उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?, संजय राऊत यांनी दिले संकेत

उद्धव ठाकरे यांनी दिल्लीच्या निकालावर चिंता व्यक्त केली. आपल्याला एकत्र काम करण्यासाठी पुन्हा नव्याने विचार करावा लागले. एकत्र काम करता येईल, याबाबत ते स्वत: इतर नेत्यांची चर्चा करतील असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितल्याने ठाकरे आता महारविकास आघाडीत राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?, संजय राऊत यांनी दिले संकेत
sanjay raut and uddhav thackeray
| Updated on: Feb 08, 2025 | 6:46 PM

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील आपच्या पराभवानंतर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत रहायचे नाही यावर आता पक्षाच्या इतर नेत्यांशी बोलून एकत्र काम करायचे का नाही याचा विचार करावा लागेल असे ठाकरे यांनी आपल्याशी चर्चा करताना म्हटल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे म्हटले जात आहे.

दिल्लीत आपचा मोठा पराभव झाला आहे. आप आणि काँग्रेस स्वतंत्र लढल्याने हा पराभव झाल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात काश्मीरचे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते कश्मीर नेते उमर अब्दुल्ला यांनी दिल्लीतील आपच्या पराभवानंतर अजून भांडत बसा असा टोमणा काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांना लगावला आहे. त्यानंतर आता शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी देखील इंडिया आघाडीच्या या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली असे संजय राऊत म्हणाले.

दोन पक्ष एकत्र आले असते तर..

केजरीवाल यांना जनतेने 10 वर्ष निवडून दिल आहे. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून आलेला एका पक्षाने सत्ता घेतली. मतदार याद्यातून हजारो नाव गायब केली आहेत.दिल्लीतील रिकामे बंगले आहेत त्यात कोणी राहत नाही त्यांचे नाव नोंदवले आहे. केजरीवाल हरले.या पराभवाचं मुख्य कारण काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढले आहे. आमच्या इंडिया ब्लॉक मधील दोन पक्ष एकत्र आले असते तर निकाल वेगळा लागला आसता. फरक फार मोठा नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

राहुल गांधी यांच्यासोबत असताना मी काल सांगितलं, महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीत राबवला. जसा लातूर पॅटर्न राबवला तसा राबवला….आता लातूर पॅटर्न कुठे आहे, राजकारणात ‘अघोरी पॅटर्न’ काही काळ चालतो. महाकुंभमध्ये मोदी गेले, तसेच कन्याकुमारी कुठे कुठे जातात मतदानाच्या दिवशी जातात, मी किती कडवट हिंदू आहे हे दाखवायचा प्रयत्न आहे. धर्माची अफूची गोळी द्यायची असा प्रकार सुरु आहे असेही संजय राऊत म्हणाले.

ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली

ध्यानस्थ बसलेले पण कॅमेरे लागलेले आहेत. हे लोकांनी पहावं मतदान करावं. ह्या वेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी ठरवले होते, पडेल ती किंमत देऊन केजरीवाल यांचा पराभव करुच… खोटे मतदान केलं. महाराष्ट्रात देखील हे घडलं पण आमच्या उशीरा लक्षात आले असेही संजय राऊत म्हणाले. दिल्लीच्या निकालाबाबती उध्दव ठाकरे यांनी चिंता व्यक्त करीत नव्याने विचार करावा लागेल सर्वांशी बोलते बोलतील असे संजय राऊत यांनी सांगितले.