शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मोर्चा वळवला. पंतप्रधानांनी देशाचा विचार करायचा असतो. मुख्यमंत्र्यांनी राज्याचा विचार करायचा असतो. तुम्ही देशाचे पंतप्रधान आणि एकाच राज्याचा विचार करतात. मोदी फक्त गुजरातचाच विचार करतात, मग पंतप्रधान कशाला मुख्यमंत्रीच व्हा, असा चिमटा पवारांनी काढला. प्रचार जेमतेम सुरु झालाय. 20 तारखेला मतदान आहे. त्यामुळं जसजसा प्रचार शिगेला पोहोचले, टीकेचे रॉकेट फुटतील.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.