शिवसेना माझीच आहे आणि माझ्याकडेच राहणार – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी आज सभेत बोलताना पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. सोबतच त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांवर ही टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, अशा प्रकारे पक्ष फोडून लोकं जाऊ लागले तर लोकांचा लोकशाहीवर विश्वास राहणार नाही.

शिवसेना माझीच आहे आणि माझ्याकडेच राहणार - उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 8:50 PM

उद्धव ठाकरे यांची आज कोकणात सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मी छत्रपतींचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. सुरतमध्येही मी मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. घर फोडणारी औलाद तुमची. शरद पवारांचे घर फोडले. अडीच वर्षात मी काय गुन्हा केला होता. कोरोनाचा बंदोबस्त करण्यात महाराष्ट्र नंबर एकचं राज्य होतं. हे तेव्हा कुठे होते संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. आपण १० रुपयात थाळी सुरु केली होती. परत सत्तेत आल्यावर ती सुरु करणार आहे. महिलांसाठी १५०० रुपये देतात. पण त्यात घर चालतं का. महागाई किती वाढली आहे.

‘महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना मोफत शिक्षण देणार. बदलापूरमध्ये जी घटना घ़डली जे तीन भाऊ आहेत त्यांनी त्या चिमुकलीच्या आईला १५०० रुपये देऊन दाखवा. त्या माऊलीला पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं तुम्ही. महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन आम्ही सुरु करु. सत्ता कशी आणायची, आमदार कसे फोडायचे हेच सुरु आहे. गद्दारांनी सरकार पाडलं नसतं तर अनेक उद्योग महाराष्ट्रात सुरु झाले असते. नाणार रिफायनरी आणि बारसु रिफायनरीमी हद्दपार करुन दाखवेल. जनतेच्या माथ्यावर प्रकल्प लादताय. महाराष्ट्राचं नाव कोणाचं राहणार आहे. मोदी आणि शाहांचं नाव असणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी करणार.’ असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

ठाकरे म्हणाले की, ‘मोदी शाहांच्या दारात आम्ही उभं राहायचं का. ज्यांनी भाजप रुजवला त्यांची आता गरज यांना नाहीये. भाजपचे अध्यक्ष म्हणतात की संघाची आता आम्हाला गरज नाही. विदर्भात कापसावर एक रोग येतो. तो खोडाला लागतो. तसा हा दाढीवाला किडा भाजपला लागला आहे. जो भाजपला पोखरतोय.’

‘महाराष्ट्राला दिशा देण्याची वेळ आली आहे. एक बातमी वाचली की ८ तारखेला सुनावणी लावली आहे. न्यायदेवतेला दिसते की नाही हे आठ तारखेला कळेल. मी न्यायाधीशांना हात जोडून सांगतोय आम्ही अडीच वर्षापासून न्याय मागतो आहे. असा पक्ष फोडून लोकं जायला लागले तर लोकशाहीवर जनतेचा विश्वास राहणार नाही. शिवसेना माझीच आहे आणि माझ्याकडेच राहणार आहे. महाराष्ट्रावर मावळ्यांचं राज्य येणार की गुंडाचं राज्य येणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे.’

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.